' तुमच्या लाडक्या जुन्या अभिनेत्री सध्या कशा दिसत आहेत? फोटो बघून चकित व्हाल!!

तुमच्या लाडक्या जुन्या अभिनेत्री सध्या कशा दिसत आहेत? फोटो बघून चकित व्हाल!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जुनं ते सोनं अशी आपल्याकडे म्हण आहे, खरं तर काही बाबतीत ती योग्य आहेच. कारण चुली सोडून आपण गॅसकडे वळलो मात्र आताच्या काळात त्याच चुलीवरच्या जेवणासाठी आपण कित्येक किमी प्रवास करत गावाकडे जातो. घरातील तांब्या पितळ्याची भांडी पुन्हा एकदा वापरायला काढतो.

काळ बदलतो तसे आपण बदलत असतो तसेच आपले शरीर सुद्धा बदलत असते, मग तो सामान्य माणूस असो किंवा सिनेतारका. मुळात अभिनेत्रीचं करियर हे काही वर्षांचं असतं त्यानंतर त्या कधी आईच्या रोलमध्ये दिसतात, तर कधी अगदी छोट्या रोलमध्ये. वाढत्या वयाबरोबरीने त्यांच्या चेहऱ्यात बदल होत असतात. अशाच काही जुन्या अभिनेत्रींचे आताचे आणि पूर्वीचे फोटो बघणार आहोत…

१. मुमताज :

सत्तरच्या दशकातील राजेश खन्ना आणि मुमताज ही हिट जोडी होती. जय जय शिव शंकर हे दोघांवर चित्रित झालेले गाणं आजही अनेकांच्या लक्षात आहे. मुमताज या लग्नांनंतर मुमताज माधवानी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

 

actress old inmarathi

 

२. पद्मिनी कोल्हापूरे :

वयाच्या ७ वर्षीच त्यांनी या चंदेरी दुनियेत आपले पाऊल टाकले, वडील शास्त्रीय गायक त्यामुळे कला साहजिकच त्यांच्यात सुद्धा आली. बालकलाकार ते मुख्य अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे, नुकताच त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत पहिला मराठी सिनेमा केला आहे.

 

actress old 1 inmarathi

 

३. झीनत अमान:

मादक सौंदर्य म्हणून ओळख असणारी ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लुकमुळेच कायम चर्चेत राहिली. काही वर्षांपूर्वी आलेल्या पानिपत सिनेमात त्या एका विशेष भूमिकेत दिसल्या.

 

actress old 2 inmarathi

 

४. सायरा बानो :

दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ प्रेमात बुडलेल्या सायरा बानो या शेवटपर्यंत दिलीप कुमारांसोबत होत्या. सायरा बानो यांच्या आई सुद्धा एकेकाळी अभिनेत्री होऊन गेल्या आहेत.

 

actress old 3 inmarathi

 

५. अन्नू अग्रवाल :

आशिकी गर्ल म्हणून ओळखली गेलेली अन्नू, एका अपघाताने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. कधीकाळी सिनेमात तिचा आकर्षक चेहरा आणखीनच खुलुन दिसायचा मात्र अपघाताने तिच्या चेहऱ्यावरचे सौंदर्य गायब झाले.

 

 

६. रेखा :

रेखा म्हणजे एक वादळ असंच म्हणायला हवं, कारण अगदी लहान वयापासून ते अगदी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंग होऊन गेले. बोल्ड लूक, सिनेअभिनेत्यांसोबत प्रेमप्रकरणांमुळे जास्तच चर्चेत राहिल्या.

 

हे ही वाचा – ‘विवाहानंतरच मातृत्व’ : या सामाजिक बंधनाला झुगारणाऱ्या ७ ‘खऱ्या बोल्ड’ अभिनेत्री!

७. जयाप्रदा :

भारतीय स्त्रीचं एक निखळ सौंदर्य म्हणून कायमच जयप्रदा यांच्याकडे बघितले जायचे. जयाप्रदा या मूळच्या साऊथच्या नंतर त्यांनी हिंदी सिनेमात आपले नाव कमावले. जिंतेद्र यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमात काम केले आहे.

 

 

८. आशा पारेख :

बालकलाकार म्हणून बेबी आशा पारेख या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. ग्लॅमर गर्ल आणि नृत्यांगना अशी ओळख असलेल्या आशाजींनी ६० ते ७० च्या दशकात अनेक हिट सिनेमात काम केले.

 

actress 7 inmarathi

 

९. अमृता सिंग :

सारा अली खानची आई अशी नवी ओळख निर्माण झालेल्या अमृता सिंग, सनी देओल सोबत बेताब सिनेमात काम करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. टू स्टेट मधल्या खाष्ट पंजाबी आईची भूमिका त्यांनी उत्तमरित्या केली होती.

 

actress old 8 inmarathi

 

१०. हेलन :

डान्सर म्हणून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या हेलनजींनी तब्बल ७०० सिनेमात काम केले आहे. डॉन सिनेमात ‘ये मेरा दिल…’ हे त्याच्यावर शूट झालेले गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे.

 

actress old 11 inmarathi

 

११. शबाना आझमी :

समांतर सिनेमाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या शबाना आझमी यांनी अनेक उत्तम भूमिका वठवल्या आहेत. त्यांचा ‘इजाजत’ हा सिनेमा लक्षात राहतो ते त्यामधील असलेल्या गाण्यांमुळे, त्या नेहमीच आपले मत परखडपणे मांडत असतात.

 

actress old inmarathi 12

 

१२. रीना रॉय :

ज्या काळात इंटिमेट सीन देण्यासाठी अभिनेत्री नकार द्यायच्या त्या काळात रीना रॉय यांनी ‘जरुरत’ सिनेमात इंटिमेट सीन दिले होते. नागीन हा लक्षात राहिला असं त्याचा सिनेमा, खरं तर कालिचरण सिनेमाने त्यांना स्टार बनवले. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत त्यांचे नाव कायमच जोडले जात होते.

 

reena inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?