' बाबुजींच्या अजरामर गीतांच्या खजिन्यातील ही १० खास गाणी नक्की ऐका – InMarathi

बाबुजींच्या अजरामर गीतांच्या खजिन्यातील ही १० खास गाणी नक्की ऐका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“कानडा राजा पंढरीचा” म्हणत कधी त्यांनी भक्तीमार्ग दाखवला तर कधी “सखी मंद झाल्या तारका” म्हणत प्रेमातली हुरहुर सांगितली. ज्येष्ठ कवी ग दि माडगुळकर लिखीत ‘गीतरामायणातील’ त्यांचे स्वर डोळे मिटून ऐकले की नजरेसमोर प्रभुश्रीरामाची एक देखणी मुर्ती आपोआप उभी राहते.

आपल्या सुरांतून विश्वदर्शन घडवणारे सुधीर फडके अर्थात बाबुजी यांची आज पुण्यतिथी! २९ जुलै २००२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला मात्र आपल्या अजरामर कलाकृतीतून आजही रसिकांच्या मनावरील त्यांचे गारुड कायम आहे.

 

sudhir phadke inmarathi

 

बालपणातील दंगामस्ती असो, तारुण्यातील प्रणय किंवा उतरत्या वयातील भक्ती, बाबुजींच्या स्वरांशिवाय आयुष्यातील प्रत्येक टप्पा अपूर्णच!

बाबुजींच्या सुरेल खजान्यातील १० अजरामर गाण्यांचा हा धावता आढावा प्रत्येक संगीतप्रेमींनी अनुभवायलाच हवा.

 

१. स्वये श्री राम प्रभु ऐकती

 

 

बाबुजी आणि गदिमा या अलौलिक जोडगोळीचा अविष्कार म्हणजे गीतरामायण! यापुढील प्रत्येक पिढीला मराठीतून रामायणाचा गोडवा पोहोचवणारं हे काव्य आणि त्यातील प्रत्येक रचना यांचे वर्णन शब्दांत करणं शक्य नाही.

आजही हे गीत ऐकताना बाबुजींच्या स्वरांमुळे आजही डोळ्यांसमोर नकळत रामराज्य उभ राहतं.

२. आकाशी झेप घे रे पाखरा

 

 

बाबुजींच्या या शब्दांनी अनेकांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची, जगण्याची उर्जा दिली. तुम्हालाही हा अनुभव आला आला असेल ना? ‘आराम हराम आहे’ या चित्रपटातील या गाण्याचे शब्द, बाबुजींचे स्वर आजही चीरतरुण आहेत.

३. सखी मंद झाल्या तारका

 

 

भक्तीगीतं गाणाऱ्या बाबुजींनी भावगीत क्षेत्रातही आपलं मोठं योगदान दिलं आहे.

प्रियकर प्रेयसीतील हुरहुर बाबुजींनी अत्यंत तरलेनेते मांडली आहे. आजच्याही पिढीतील अनेक तरुणांना हे गाणं गुणगुणावसं वाटणं यातच त्याचं त्यांचं खरं यश आहे.

४. विठू माऊली तु माऊली जगाची

 

 

विठुरायाची भक्ती सांगणारं हे गीत बाबुजींनी आपल्या स्वरांनी असं रंगवलं की डोळे मिटताच साक्षात विठ्ठलाचं रुप उभं रहावं.

‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील हे गाणं आजही ऐकलं जातं.

५. कशी नशिबानं थट्टा आज मांडली

 

 

बाबुजींच्या अजरामर गीतांतील एक महत्वाचं गाणं म्हणजे कशी नशिबानं थट्टा आज मांडली. या गाण्याने इतिहास रचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागु यांच्यावर चित्रित झालेल्या पिंजरा या चित्रपटातील या गाण्यात आयुष्याचं सार मांडण्यात आलं. परिस्थितीने थकलेल्या, गांजलेल्या प्रत्येकाला हे गाणं आजही आपलंसं वाटतं याचं सगळं श्रेय बाबुजींच्या स्वरांनाच!

६. उद्धवा अजब तुझे सरकार

 

 

‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील हे गाणं बाबुजींच्या आवाजात ऐकताना आजही ताजं वाटतं. ग दि माडगुळकरांचे शब्द आणि बाबुजींचे स्वर हे अजब रसायन अनुभवणं म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच!

मागील दीड वर्षापासून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती दिल्यानंतर हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, अर्थात विनोदाचा भाग वगळता हे गीत आजच्या परिस्थितीवरही भाष्य करतं.

७. संथ वाहते कृष्णामाई

 

 

कृष्णा नदीचं इतकं सुंदर वर्णन इतर कोणत्याही गीतांतून तुम्हाला अनुभवता येणार नाही.

कृष्णेच्या तिरावर आळवले जाणारे हे सूर आजही चीरतरुण भासतात. बाबुजींनी आपल्या अनेक कार्यक्रमात दर्दी रसिकांच्या आग्रहास्तव हे गीत गायले आहे.

८. देहाची तिजोरी

 

 

‘आम्ही जातो आमच्या गावा’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील हे गाणं अविस्मरणीय आहे. बाबुजींच्या आवाजातील हे श्रवणीय गीत म्हणजे परमेश्वराकडे केलेली आर्त साद. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांच्या ओठी कायम असतं.

९. तोच चंद्रमा नभात 

 

 

बाबुजींचं सर्वाधिक आवडतं भावगीत म्हणजे तोच चंद्रमा नभात! भक्तीगीत गाणा-या बाबुजींनी प्रेमगीतांची ही बाजुही लिलया सांभाळली होती.

प्रेयसी आणि चंद्र हे जुनं नातं बाबुजींनी आपल्या स्वरांनी असं काही गुंफलं की वर्षानुवर्ष चंद्राकडे पाहताना प्रत्येक पिढी हे शब्द गुणगुणतेच.

१०. तुझे गीत गाण्यासाठी

 

 

भावगीतातील आणखी एक अजरामर कलाकृती म्हणजे ‘तुझे गीत गाण्यासाठी सुर राहू दे’. सुरांच्या जगात रमणाऱ्या या अवलियाने प्रत्येक कलाकाराची कथा या गाण्यातून मांडली होती.

ही होती बाबुजींच्या काही अजरामर कलाकृतीतीपैकी निवडक गीते. त्यांच्या यशाची ख्याती सांगणारी यादी खूप मोठी आहे.

ही गाणी म्हणजे केवळ माझं श्रेय नसून ग दि माडगूळकर, सुधीर मोघे, मंगेश पाडगावकर अशा दिग्गज, प्रतिभासंपन्न गीतकारांच्या शब्दांशी साथ मिळाल्यानेच आपल्याला उत्तमोत्तम गीते सादर करता आली असं म्हणत बाबुजी कायमच समकालीन कलाकारांना श्रेय द्यायचे.

गायक, संगीतकार, संगीत संयोजक अशा अनेक आघाड्यांवर आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या बाबुजींना इनमराठीतर्फे भावपुर्ण आदरांजली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?