' जमिनीवर राहायला जागा नाही? नो टेन्शन, हे गाव चक्क 'जमिनीखाली' वसवलंय...

जमिनीवर राहायला जागा नाही? नो टेन्शन, हे गाव चक्क ‘जमिनीखाली’ वसवलंय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपली आकाशगंगा कशी असेल ? आपण राहतो त्या जमिनीखाली काय असेल ? याचं माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. कुतूहल आहे म्हणून संशोधन आहे असं म्हणता येईल.

हजारो वर्षांपूर्वी द्वापर युगात मगध देशाचा राजा जरासंध पासून मथुरेच्या जनतेला वाचण्यासाठी श्रीकृष्णाने पाण्याखाली द्वारका हे शहर वसवलं होतं. ‘विश्वकर्मा’ यांनी द्वारका मध्ये बांधलेले राजमहाल ‘महाभारत’मध्ये बघून आपले डोळे दिपले होते.

 

dwarka under water-feature InMarathi

 

आजच्या काळात असं एखादं शहर हे जमिनीखाली वसलेलं असेल यावर आपला विश्वास बसणं कठीण आहे. पण, दक्षिण ऑस्ट्रेलिया मध्ये ‘कुबर पेडी’ नावाचं एक असं गाव आहे जिथे लोक कित्येक वर्षांपासून लोक जमिनीखालीच राहतात. तिथेच त्यांनी आपलं एक विश्व तयार केलं आहे. ‘जमिनीखाली’ म्हंटलं की, आज आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे, “तिथे नेटवर्क येतं का ?” ह्या आणि अश्या इतर प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

 

kuber pedi 2 inmarathi

 

‘कुबर पेडी’ या गावातील घरं हे बाहेरून सामान्य दिसत असले तरीही ते आजच्या काळातील ‘लक्झरीयस’ घरांसारखे आहेत. सर्व सोयींनी अद्ययावत असलेली ही घरं जमिनीखालीच बांधायची तिथे पद्धत आहे.

हे घरं खाणींच्या जागेत म्हणजे ‘ओपल’ मध्ये बांधले जातात. सध्या अश्या प्रकारची एकूण १५०० घरं ही ‘कुबर पेडी’ मध्ये अस्तित्वात आहेत. या घरांना ‘डग-आऊट्स’ या नावाने ओळखलं जातं.

‘ओपल’ काय आहे ?

जगातील सर्वात जास्त ‘ओपल माईन्स’ म्हणजेच पांढरे शुभ्र खडक असलेल्या ‘कुबर पेडी’ ला त्याची राजधानी ‘ओपल कॅपिटल’ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. १९१५ मध्ये इथे खाण काम सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळी इथल्या लोकांना खूप त्रास झाला होता.

‘कुबर पेडी’ हे गाव म्हणजे एक वाळवंटी प्रदेश आहे. इथलं तापमान हे उन्हाळ्यात प्रचंड वाढलेलं असतं आणि हिवाळ्यात प्रचंड कमी झालेलं असतं.

 

kuber pedi inmarathi 1

 

भौगोलिक दृष्ट्या इथे जमिनीवर निरोगी रहाणं हेच एक मोठं आवाहन आहे. हे आवाहन पेलण्यासाठी हे लोक जमिनीखाली जाऊन राहतात. जमिनीखालची जागा ही खाणींमुळेच तयार झालेली आहे. जमिनीखालील या घरांमध्ये उन्हाळ्यात ना AC ची गरज असते ना हिवाळ्यात ‘हिटर’ ची गरज असते.

‘कुबर पेडी’ या गावात कित्येक हॉलीवूड च्या सिनेमांची शुटिंग झालेली आहे. २००० साली शुटिंग करण्यात आलेल्या ‘पिच ब्लॅक’ या सिनेमात शुटिंग साठी वापरण्यात आलेलं एक ‘स्पेसशिप’ हे निर्मात्यांनी ‘कुबर पेडी’ मध्येच ठेवल्याने ती या गावाची ओळख झाली आहे. हौशी पर्यटकांसाठी जमिनीखालील घरं आणि ही ‘स्पेसशिप’ बघणं ही एक पर्वणी असते.

 

kuber pedi 3 inmarathi

 

‘कुबर पेडी’ या जमिनीखालच्या गावात घरांप्रमाणेच बार, चर्च सुद्धा बघायला मिळतात हे विशेष आहे. जमिनीवरच्या घरांना जशी घरातील धूर बाहेर पडण्यासाठी उंचावर एक ‘चिमनी’ दिलेली असते तशी ‘चिमनी’ आपल्याला ‘कुबर पेडी’ मध्ये चालतांना जमिनीवर दिसते. जमिनीवर चालतांना जसे लाल रंगाचे ‘नो एन्ट्री’ चे बोर्ड दिसतात तसे ‘कुबर पेडी’ मध्ये जमिनीवर ‘अनमार्क होल’ असे बोर्ड लावलेले आहेत.

१९१६ मध्ये १२० डिग्री इतकं तापमान बघणाऱ्या ‘कुबर पेडी’ मध्ये ‘डग-आऊट्स’ हे एखाद्या संरक्षक कवच म्हणून प्रत्येकाने स्वतःसाठी राखून ठेवलेलं असतं. जगात उपलब्ध असलेल्या ‘ओपल’ पैकी ९५% ‘ओपल’ खनिज हे ‘कुबर पेडी’ मध्येच सापडतं अशी नोंद आहे. फरक इतकाच पडला आहे की, आता हे काम मशिनच्या सहाय्याने केलं जातं.

जमिनीवरून एखाद्या चिखलाचे गोळे सारख्या दिसणाऱ्या या घरांमध्ये ‘कुबर पेडी’ येथील ६०% जनता राहते ही एक कमाल गोष्ट आहे. आपल्यासारखंच त्यांच्या सणांना हे लोक घर सुशोभित करणे, उत्सव एकत्र साजरा करणे अशी कामं करत असतात.

 

kuber pedi inmarathi

हे ही वाचा – पाकिस्तानची घुसखोर महिला बनली भारतातल्या गावाची सरपंच: वाचा नेमकी भानगड

आपल्या वेगळेपणामुळे जगात प्रसिद्ध असलेल्या ‘कुबर पेडी’च्या लोकांना जमिनीवर स्थलांतर हे सहज शक्य आहे. पण, तिथले लोक तसं करत नाहीत. कारण, आपण ज्या घरात राहतो त्या घरासोबत आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं.

‘कुबर पेडी’ च्या लोकांना जमिनीवरील जगातील सुखवस्तू बघण्यापेक्षा जमिनीखालील घरासोबतचं त्याचं नातं हे जास्त जवळचं वाटतं. दररोज रात्री हे नातं ते टिकवून ठेवण्याससाठी ‘कुबर पेडी’चे लोक एकही पायरी न चढता, काही पायऱ्या उतरून रोज आपल्या घरात पोहोचतात. दक्षिण ऑस्ट्रेलियाला फिरायला जाणार असाल तर ‘कुबर पेडी’ला तुम्ही भेट देऊ शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?