' कोण म्हणतं इतिहास केवळ माणसांनी रचला? वाचा इतिहासातील धाडसी घोड्यांबद्दल… – InMarathi

कोण म्हणतं इतिहास केवळ माणसांनी रचला? वाचा इतिहासातील धाडसी घोड्यांबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारताचा इतिहास हा शूरवीर व्यक्तिमत्वांचा आहे. आपल्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की, कोणताही प्रश्न हा एक तर तहाने किंवा युद्धाने सोडवला जाऊ शकतो.

शत्रूचं बळ बघून आपले राजे योग्य तो निर्णय घ्यायचे आणि रणांगणावरून विजयश्री घेऊनच परतायचे. युद्धावर जातांना आणि युद्ध जिंकून परत आल्यावर, युद्धवीरांना कुंकू लावून ओवाळतांना आपण कित्येक सिनेमा आणि टीव्ही सिरीयलमध्ये बघितलं आहे. पण, या युद्धांमध्ये राजाला जिंकवून देणाऱ्या घोड्याचा सन्मान केलेला सीन आपण क्वचितच बघितला असेल.

 

tanaji inmarathi

 

सर्व राजांचं आपल्या घोड्यांवरचं प्रेम, त्यांच्याशी मायेने बोलणं हे आपण बघितलं आहे. पण, त्यांचं जाहीर कौतुक हे आपल्या कधीच समोर आलेलं नाहीये.

 

horse inmarathi

 

युद्ध जिंकण्यास मदत करणाऱ्या या ५ घोड्यांची माहिती देऊन आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्व

आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘मोती’, ‘विश्वास’, ‘रणवीर’, ‘गजरा’, ‘कृष्णा’, ‘तुरंगी’ आणि ‘इंद्रायणी’ या ७ घोड्यांचा वापर केला होता. यापैकी कृष्णा हा घोडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसात सुद्धा त्यांच्या सोबत होता.

 

shivajin-mharaj-inmarathi

 

पांढरा शुभ्र रंग असलेला ‘कृष्णा’ हा स्टॅलियन प्रजातीचा घोडा होता. उंच आणि पळण्यात अगदी चपळ अशी या घोड्याची महतीची इतिहासात नोंद आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक युद्धात सहभाग नोंदवला होता. प्रत्येक वेळी घोडा निवडतांना आपला हा जाणता राजा चपळ, शूर घोड्यांची निवड करायचा.

 

shivaji maharaj inmarathi 1

 

शत्रूंना हरवण्यात या घोड्यांनी महाराजांना नेहमीच मदत केली. प्रत्येक योद्ध्याने आपले घोडे हे युद्धानुसार बदलत राहिले पाहिजेत ही सुद्धा शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध अभ्यासातून आपल्याला मिळते. भीमथडी आणि अरबी घोडे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यात नेहमीच सामील असायचे.

२. महाराणा प्रताप 

‘चेतक’ नावाचा घोडा हा महाराणा प्रताप यांच्यासोबत नेहमीच युद्धावर जायचा. या घोड्याचा उल्लेख नेहमीच ‘स्वामी भक्त’ म्हणून केला जातो.

 

maharana pratap inmarathi

 

चेतक घोड्याची गती इतकी जास्त होते की, ती बघून शत्रू सुद्धा आश्चर्यचकित व्हायचे. मूळचा इराणच्या असलेल्या या चेतक घोड्यावर महाराणा प्रताप यांचं खूप प्रेम होतं.

चेतकला महाराणा प्रताप यांनी एका गुजराती व्यापाऱ्याकडून विकत घेतलं होतं. हा व्यापारी महाराणा प्रताप यांच्या राजमहालात चेतक, त्राटक आणि अटक असे ३ घोडे विक्रीसाठी घेऊन गेला होता. महाराणा प्रताप यांनी ते तिन्ही घोडे विकत घेतले होते.

 

horse 1 inmarathi

 

चेतकला त्यांनी नेहमीसाठी स्वतःजवळ ठेवलं होतं, त्राटकला आपला भाऊ शक्ती सिंह याला दिलं होतं आणि ‘अटक’ या घोड्याला प्रशिक्षण देऊन सैन्यात समाविष्ट करून घेतलं होतं.

चेतक घोड्याने महाराणा प्रताप यांच्यासोबत हल्दी घाट ची लढाई लढतांना शत्रूच्या छातीवर चढून त्यांच्यावर वार केल्याची माहिती उपलब्ध आहे. याच युद्धात चेतक घोड्याला वीरगती प्राप्त झाली होती.

३. महाराजा रणजित सिंह

घोडे ज्याप्रमाणे युद्धात आपलं कर्तव्य पालन करायचे त्याचप्रमाणे ‘घोडी’सुद्धा कुठेच मागे नसायची. पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी ते वापरत असलेली ‘लैला’ ही घोडी  ६० लाख रुपये खर्च करून विकत घेतली होती. ‘लैला’ ही घोडी महाराणा कशी मिळाली? हा सुद्धा एक किस्सा आहे.

शूर घोड्यांचे अभ्यासक असलेले महाराजा रणजित सिंह हे नेहमीच आपल्या सैन्यात घोडे भरती करण्यासाठी शोधात असायचे. त्यांच्या दरबारात एक युरोपियन व्यापारी आला होता. त्याने पेशावर मध्ये मोहम्मद खान यांच्याकडे ‘सिरी’ नावाची एक घोडी विकण्यासाठी आहे अशी माहिती महाराजा रणजित सिंह यांना दिली होती.

 

ranjit singh horse inmarathi

 

‘सिरी’ ही वेगवान घोडी आहे आणि युद्धात तुम्हाला तिची मदत होईल हे ऐकून रणजित सिंह यांनी मोहम्मद खानकडे आपला दूत पाठवला. पण, मोहम्मद खानने ही घोडी विकण्यास नकार दिला होता. तेव्हा रणजित सिंहने त्या युरोपियन व्यापाऱ्याला पेशावरला पाठवलं आणि ‘सिरी’ला विकत घेतलं. आपल्या सैन्यात समावेश करतांना तिचं नामकरण रणजित सिंह यांनी ‘लैला’ असं केलं होतं.

४. सिंकदर

मेसिडोनियाचा सिकंदर हा राजपुत्र वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या ‘ब्युसफालुस’ नावाच्या घोड्यावर बसून इराणमार्गे भारतात आला होता. या घोड्याला सिकंदरने मेसिडोनियाच्या एका व्यापाऱ्याकडून विकत घेतलं होतं.

 

horse 2 inmarathi

 

‘ब्युसफालुस’ या घोड्याने सर्व लढायांमध्ये सिकंदरची साथ केली होती. सिकंदरने लढलेल्या सर्वात मोठ्या पोरसच्या लढाईत सुद्धा तो सिकंदरच्या सोबत होता.

५. महाराणी लक्ष्मी बाई

महाराणी लक्ष्मी बाई यांच्या सैन्यात ‘सारंगी’, पवन’ आणि ‘बादल’ अशा ३ घोड्यांचा समावेश होता. ‘बादल’ हा त्यांचा सर्वात लाडका घोडा होता. त्याला घेऊन महाराणी लक्ष्मी बाई या शत्रूच्या किल्ल्याची एक १०० फूट उंच असलेली एक भिंत सुद्धा पार करून गेल्या होत्या. यावरून ‘बादल’ च्या चपळाईचा अंदाज येऊ शकतो.

 

rani laxmibai inmarathi

 

गतीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या घोड्यांचे फोटो घरात लावावेत हे या कारणामुळेच काही लोक सांगत असावेत. त्यांच्याकडून चपळाई आणि फिटनेस या गोष्टी आपण नक्कीच शिकू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?