' 'नोकरी' सोडताना घ्या ही खबरदारी; या चुका चुकूनही करू नका!

‘नोकरी’ सोडताना घ्या ही खबरदारी; या चुका चुकूनही करू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

वयाच्या पंचविशीनंतर तुम्ही जी नोकरी करत आहात ती सोडण्यासाठी फार हिंमत लागते असं म्हणतात. त्याचं कारण म्हणजे वयाच्या या टप्प्यानंतर तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करण्यास सुरुवात करावी लागते. याच वयात घराची-संसाराची जबाबदारी अंगावर येते.

अश्या वेळेस एक नोकरी सोडली तर दुसरी आपल्याला लगेच मिळेल का? नाही मिळाली तर काय? कमी पगारात कसं भागवायचं? अश्या अनेक प्रश्नाचं काहूर मनात उठतं.

त्यामुळे या वयात सहसा लोक नोकरी सोडण्यापेक्षा आहे त्याच नोकरीमध्ये समाधान मानतात. जर त्यांना एखाद्या ठिकाणी १०० टक्के खात्रीशीर ऑफर आली तरच हातातील नोकरी सोडण्याचा विचार करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण तुम्ही आर्थिक, वैयक्तिक किंवा इतर कारणांमुळे सध्याची नोकरी सोडण्याचा ठाम विचार केला असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी. कारण नोकरी सोडताना आपण अनेकदा नकळत अश्या काही चुका करतो ज्यांची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते.

 

depression inmarathi

प्रत्येक कंपनीचा एक नोटीस पिरीयड असतो, त्या नोटीस पिरीयडला डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण नोकरी सोडत आहोत असे कळवून राजीनामा द्यावा लागतो. या नोटीस पिरीयडच्या वेळात बहुतेक जण कोणतेही काम सिरीयसली घेत नाहीत.

आपण राजीनामा दिला आहे, अगदी महिन्याभराचा वेळ उरला आहे, त्यानंतर आपण इथे नसणार. त्यामुळे कशाला कंपनीची कामे सिरीयसली घ्या? अश्या भ्रमात नोकरी सोडणारा प्रत्येकजण वागतो आणि ही मोठी चूक ठरते.

या काळात उलट अगदी सिरीयसली, निष्ठेने काम करा. तुमच्यावर दिलेली कोणतीही जबाबदारी अर्धवट सोडून जाऊ नका. म्हणजे तुम्हाला निरोप देताना कंपनी देखील तुमचे काम लक्षात ठेवेल.

एक्सपिरीयन्स लेटर मध्ये तुमची स्तुती करेल, ज्याचा फायदा तुम्हालाच पुढच्या नोकरीसाठी अर्ज करताना होईल.

 

sad-employee-marathipizza02

नोकरी सोडताना ज्या काही प्रक्रिया आणि कागदपत्रे (पी.एफ. मेडिकल बिल्स आणि बरंच काही) पूर्ण करावी लागतात ती पूर्ण करून घेण्यासाठी तुमचा कंपनीमधील शेवटचा दिवस येईपर्यंत वाट पाहू नका.

नोटीस पिरीयडच्या काळातच एच.आर. सोबत बोलून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या, म्हणजे कंपनी सोडल्यावर तुम्हाला वारंवार खेटे घालावे लागणार नाहीत.

फक्त राजीनाम्याचा इमेल पाठवून भागात नाही. तुम्ही तुमच्या बॉसशी स्वत: बोलून तुम्ही नोकरी का सोडत आहात – ते समजावून सांगणे गरजेचे आहे.

असे न केल्यास तुमचे काम चांगले असून देखील, तुम्ही केवळ इमेल द्वारे नोकरी सोडत असल्याचे कळवल्यास बॉसच्या मनात तुमच्याविषयी चुकीची भावना निर्माण होऊ शकते आणि त्याचा फटका तुम्हाला रेकमेंडेशनच्या वेळी बसू शकतो.

 

 

कारण आजकाल बऱ्याच कंपन्या आपल्या नवीन कर्मचाऱ्यांचा बॅकग्राउंड जाणून घेण्यासाठी त्यांच्या पूर्वीच्या कंपनीशी संपर्क साधतात. अश्यावेळेस तुमचा बॉस तुमच्या बद्दल नकारात्मक मत नोंदवू शकतो.

आधी ज्याठिकाणी नोकरीला होता, त्या ठिकाणी तुमच्या सोबतीला कार्यरत असणाऱ्या सहकार्यांच्या संपर्कात रहा, त्यांचे संपर्क क्रमांक जवळ बाळगा.

जेणेकरून भविष्यात तुमच्या नव्या जॉब संदर्भात कुठलीही अडचण निर्माण झाल्यास, तुम्हाला ह्या संपर्क क्रमांकांची मदत होऊ शकते. नोकरी सोडण्या अगोदर आपला संपर्क मजबूत करणे गरजेचे आहे.

तुम्ही ज्या नवीन नोकरीसाठी अर्ज केला असेल, त्यांच्यापासून काहीही लपवू नका.

बरेच जण केवळ त्या ठराविक कंपनीमध्ये नोकरी मिळावी म्हणून अनेक गोष्टी लपवतात. ज्या पुढे कंपनीला माहित पडल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. कदाचित नोकरी वरून काढले जाण्याची शक्यात देखील असते.

resignation inmarathi

 

त्यामुळे नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यूच्या वेळी सर्व गोष्टी स्पष्ट करा. तसेच तुम्ही सध्या ज्या कंपनीमध्ये कामाला आहात त्यांना देखील खोटे कारण देऊ नका. जे तुमच्याच हिताचे असेल.

जुनी नोकरी सोडताना बऱ्याचदा दडपण येत असतं. ह्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर आणि तुमच्या दैनंदिन कामकाजावर होणार नाही  याची विशेष काळजी घ्या. तुमच्या आर्थिक गरजा भागू शकतील इतकी पर्यायी व्यवस्था निर्माण करून ठेवा.

तुमच्या परिवारवर तुमच्या या निर्णयाचा काय परिणाम होतो,  हे विचारात घ्या. त्यांना विश्वासात घेऊनच कुठलाही निर्णय घ्या. जेणेकरून अतिरिक्त दडपण येणार नाही.

तर या गोष्टी लक्षात ठेवा, स्वत:वर विश्वास ठेवा. कोणतेही दडपण मनावर येऊ न देता सध्याची नोकरी सोडा आणि नव्या दमाने आपले करियर उभारण्यासाठी नवीन कंपनी जॉइन करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?