' नेहमी वापरला जाणारा टॉयलेट पेपर पांढराच का? ही ५ भन्नाट कारणं ठाऊकही नसतील – InMarathi

नेहमी वापरला जाणारा टॉयलेट पेपर पांढराच का? ही ५ भन्नाट कारणं ठाऊकही नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काळ बदलला तसा माणसाच्या गरजा आणि सवयीही बदलल्या. पंगतीच्या जागी डायनिंग टेबल्स आले, झोपण्याच्या जागी बेड्स आले ते थेट शौचालयांचेही रुपडे बदलले.

हल्ली घराघरांमध्ये कमोड्सचा सर्रास वापर दिसून येतो, त्यासह आणखी एक नजरेस पडणारी बाब म्हणजे टिश्यू पेपर. भारतीय घरात याचा फार वापर नसला तरी हॉटेल्स, हॉस्पिटल्स, ऑफिसेस या ठिकाणी टॉयलेटमध्ये टिश्यू पेपर वापरण्याखेरीज पर्याय नसतो.

परदेशांमधील ही गरजेची वस्तु भारतात आली आणि लवकरच स्थिरावली. त्यामुळे टॉयलेट किंवा टिश्यू पेपर आता आपल्यासाठी नवे नाहीत.

 

toilet paper inmarathi

 

बाजारात निरनिराळ्या क्वालिटीचे टॉयलेट पेपर मिळतात पण तुम्ही जर निरीक्षण केले तर तुमच्या असे लक्षात येईल की या वेगवेगळ्या क्वालिटीच्या टॉयलेट पेपर्सचा रंग मात्र एकाच प्रकारचा असतो तो म्हणजे पांढरा, शुभ्र सफेद!

तुम्ही कितीही स्वस्त किंवा महाग टॉयलेट पेपर खरेदी करा, तो तुम्हाला पांढर्‍याच रंगात मिळेल.

 

white toilet paper inmarathi

 

कधी कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रंग पांढराच का असतो? काय असेल त्याचे कारण ? टॉयलेट पेपर जरी पांढरा असला की तो बघताना अधिक स्वच्छ वाटतो मात्र हे जरी खरे असले तरी फक्त हेच कारण नाही. तर अशी अनेक करणे आहेत ज्यामुळे टॉयलेट मध्ये वापरला जाणारा टॉयलेट पेपर पांढराच असतो.

पाहूया तरी काय कारणे आहेत. टॉयलेट पेपरच्या पांढरेपणाची?

१. त्वचेची काळजी

सुरवातीला म्हणजे १९५० च्या दरम्यान अमेरिकेत रंगीत टॉयलेट पेपर वापरला जात असे. हा रंगीत पेपर बनवण्यासाठी पेपरला डाय केले जाते ज्यामुळे स्कीनवर
इरिटेशन, रेशेस, येवू शकतात किंवा अन्य त्वचारोग देखील होवू शकतात असे आढळून आले.

 

toilet paper 1 inmarathi

 

रंगीत पेपर पांढर्‍या पेपरपेक्षा थोडे जास्त खरखरीत असतात, डाय प्रोसेस करावी लागत असल्याने महाग देखील असतात. त्यापेक्षा पांढरे पेपर सॉफ्ट असतात. आणि वापरायलाही सुरक्षित असतात असे लक्षात आल्यानंतर पांढ-या रंगाला अधिक पसंती मिळू लागली.

 

२. स्वस्तात मस्त

ब्लीच केले जात असल्यामुळे टॉयलेट पेपरचा रंग पांढरा असतो. ब्लीच केलेले नसताना पेपरचा रंग भुरा असतो. जर पेपरला डाय करायचे असेल तर टॉयलेट पेपर बनवणार्‍या कंपन्यांना डाय करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो.

 

toilet paper

 

त्यापेक्षा ब्लीच केलेला पांढरा टॉयलेट पेपर हा कमी उत्पादनखर्च असलेला आणि पर्यावरण पूरक असतो. तो लवकर नष्ट होत असल्याने वापरायला देखील सुलभ आहे.

 

३. वापरण्यायोग्य

टॉयलेट पेपर Cellulose फायबर पासून बनतो जे आपल्याला झाडे किंवा रिसायकल केलेल्या पेपर पासून मिळते. यामध्ये पाणी मिसळून त्याचा लगदा केला जातो, ज्यापासून सर्व प्रकारचे पेपर बनतात. पण जेव्हा हा कागद ब्लीच केला जातो तेव्हा त्याचा टॉयलेट पेपर बनतो.

 

toilet paper exo friendly inmarathi

 

ब्लीचिंगसाठी हायड्रोजन पेरोक्साइड किंवा क्लोरीनचा वापर होतो. ज्यामुळे पेपरचा रंग पांढरा होतो. सेल्युलोज फायबरसुद्धा पंढराच असतो पण त्यामध्ये काही गोष्टी मिक्स असल्याने तो हलक्या भुर्‍या किंवा पिवळ्या रंगाचा दिसतो. ब्लीच केल्यावर मात्र तो पांढरा होतो. त्यातील लिग्निन हे पॉलिमर निघून गेल्याने तो बराच मऊ आणि वापरण्यायोग्य बनतो.

 

४. दीर्घकाळ टिकाऊ

पांढरा टॉयलेट पेपर हा टिकाऊ असतो. म्हणून टॉयलेट पेपर बनवणार्‍या कंपन्या पांढर्‍या रंगाचाच पेपर बनवण्याला प्राधान्य देतात.

 

paper inmarathi

 

जर तुम्ही एखादे जुने वर्तमानपत्र पहिले तर त्याचा रंग पिवळा झालेला दिसतो, जो त्यामधील लिग्निन मुळे होतो पण टॉयलेट पेपर मध्ये लिग्निन नसल्याने तो पिवळा पडत नसल्याने बरेच दिवस वापरला जाऊ शकतो.

 

५. नाजूक भागांसाठीही सुरक्षित

पांढरा टॉयलेट पेपर रंगामुळे वापरताना देखील स्वछ वाटतो. त्यामुळे शौचालयात त्याचा वापर करताना स्वच्छतेची काळजी घेता येते.

 

use of paper

हे ही वाचा – करोना संसर्ग आणि आपला रोजचा टूथ ब्रश…! हे नातं समजून घ्या…अन्यथा…!

सुरवातीच्या काळात शरीराच्या अनेक नाजुक भागांवर या पेपरचा वापर करताना अनेकांच्या मनात भिती, शंका उपलब्ध व्हायची. यासाठी उपाय म्हणजे पांढ-या रंगाचा पेपर. शरीराच्या सर्वात सेंसेटिव्ह भागावर त्याचा वापर होत असल्याने तो सॉफ्ट देखील असतो. उलट रंगीत टॉयलेट पेपर त्यामानाने थोडा खरखरीत आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतो.

आपल्या दररोजच्या वापरातील अनेक वस्तूंचा रंग, आकार यांबाबतची नेमकी माहिती आपल्याला ठाऊक नसते. मात्र ती माहिती मिळवली तर त्या वस्तुंचा अधिक दक्षतेने वापर करता येईल.

तुमच्या माहितीत अशा कोणत्या गोष्टी, वस्तू आहेत का ज्यांच्याबद्दल तुम्हाला अपुरी माहिती आहे?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?