' या देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा!

या देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता भारतामध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची तयारी भारत सरकारने सुरु केली आहे. त्या दृष्टीने प्राथमिक चाचणी म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडिया भारतातील ५ शहरांमध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार आहे. या नोटा polymer-based असून १० रुपयांच्या असतील. भारतासारख्या देशामध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर वास्तवात किती प्रभावी ठरू शकतो हे या चाचणीद्वारे कळेल, त्या नंतरच संपूर्ण देशात प्लास्टिकच्या नोटा टप्प्या टप्प्याने वितरीत करण्यात येतील.

असो, भारतात या प्लास्टिकच्या नोटांचे युग सुरु होईल तेव्हा होईल, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगभरातील काही देशांनी या पूर्वीच प्लास्टिकचे चलन अंमलात आणले आहे. चला जाणून घेऊया या क्रांतिकारी देशांबद्दल!

ऑस्ट्रेलिया

plastic-money-marathipizza01
scotttraveler.com

जगात सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया देशाने प्लास्टिकचे चलन वापराला सुरुवात केली होती. १९९६ साली ऑस्ट्रेलियाने हा निर्णय जाहीर केल्यावर आर्थिक जगतात खळबळ माजली होती. तेव्हापासून संपूर्ण ऑस्ट्रेलिया भर प्लास्टिकचे चलन वापरले जाते.

 

पापुआ न्यू गिनी

plastic-money-marathipizza02
banknotenews.com

‘किना’ हे पापुआ न्यू गिनी या देशाचं चलन आहे. दोन किनाच्या नोटा पापुआ न्यू गिनीने १९९१ मध्ये चलनात आणल्या. त्याला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून २००८ पासून तेथील सरकारने सगळंच चलन हे प्लास्टिकमध्ये आणलं.

 

ब्रुनेई

plastic-money-marathipizza03
the-saleroom.com

ब्रुनेई या इस्लामिक देशानेसुद्धा १९९६ मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा प्लास्टिकच्या कमी किमतीच्या नोटांपासून सुरुवात झाली. तर २००७ पासून या देशात सर्वच नोटा या प्लास्टिकच्याच वापरल्या जातात.

 

न्यूझीलंड

plastic-money-marathipizza04
banknotenews.com

न्यूझीलंड या देशाचं चलन आहे न्यूझीलंड डॉलर. एक आधुनिक देश असूनही या देशानं १९९९ पर्यंत कधीही प्लास्टिकच्या चलनाचा विचार केलेला नव्हता. १९९९ च्या मध्यात न्यूझिलंडने २० न्यूझीलंड डॉलरची नोट चलनात आणली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पासून रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने केवळ बारा महिन्यांतच आपलं संपूर्ण चलन हे प्लास्टिकमध्ये बदललं.

 

रोमानिया

plastic-money-marathipizza05
delcampe.net

रोमानिया हा प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात करणारा पहिला युरोपिय देश ठरला. रोमानियाच्या चलनाला रिऊ म्हणतात. १९९९ ते २००१ अशा तीन वर्षात कागदी चलन रद्द करून प्लॅस्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली.

 

व्हिएतनाम

plastic-money-marathipizza06
thechive.com

व्हिएतनामच्या चलनाला डाँग म्हणतात. व्हिएतनाम हा असा देश आहे तो कित्येक दशकं युद्धाच्या छायेत राहिला, पण निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षात व्हिएतनामने आपलं कागदी चलन हे बंद केलं आणि आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली. २००३ ते २००३ या तीन वर्षात या देशाने आपलं चलन बदललं.

आता लवकरच या देशांच्या यादीमध्ये भारताच नाव जोडलं जाईल.

हे देखील वाचा: (ही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत !)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?