' ३० वर्षात जे नाही झालं ते या अधिकाऱ्याने 'करून दाखवलं' फक्त "५ दिवसात"! वाचा

३० वर्षात जे नाही झालं ते या अधिकाऱ्याने ‘करून दाखवलं’ फक्त “५ दिवसात”! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘करून दाखवलं, आम्ही स्वबळावर निवडून येऊ, मुंबई आमचीच’, अशी तोऱ्यात घोषणा करणारे मुंबईची एका पावसात तुंबई झाल्यावर मात्र मूग गिळून गप्प बसतात. पंढरपूरच्या विठोबाच्या पूजेचा मानासाठी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत गेले यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

आज लोकहिताची काम करण्यासाठी नागरसेवक, आमदार खासदार यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, कोणत्या ही सरकारी कार्यलयात गेल्यावर लगेचच काम होईल याची शाश्वती नसते. सरकारी कार्यलयातील कर्मचारी सुद्धा आपल्याला सर्रास तोंडावर उलट सुलट उत्तर देत असतात.

 

indian police caps inmarathi

 

एका IAS ऑफिसरने केवळ ५ दिवसात एका गावात स्टेट ट्रान्सपोर्टची बससेवा करून दिली. कोण आहे तो ऑफिसर चला तर मग जाणून घेऊयात…

कोणत्या गावात बस सुरु केली?

तामिळनाडूमधील करुन्पन्नपाल या गावात गेल्या तीन दशकापासून बस येत नव्हती. गावातील लोकांना शहरात जाण्यासाठी पंचाईत असायची. बस थांबा हा गावापासून दोन ते तीन किमी दूर असल्याने गावकऱ्यांची रोज पायपीट हात असे. गावकऱ्यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे ही तक्रार नोंदवून सुद्धा पदरी निराशाच पडायची.

 

t prabhushnkar inmarathi

 

अधिकाऱ्याने करून दाखवलं :

प्रभूषणकर टी गुणालन यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ते लगेच कामाला लागले. त्यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. आणि गावकऱ्यांना नुसते आश्वासन न देता पुढच्या ५ दिवसात स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसची सोय करून दिली.

 

tnsrtc inmarathi

हे ही वाचा – IAS चं स्वप्नं, वृत्तपत्रात नोकरी ते हिरॉईन्सचा कर्दनकाळ – एका भन्नाट व्हिलनचा प्रवास

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी सर्व तपशील दिला, ज्यात ते असे म्हणतात की, करुन्पन्नपाल या गावात बससेवा गेल्या अनेक वर्षांपासून नाहीये त्यामुळे मी TNSTC च्या डिव्हिजनल मॅनजरशी चर्चा केली. मॅनजरने ही परिस्थती समजून घेऊन यावर उपाय देखील काढला. सोमवारपासून दिवसातून दोनदा बससेवा सुरु देखील झाली आहे.

 

t prabhushankar twit inmarathi

 

IAS ऑफिसर नेमके आहेत कोण? 

मूळ डॉक्टरकीचा पेशा असलेले प्रभुशंकर चेन्नईमधील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होते. लहानपणीच त्यांनी IAS ऑफिसर होण्याचं स्वप्न बघितले होते, मात्र त्यांच्या आईची ईच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावे. आईची ईच्छा तर त्यांनी मात्र आपले स्वप्न साकार करायला विसरले नाहीत. यूपीएससी परीक्षा देऊन ते भारतातून सातवे आले आहेत.

 

t prabhushankar 1 inmarathi

 

गावकऱ्यांनी देखील मानले आभार :

आपल्या भारतीयांना जिंकण्यासाठी काय लागते? त्यांच्या रोजच्या अडीअडचणी जरी कमी केल्या तरी आपले भारतीय लगेच डोक्यावर घेणारे आहेत. त्याच गावातील एका वृद्ध व्यक्तीने या अधिकाऱ्यांचे आभार तर मानलेच तसेच ते पुढे म्हणाले, गावात अनेक अधिकारी येऊन गेलेत ज्यांनी फक्त आश्वासने दिली.

आज गावात अनेक परिवारातील लोक कामानिमित्त शहरात जात असतात, त्यामुळे रोज येण्याजाण्याचा त्रास त्यांना होतो. बस सुरु झाल्याने आमचा फायदा नक्कीच होईल.

 

tukaram mundhe inmarathi

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अंतुले साहेब हे त्यांचा त्वरित निर्णयासाठी प्रसिद्ध होते. अनेक काम त्यांनी अगदी चुटकीसरशी सोडवली आहेत. तुकाराम मुंढे हे आपल्या कडक शिस्त आणि धडक कामामुळे प्रसिद्ध आहेत.

कोणत्याही राजकारणी लोकांना ते थारा देत नसल्याने तसेच जनहिताची कामे करत असल्याने आज अनेक नागपूरकर त्यांची आठवण काढत आहे. त्यांची अशी ख्याती आहे की ते कुठेच ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?