' खेलरत्न नावावरून राजकरण! गांधी परिवाराचं नावं असलेल्या या १२ गोष्टी सुद्धा जाणून घ्या – InMarathi

खेलरत्न नावावरून राजकरण! गांधी परिवाराचं नावं असलेल्या या १२ गोष्टी सुद्धा जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नावात काय असं शेक्सपियर बऱ्याच वर्षांपूर्वी सांगून गेला आहे, तरी आपण माणसं मात्र इतरांना नावे ठेवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आज भारतातल्या कोणत्याही शहरात  महात्मा गांधी नावाचा एक तरी रास्ता तुम्हाला हमखास सापडणारच!

देशाच्या राष्ट्रपित्याला आजकाल आपण भाजी मार्केट, चौक, रस्त्यांची नावापुरतच ठेवले आहे. आयुष्यभर ज्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला होता त्याचच राष्ट्रपित्याच्या जाण्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणवर हिंसाचार वाढला.

गांधी घराणं तसं तर अनेकांच्या चर्चेचा विषय असतोच. अगदी इंदिराजींपासून ते राहुल गांधींपर्यंत, आज त्यांच्याबद्दल समाजमाध्यमात उलट सुलट चर्चा होत असतात. राजीव गांधींना सोनिया गांधीवरून अनेकवेळा टीकेचा सामना करावा लागला होता.

मध्यन्तरी गुजरातमधील एका स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले त्यावरून काँग्रेसने मोठ्या प्रमाणवर विरोध केला होता. त्या विरोधाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने गांधी घरातील लोकांची नाव कुठे कुठे दिली गेली आहेत याची यादी ट्विटरवर टाकली.

ऑलिम्पिकची चर्चा देशभर होत आहे, त्यातच आज मोदींनी एक नवी घोषणा केली, राजीव गांधी खेलरत्न म्हणून दिला जाणारा खेळातला पुरस्काराचे नाव बदलून आता मे.ध्यायचंद पुरस्कार या नावाने दिला जाणार…

२०१४ साली सत्तापालट झाल्यानंतर मोदींनी अनेक उपक्रम योजना आणल्या ज्याला विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणवर विरोध केला होता आता तर थेट माजी पंतप्रधानाच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे  नावच बदलून टाकले आहे. गांधी घराण्याच्या व्यक्तींचे आणखीन कुठे कुठे नाव दिले आहे माहिती आहे का? चला तर मग बघुयात

 

१. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट :

पूर्वी सफदरजंग या नावाने १९३० साली विमानतळ बांधण्यात आले मात्र जस जसे प्रवासी वाढत गेले तसे पालाम नावाचे विमानतळ बांधण्यात आले जे दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांनी वापरले. त्याचा विमानतळाचे  नामकरण १९८६ साली इंदिरा गांधी यांच्या नावाने करण्यात आले.

 

indira 1 inmarathi

 

२. इंदिरा गांधी मानव राष्ट्रीय संग्रहालय :

मानवाच्या उत्क्रांतीचे आणि संस्कृतीचे जतन करणारे हे संग्रहालय भोपाळ येथे आहे. याच संग्रहालयाचे विभाग सुद्धा आहेत जे कर्नाटकमधील म्हैसूर या शहरात आहे.

 

indira 3 inmarathi

 

३. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यालय  :

१९८५ साली स्थापन झालेले हे विश्वविद्यालय आहे, ज्यात भारतातून तसेच जगभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठात अनेक प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. आज भारतभर या विद्यापीठाची कॉलेजस आहेत.

 

indira 5 inmarathi

 

४. इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार :

आज अनेक दिग्दर्शकांची इच्छा असते की आयुष्यात ऑस्कर मिळो न मिळो आपला राष्ट्रीय पुरस्कार तरी मिळाला पाहिजे, तर असा हा राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला देखील इंदिराजींचं नाव आहे.

 

indira 6 inmarathi

 

५. इंदिरा गांधी स्टेडियम :

आंध्र क्रिकेट असोसिएशन ही संस्था बघत असलेल्या या स्टेडियमला इंदिरा गांधी स्टेडियम या नावाने ओळखले जाते. हे स्टेडियम विजयवाडा येथे असून २००२ साली भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये जो सामना खेळला गेला होता.

 

indira 7 inmarathi

 

६. इंदिरा गांधी आवास योजना :

जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, जे देशाच्या दुर्गम भागात राहतात, अशा लोकसांठी सुरु केलेल्या योजनेला मोदी सत्तेत आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असे नाव देण्यात आले.

 

indira 8 inmarathi

 

७. राजीव गांधी सेतू :

आज वांद्रे आणि वरळी या मुंबईतली गजबजलेल्या भागाला जोडणारा पूल म्हणजे वांद्रे वरळी सी लिंक. आपण अनेकजण याला वांद्रे वरळी सी लिंक म्हणून ओळखतो मात्र याचे खरे नाव आहे राजीव गांधी सेतू

 

rajiv 1 inmrathi

 

८. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी :

१९९२ साली स्थापन झालेल्या या इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. ही इन्स्टिट्यूट मुंबई विद्यापीठाशी सल्गन आहे.

 

rajiv 3 inmarathi

 

९. राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट :

आज हैद्राबाद म्हटलं की रामोजी फिल्म सिटी फक्त फिल्मसिटी आठवते. हैदराबादच्या विमानतळाला जेव्हा राजीव गांधींचे नाव देण्याचे सरकारने घोषित केले होते, तेव्हा विरोधी पक्षात बसलेल्या तेलगू देसम पार्टीने मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. खुद्द सोनिया गांधींनी या विमानतळाची पायाभरणी केली होती.

 

rajiv 4 inmarathi

 

१०. राजीव गांधी आयटी पार्क पुणे :

आज पुण्याला आयटी हब म्हंटले जाते, पुण्याच्या आसपासच्या परिसरात आयटी सेक्टरचे जाळे पसरले आहे. हिंजवडी परिसरात जे आयटी पार्क आहे त्याला राजीव गांधीच नाव देण्यात आले आहे.

 

rajiv 5 inmarathi

 

११. राजीव गांधी बेरोजगार योजना :

आज कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले आहेत, दिल्ली सरकारने काही वर्षांपूर्वी वाढत्या बेरोजगारी आळा घालण्यासाठी या योजनेची सुरवात केली जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी, व्यवसाय करण्यासाठी सहाय्य केले जाईल.

 

rajiv 6 inmarathi

 

१२. संजय गांधी नॅशनल पार्क :

रविवार म्हंटल की मुंबईकरांचं आपल्या मुलाला घेऊन जाणायच हक्काचं ठिकाण म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. आशियातील सर्वात जास्त भेट दिलेल्या पार्क पैकी हे आहे.

 

sanjay gandhi inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?