' लग्नाआधी ट्विंकलने घातली होती ही अट, आणि मग रामराम ठोकला फिल्मी करियरला!

लग्नाआधी ट्विंकलने घातली होती ही अट, आणि मग रामराम ठोकला फिल्मी करियरला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. त्यात मग योगायोग, डेस्टिनी, मध्यस्थी हे पाहुणे बहुधा असतातच आणि तिघेही आपापल्या भूमिका आलटून पालटून चोखपणे बजावत असतात. त्यातला डेस्टिनी किंवा दैव हा मानाचा गणपती. तो जिथे धागे जोडेल तिथेच ते जोडले जातात. आणि तयार होते त्या लग्नाची गोष्ट.

तो खिलाडीयोंका खिलाडी आणि ती स्टारकीड, स्वत:ला सिद्ध करू पाहणारी! त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने अशी अट घातली की जी पुर्णपणे डेस्टिनीवर अवलंबून होती.

 

akshay and twinkle inmarathi

 

पण म्हणतात ना की मनापासून एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करायला सारी सृष्टी मदत करते, तसेच झाले अगदी आणि हे लग्न झाले. त्या गोष्टीला आता २० वर्षे झाली पण तरीही ती जोडी आणि त्यांच्या लग्नाची गोष्ट आजही तेवढीच एव्हरग्रीन आहे.

मित्रांनो ती जोडी आहे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. ज्यांच्या लग्नाची गोष्ट त्यांच्या नात्याइतकीच चटपटीत आहे. तुम्हाला जाणून घ्यायचीय या लग्नाची गोष्ट? चला तर मग जाणून घेवू या लेखातून.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा खूप कमी जोड्या आहेत ज्यांचे संसार सुरळीत चालू आहेत. आणि जे ‘आयडियल कपल’ म्हणून ओळखले जातात. अक्षय आणि ट्विंकल हे या ‘आयडियल कपल’ पैकी एक. यांच्या लग्नाची गोष्ट देखील एका स्टोरीपेक्षा कमी नाही.

अक्षयसोबत लग्न करण्याअगोदर ट्विंकलने खूप पेपर वर्क केले होते. ट्विंकलने अक्षयला सहज होकार नाही दिला, तर त्यासाठी दोन चार्ट तयार केले होते. ज्यातील एक, अक्षयची हेल्दी जींस, फॅमिली बॅकग्राउंडसाठी होता आणि दुसरा लग्नाचे फायदे आणि नुकसान यासाठी होता.

हे ही वाचा शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!

akshay kumar and twinkle inmarathi

 

अक्षयच्या फॅमिलीत कुणाला काही आजार तर नाही ना? त्याच्या फॅमिलीत कुणाचे टक्कल तर पडले नाही ना? एखाद्या आजाराने कुणाचा मृत्यू तर झाला नाही ना? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ट्विंकलने अक्षयच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती.

यावर अक्षय म्हणाला, “लग्नानंतर मला याविषयी समजले होते. त्यावेळी मला ट्विंकलचा खूप राग आला होता. मात्र आता वाटतं, की कुंडली मिळवण्याऐवजी या गोष्टी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.”

यात अजून एक गोष्ट अशीही होती की ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांना, त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने सांगितले की अक्षय ‘गे’ आहे. यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले.

लग्नाची गोष्ट सांगताना ट्विंकलने सांगितले की, अक्षयने लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळी तिचा मेला हा चित्रपट रिलीज होणार होता. जर मेला फ्लॉप झाला तर लग्न करेल असे ट्विंकलने ठरवले होते.

 

mela film inmararthi

 

चित्रपट फ्लॉप झाल्यावर अक्षय ट्विंकलच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला. केलेले प्रॉमिस ट्विंकलने पूर्ण केले आणि लग्नाला होकार दिला. त्याआधी ती नुकतीच एका रिलेशन मधून बाहेर पडली होती आणि तिला काही दिवस सिंगल स्टेटस एन्जॉय करायचं होतं.

त्याकाळात अक्षय कुमार कॅलिगरी येथे एका सिनेमाचे शूटिंग करत होता. त्याचे शूटिंग शेड्युल १५ दिवसांचे होते. ट्विंकलने सांगितले, की तेव्हा तिच्याजवळची सर्व पुस्तके वाचून झाली होती आणि तिथे टीव्हीदेखील नव्हता. त्यामुळे शूटिंगनंतर अक्षयसोबत वेळ घालवण्याचे तिने ठरवले. येथून दोघांचे नाते पुढे गेले.

अक्षय कुमारच्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज्ड मॅरेज, तुम्ही त्या व्यक्तीसोबत खरंच आनंदी राहणार आहात की नाही हे तुम्हाला स्वत:ला आतून कळले पाहिजे. जर तुम्ही खुश राहणार नसाल तर मात्र तुम्ही या नात्याबद्दल विचार करायला हवा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होऊ शकतो.

अक्षय कुमारची ट्विंकल सोबत पहिली भेट फिल्मफेयरच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाली होती. ट्विंकलला पाहताक्षणीच अक्षय तिच्यावर मोहित झाला आणि ती तिच्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअप मुळे अपसेट होती. ह्या गोष्टीची मान्यता स्वतः ट्विंकलने एका मुलाखतीत दिली की १५ दिवसांच्या आउटडोर शूटमुळे तिची आणि अक्षयची जवळीक वाढली होती.

आपलं ब्रेकअप विसरण्यासाठी तिने असं ठरवलं होतं की ती काही दिवस अक्षयसोबत वेळ घालवणार. यादरम्यान त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा झाला पण अक्षयचं नाव त्या काळात बऱ्याच दुसऱ्या अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं त्यामुळे तो साखरपुडा लवकरच मोडला.

 

twinkle 2 inmarathi

 

अक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षयसोबत लग्न न करण्याचे ठरवले. यादरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिची हालत खराब झाली.

अक्षयने खूपच आग्रह केल्याने तिने मेला सिनेमा फ्लॉप झाला तर ती अक्षय शी लग्न करेल अशी अट घातली आणि पुढे तसेच घडले आणि तिला अक्षयशी लग्न करावे लागले. लग्नानंतर मात्र अक्षयने आपली प्ले-बॉय इमेज पुर्णपणे बदलली.

आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे अक्षय ट्विंकलच्या लग्नात आमीर खान बनला होता चक्क विडियोग्राफर!

आमीर आणि ट्विंकल एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहेत. ट्विंकलने आपल्या लग्नात आपल्या सार्‍या मित्र-मैत्रिणींना काही ना काही जबाबदारी दिली होती. त्यामध्ये आमिरवर जबाबदारी होती चक्क लग्नाचे विडियो शूटिंग करण्याचीआणि त्यानेही ती भूमिका पार पडली होती.

 

aamir and twinkle 2 inmarathi

 

तर मित्रांनो ही अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच चटपटीत स्टोरीज साथी आमच्यासोबत रहा!

===

हे ही वाचा या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?