' स्वातंत्र्यपूर्व काळातील या पहिल्या “स्वदेशी” ब्रँडला टागोरांनी दिलं होतं नाव! – InMarathi

स्वातंत्र्यपूर्व काळातील या पहिल्या “स्वदेशी” ब्रँडला टागोरांनी दिलं होतं नाव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आयुष्याच्या प्रवासात, शाळा हा एक सुंदर टप्पा असतो. अनेक सोनेरी आणि गोड आठवणी आपल्या सगळ्यांच्याच स्मृतीत कायमच्या कोरलेल्या असतात. या शाळेच्या सुंदर पोथीतील, पेन्सिलवरून पेनवर होणाऱ्या प्रमोशनचा अध्याय, ही एक मोठी उपलब्धी आपल्याला वाटत असते.

नवीन वर्ग, आता त्यात मोठ्यांसारखं पेन ने लिहायचं, ह्या सगळ्यामुळे आपल्याला अगदी मोठे झाल्या सारखे वाटते. आणि जेव्हा आपल्या हातात पेन येतं, आणि विविध प्रकारच्या पेनांबद्दल आपल्याला कळतं, तेव्हा पेनांमधील एका अतिशय सुंदर आणि आकर्षक “शाईच्या फाउंटन पेन” रत्नाबद्दल आपल्याला नव्याने कळून येतं.

 

25 pencil inmarathi

 

हे रत्न आपल्याजवळ असेल तर आपण खूप हुशार होऊ किंवा आपलं अक्षर अगदी मोत्यांसारखं येईल य आशेमुळे ते पेन आपल्याला काहीही करून मिळवायचंच असतं. सोनेरी निब, त्यात शाई भरायची आणि एखाद्या इंग्लिश सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या लेखकाप्रमाणे, मोठ्या स्टाईलने त्या पेनने लिहायचं हे आपल्या सगळ्यांनाच खूप एक्सायटिंग वाटतं. इतक्या सुंदर आठवणी आणि भावना आपल्या या फाउंटन पेनशी जोडलेल्या असतात.

 

fountain inmarathi

 

तर हे फाउंटनपेन कसं निर्माण झालं किंवा आपल्या भारतात सगळ्यात आधी कोणी आणलं हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेलच. आज तो विषयच नाहीये, आज तर आपण आपल्या भारतातील स्वदेशी शाईबद्दल बोलणार आहोत, जी या फाउंटन पेनसाठी वापरली जायची.

“सुलेखा” हा ब्रँड स्वातंत्र्यपूर्व काळातील शाईचा पहिला स्वदेशी उत्पादनाचा ब्रँड होता. १९०५ साली लॉर्ड कर्जनच्या डोक्यातुन निघालेल्या विनाशक बंगाल विभाजनाच्या संकल्पनेमुळे भारतात स्वदेशी चळवळ सुरू झाली. याच काळात अनेक नामवंत ब्रँड्सचा, जसे – एशियन पेंट्स, टाटा स्टील, लॅक्मे कॉस्मेटिक्स, इत्यादी यांचा जन्म झाला.

 

sulekha ink inmarathi

हे ही वाचा – टागोरांच्या प्रेरणेने राष्ट्रगीत लिहिणाऱ्याचा सरकारने घेतला बळी! एक अस्वस्थ करणारी कथा

हीच स्वदेशी चळवळ १९३० साली नव्या जोमाने पेटून उठली तेव्हा प्रसिद्ध झालेला आणखीन एक ब्रँड म्हणजे “सुलेखा शाई”. पण ही पहिली स्वदेशी शाई नव्हती. त्याआधी सतीश चंद्र दास गुप्ता यांच्या “कृष्णाधरा” शाईला सगळ्यात पहिली स्वदेशी शाई असल्याचा मान प्राप्त आहे.

असे म्हणतात महात्मा गांधी जेव्हा आपले लिखाणकाम करण्यासाठी स्वदेशी शाई शोधत होते, तेव्हा या कृष्णाधरा शाईबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यांनी पुढे हा फॉर्म्युला वापरून शाई बनवण्यासाठी सगळ्या उत्पादकांना आग्रह केला आणि नैनगोपाल आणि शंकराचार्य मोईत्रा या दोन बंगाली बंधूंनी या संधीचं सोनं करण्याचं ठरवलं.

 

mahatma-gandhi-inmarathi

 

चंद्र दास गुप्ता यांनी आवडीने त्यांचा फॉर्म्युला या दोन बंधूंना दिला आणि बंगालच्या (आताच्या बांगलादेशच्या) राजशाहित सुलेखा शाईचा नवा अध्याय रचण्याची सुरुवात झाली. मोईत्रा बंधू हे कट्टर देशप्रेमी होते. ब्रिटिशांविरोधी कारवाया  करण्याच्या आरोपात त्यांना कारागृहात टाकण्यात आले होते. पण शिक्षा पूर्ण होऊन, सुटून आल्यावर ही  पहिली संधी त्यांनी जी मिळाली तीचा त्यांनी पूर्ण वापर करून घेतला.

 

sulekha 1 inmarathi

 

लवकरच या शाईने अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. आधी, ही  शाई प्रोफेसर मोईत्रांची शाई म्हणून ओळखली जायी. पण, जेव्हा दुकानदारांनी या ब्रँडच्या नावाची विचारणा केली तेव्हा तिचं नाव ठेवण्याचं ठरवलं जाऊ लागलं. असं म्हणतात, स्वतः गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या  शाईचं नाव “सुलेखा” असं सुचवलं.

या शाईच्या टेक्श्चरमुळे, क्वालिटीमुळे शाईचा खप दिवसागणिक वाढू लागला. गांधीजी, मोरारजी देसाई, बिधान चंद्र रायपासून प्रसिद्ध फिल्म मेकर सत्यजित रे हे सगळेच फक्त आणि फक्त सुलेखा शाईचाच वापर करायचे. आणि अशा सुप्रसिद्ध व्यक्ती सुद्धा ही शाई वापरतात म्हटल्यावर ह्या शाईचा खप वाढतच गेला.

सुलेखा शाई, ही सुरुवातीला प्रायव्हेट कंपनी होती पण तिच्या सतत द्विगुणित होणाऱ्या यशामुळे १९४६ साली तिला भारतीय स्टॉक मार्केटवर लिस्ट करण्यात आलं आणि सुलेखा प्रायव्हेट लिमिटेड पासून ती आता सुलेखा पब्लिक लिमिटेड झाली. त्यानंतर, ही शाई फक्त कलकत्त्यापुरतीच सिमीत उरलेली नसून, सुलेखा शाईचे २ युनिट्स आता सोदेबाद आणि उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे सुरु करण्यात आले.

 

sulekha 2 inmarathi

 

भारताबाहेर दक्षिण आशिया आणि आफ्रिका इथल्या सरकारांनी जगभरातून कंपन्यांना आपल्याकडे व्यवसाय करण्याचं निमंत्रण दिलं त्यात सुलेखा कंपनीचा सुद्धा समावेश होता. सुलेखा शाई आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपली छाप सोडत होती. पण १९८० च्या दरम्यान बंगालमध्ये व्यावसायिक अस्थिरता वाढत होती.

कॅपिटॅलीसमला विरोध म्हणून कामगार आणि ग्राहक कंपन्यांचा विरोध करू लागले.या अस्थिरतेमुळे कंपनी तोट्यात जाऊ लागली आणि १९९३ साली कंपनी लिक्विडेट करून व्यवसाय बंद करावा लागला.

 

sulekha 4 inmarathi

 

२००६ साली सुलेखाने पुन्हा दणदणीत कमबॅक केला. पण यावेळी शाई नाही, तर इतर उत्पादनं जसे स्टेशनरी, सोलर उपकरणं, होमकेयर वस्तू यांची निर्मिती सुरु करण्यात आली. पण, गेल्या काही वर्षांपासून, पर्यावरण पूरक पर्यायांच्या निवडीकडे ग्राहकांचा कल झुकत असल्याने, त्यांनी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो पेनना नारळ देऊन, पुन्हा स्टील किंवा मेटल पासून बनलेल्या फाउंटनपेनकडे आपला कल वळवला आहे. भरीस भर म्हणून, “आत्मनिर्भर भारत” या चळवळीपासून स्वदेशी शाई वापरावी म्हणून सुलेखा शाईची पुन्हा मागणी वाढली आहे.

सुलेखा कंपनीने पूर्ण पणे शाईचं उत्पादन बंद केलेलच नव्हतं, पण ते फार लिमिटेड स्टॉकचं उत्पादन करत. पण या दोन चळवळींपासून, शाईची मागणी वाढल्यामुळे पुन्हा निर्मितीने जोर धरला आहे. सुलेखा शाईचे मॅनेजिंग डायरेक्टर, कौशिक मोईत्रा यांच्या म्हणण्यानुसार, आजही त्यांची शाई, ओरिजनल फॉर्म्युला वापरून, त्याच पद्धतीने बनवली जाते. फक्त त्यात २ रंग वाढले आहेत.

 

fountain ink colours inmarathi

 

आधी फक्त रॉयल ब्लु, या रंगाची शाई बनवली जाई पण आता लाल आणि काळ्यारंगाची शाई सुद्धा बनवली जाते. विंटेज फील येण्यासाठी, जुन्याच पॅकिंग स्टाईलचा वापर करण्यात आला आहे. वरून लागणारं बेसिक पॅकिंग मटेरियल हे शांतिनिकेतन येथून मागवण्यात येतं. त्यामुळे, सुलेखा ही संपूर्ण स्वदेशी शाई आहे. आज अमेरिका, ग्रीस आणि युरोपच्या काही देशात ही शाई एक्स्पोर्ट करण्यात येते.

आजकालच्या या डिजिटल काळात सुलेखा शाईचा कमबॅक अतिशय दणदणीत झाल्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद वाटायला हवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?