' पॉर्न बघताय इथवर ओके… पण ते शेअर करण्याआधी हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत! – InMarathi

पॉर्न बघताय इथवर ओके… पण ते शेअर करण्याआधी हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एका ठराविक वयात असतांना ‘पॉर्न विडिओ’ बघण्याचं प्रत्येकाला आकर्षण असतं. ‘सेक्स एज्युकेशन’च्या नावाने उदासीनता असलेल्या आपल्या देशात ‘पॉर्न’ बघण्याची उत्सुकता ही आपली इकोसिस्टिम निर्माण करते असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

स्वस्त इंटरनेट आणि वेबसिरीजचा भडिमार यामुळे काही वर्षात येणाऱ्या पिढ्यांमध्ये जरा तरी निरागसता असेल की नाही? हा समाजाला भेडसावणारा पण नेहमीच दबक्या आवाजात बोलला जाणारा एक प्रश्न आहे.

 

mastram inmarathi

 

OTT माध्यमांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्यानंतर कधी कधी असा प्रश्न पडतो की, बाकी जवळपास प्रत्येक बाबतीत नियमावली तयार असलेल्या आपल्या देशात “पॉर्न बघण्यासाठी काही नियम आहेत की नाही?” आपण कोणाला तरी “पॉर्न बघतांना थांबवू शकतो की नाही?” या बाबतची नियमावली या लेखात देत आहोत.

१. पॉर्न विडिओ बघितल्याने तुम्हाला कोणीही जेल मध्ये टाकू शकत नाही हे जरी खरं असलं तरीही जर तुम्ही हे विडिओ समाजात वावरतांना बघितले तर तुमच्या विरुद्ध तक्रार होऊ शकते.

२. ‘चाईल्ड पॉर्न’ हा एक गलिच्छ प्रकारसुद्धा इंटरनेटवर अपलोड केला जातो. या प्रकारच्या विडिओ तयार करणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीवर अमेरिका, इंग्लंड या देशांप्रमाणे भारतात सुद्धा दोषी व्यक्तीला शिक्षा होणं हे शक्य आहे.

मुळात असे विडिओ तयार होणं हाच आपल्या इकोसिस्टिमचा पराभव आहे. पण, जर तुम्हाला असा कोणताही कंटेंट कोणी पाठवला तर त्याची तक्रार नक्की करा.

 

child porn inmarathi

 

३. तुम्ही जर इतर कोणालाही पॉर्न विडिओ बघण्यास भाग पाडत असाल तर त्यासाठी तुम्हाला ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. असे प्रकार तरुणपणी हॉस्टेलसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात.

अश्या तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचण्याची फक्त गरज आहे. तुम्हाला जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी कोणी पॉर्न विडिओ किंवा फोटो पाठवले तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीची पोलिसांकडे रीतसर तक्रार करू शकतात.

हे ही वाचा ३० हून अधिक महिलांनी ‘तसले’ व्हीडिओ विनापरवानगी वापरणाऱ्या साईटवर केली केस!

कायद्यात या संदर्भात कोणती तरतूद आहे?

सेक्शन ६७, ६७अ आणि ६७ब हे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे अधिकार मानले जातात. सेक्शन ६७ हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर कोणत्याही अश्लील कंटेंटचा प्रसार होत असेल तर त्याबद्दल होणाऱ्या शिक्षेबद्दल माहिती देतो.

कोणताही गुन्हेगार असं कृत्य करतांना आढळल्यास त्याला ३ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. जर असा गुन्हा दुसऱ्या वेळेस घडला तर ही शिक्षा १० लाखांपर्यंत वाढवण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे.

सेक्शन ६७ अ हे अशा समूहांना शिक्षा करू शकते जे लोक असा कंटेंट इंटरनेटवर प्रसिद्ध करत असतात. काही प्लॅटफॉर्मवर विडिओज हे ‘ऑटो प्ले’ या प्रकारात अपलोड केलेले असतात.

 

porn 3 inmarathi

 

आपल्याला जर अश्या कोणत्या प्लॅटफॉर्ममुळे आक्षेपार्ह कंटेंट बघावा लागला तर तुम्ही अश्या समूहाची रीतसर तक्रार करू शकतात. संबंधित आरोपींना ७ वर्षांची शिक्षा होण्याची तरतूद कायद्यात आहे.

सेक्शन ६७ ब हे प्रामुख्याने ‘चाईल्ड पॉर्न’ साठी तयार करण्यात आलं आहे. कोणत्याही माध्यमातून असं कोणतं कंटेंट तुमच्यासमोर आलं तर तुम्ही ते पाठवणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांसाठी जेल मध्ये पाठवू शकतात. यामध्ये इतरही शक्यतांची खालीलप्रमाणे दखल घेण्यात आली आहे :

१. टेक्स्ट मेसेज किंवा इमेज जरी कोणी तुम्हाला पाठवली तर तुम्ही त्याची तक्रार करू शकतात आणि केलीच पाहिजे.

२. ‘चाईल्ड पॉर्न’चा इंटरनेटवर शोध घेणे, बघणे, डाउनलोड करणे यामुळे सुद्धा त्या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीला कडक शिक्षा केली जाऊ शकते.

तुम्हाला कोणी कोणत्याही स्वरूपातील ‘पॉर्न’ फोटो पाठवले तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पोलिसांकडे तक्रार करू शकतात.

‘सेक्स स्टोरीज’ च्या टेक्स्ट प्रकाराबद्दल फक्त कायद्यात तरतूद केलेली आहे. जर का या स्टोरीज लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी लिहिल्या गेल्या असतील तर मात्र त्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. पण, हा प्रकारसुद्धा ‘पॉर्नोग्राफी’ मध्येच मोडला जातो.

 

savita bhabhi inmarathi

 

कायद्याच्या पुस्तकात बघितलं तर ‘पॉर्न’ बघणे, मोबाईल, लॅपटॉपवर डाउनलोड करणे, इतरांना पाठवणे, विकणे हे सर्वच अवैध आहे. पण, हे किती लोक पाळतात हे आपण सध्या बघतच आहोत.

उत्तराखंड हायकोर्टने मध्यंतरी ८२७ ‘पॉर्न’ वेबसाईट्स ची यादी जाहीर करून त्यांच्यावर भारतात बंदी आणली होती. पण, अशी बंदी आणून काय होणार? गरज आहे ती  समाजाची मानसिकता बदलण्याची.

३०% पॉर्नने व्यापलेल्या इंटरनेटवर निर्बंध आणणं हे जगातील कोणत्याच सरकारला शक्य नाहीये. त्याचे दुष्परिणाम जर का लोकांना कळले तर कदाचित काही बदल घडू शकतात.

‘पॉर्न’ बघण्याचे दुष्परिणाम हे सांगता येतील :

१. सतत पॉर्न बघण्याने तुमची वृत्ती रागीट होऊ शकते आणि त्याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

२. तुमच्यामध्ये एक अगतिक किंवा हिंसक वृत्ती निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमची समाजात वावरतांना ‘नजर’ बदलू शकते. अश्या प्रकारचे व्यक्तिंचा मनावर ताबा सुटून त्यांच्याकडून दुष्कृत्य घडू शकतं.

 

watching porn inmarathi

 

३. पॉर्न बघितल्याने माणसातील संवेदनशीलता कमी होते. ही संवेदनशीलता माणसाला प्राण्यांपासून वेगळी करत असते. तीच नसेल तर रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यात आणि आपल्यात कोणताही फरक उरत नाही.

कायद्यात तरतूद असली तरीही ‘सायबर पॉर्नोग्राफी’ चा प्रसार थांबवण्यासाठी सरकारकडे अजून तरी कोणताही ठोस उपाय नाहीये. गरज आहे ती आपण अश्या घटनांची तक्रार न घाबरता पोलिसांकडे देण्याची. आपलं नाव अश्या तक्रारीत गुप्त ठेवलं जातं.

दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे, तरुण वयात असलेल्या आपल्या पाल्यांचे आपण मित्र बनणं आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण हे पालकांपेक्षा कोणताही शिक्षक मुलांना देऊ शकत नाही असंच सर्व शिक्षणतज्ञ सध्या वारंवार सांगत आहेत.

 

sex education inmarathi

 

इतर कोणत्याही परिस्थितीला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने जर आपल्या पाल्याची जबाबदारी घेतली तर हे जग सुंदर आहे ही भावना आपण त्यांच्यात रुजवून आपण मनाने स्वच्छ असलेल्या समाजाची निर्मिती करू शकतो.

===

हे ही वाचा IPL सट्टेबाजी ते ब्लु फिल्म, राज कुंद्राचे विकृती दर्शवणारे ६ किळसवाणे ‘उद्योग’

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?