' “नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा! – InMarathi

“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतच खातं उघडून देशाचं नाव तर मोठं केलेच त्याहूनही एका महिलेने ही कामगिरी केली याचे कौतुक संपूर्ण भारतीयांना आहे. चानू जिंकते तोवर महिला हॉकी संघाने देखील सामना जिंकून चार चांद लावले.

आज भारतीय महिला ‘चूल आणि मुलं’ यापलीकडे जाऊन अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसून येतात. अगदी खेडोपाड्यातल्या स्त्रिया देखील आज पुरुषांच्या बरोबरीने शिकून आर्थिकरित्या सक्षम होताना दिसून येत आहे.

स्त्री म्हंटल की कमजोर किंवा तिला हवी तशी आपल्या स्वार्थासाठी वापरू शकतो या मानसकितेमुळे पिढ्यानपिढ्या आपण स्त्रियांवर अत्याचार करत आलो आहोत. बालविवाह, सती प्रथा यासारख्या अनिष्ट रूढी केवळ स्त्रियांवर लादून पुरुषीप्रधान संस्कृतीने कायमच अन्याय केलेला दिसून आला आहे.

 

great indain women inmarathi

 

आज असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाहीत अगदी बस चालकापासून ते वैमानिकापर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या कामात स्त्रियांचा सहभाग दिसून येतो. दरवर्षी महाराष्ट्रात दहावी बारावीच्या निकालात मुलीचं बाजी मारताना दिसून येतात.

आज घरात दोघेही कमावते असल्याने स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष देखील घरकामात मदत करतात, मात्र आजही आपल्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या देशात मात्र नवऱ्याचे चप्पल कपडे उचलणे ही आपली संस्कृती आहे असे म्हणणारे पुरुष नव्हे तर चक्क एक स्त्री आहे.

पाकिस्तानी मॉडेल अभिनेत्री सदफ कनाल हिने नुकतंच एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीती एकूणच फेमिनिझम या लाडक्या विषयावर मुक्ताफळे उधळली आहेत. ज्यात ती असं म्हणाली कि ‘आपल्या पती विषयी आपल्याला सर्व माहित असायला हवे, त्याच्या खाण्यायपिण्याच्या सवयी, त्यांचे कपडे आणि चप्पल उचलणे हीच तर संस्कृती आहे, आणि या गोष्टी तर केल्याचं पाहिजेत कारण आपण पत्नी आहोत म्हणून..आणि या सर्व गोष्टी बघूनच मी लहानाची मोठी झाली आहे’.

सदफने केलेल्या या अशा वक्त्याववरुन तिच्याच देशातील लोक आज तिला ट्रोल करत आहेत. पितृसत्ताक संस्कृती आणि फेमिनिझम यावरून लोक तिच्यावर टीका करत आहेत. चला तर मग बघुयात लोक काय प्रतिक्रिया देत आहेत…

या व्यक्तीने तर थेट तिच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत तिच्यावर टीका देखील केली. फेमिनिझम म्हणजे नवऱ्याची काळजी घेणे त्याचा आदर करणे असं म्हणत तिला टॅग केले आहे.

 

sadaf inmarathi 1

 

इस्लाम संस्कृतीची उदाहरणे देणारी ही अभिनेत्री एकीकडे सिनेमात मुजरा करतेय जे इस्लामच्या विरोधात आहेत, असं काहीस म्हणणं या व्यक्तीचे असावे. संस्कृतीचे गोडवे गाणारी ही अभिनेत्री इस्लामचे बाकीचे नियम विसरले असेल म्हणून अशी टीका केली असेल.

 

sadaf inmarathi 2

हे ही वाचा – “मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

एखाद्या महिलेने महिलांविरुद्ध वक्तव्य केल्यास साहजिकच महिला तिला विरोध करणारच पण पुरुष मात्र तिच्या बाजूने आहेत हे या ट्विट वरून लक्षात येत आहे.

 

sadaf inmarathi 3

 

मुघले आझमच व्हायरल होणारे हे मजेशीर मिम या अभिनेत्रीच्या वक्तव्यवरुन सुद्धा शेअर केले जात आहे.

 

sadaf inmarathi 4

 

 

 

sadaf inmarathi 6

 

सदफला नवऱ्याचे सॉक्स माहिती आहेत पण त्याला आधी सुद्धा बायको होती हे माहित नाही का? अशी कोपरखळी देखील मारली आहे,

 

sadaf inmarathi 5

 

एकूणच रंगलेल्या  चर्चेवर या व्यक्तीने आपल्या मुख्यमंत्र्यांसारखं वक्तव्य करून ही चर्चा संपवा असाच सल्ला दिला आहे.

आज आपल्या देशात स्वरा भास्कर, कंगना राणावत सारख्या अभिनेत्री फेमिनिज्म विषय आला की आपली मत रोखठोकपणे मांडत असतात. मात्र देशावर ओढवलेल्या परिस्थितीवर स्वतः कितपत त्यात लक्ष देतात? हा प्रश्न आहेच.

ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, दहशतवादाने पोखरले आहे यासारख्या गंभीर समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.एकीकडे सौदीसारख्या देशात स्त्रियांच्या बाबतीतले कायदे हळूहळू शिथिल करत आहेत तर आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांना कधी कळणार? केवळ धर्मामुळे देशाच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती कोणतेच बदल घडून येत नाही  हे बहुदा त्यांच्या लक्षातच येत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?