' 'सॉफ्टपॉर्न'च्या जाळ्यात अडकलेले OTT प्लॅटफॉर्म आणि सेन्सॉरची कात्री, वाचा परखड मत

‘सॉफ्टपॉर्न’च्या जाळ्यात अडकलेले OTT प्लॅटफॉर्म आणि सेन्सॉरची कात्री, वाचा परखड मत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला पॉर्न व्हीडियो तयार करून विकण्याच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली असून, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी असंच एक रॅकेट पकडलेलं होतं ज्यात शिल्पाचा नवरा आणि मोठा उद्योगपती राज कुंद्रा याचं नाव प्रामुख्याने समोर आलं.

पॉर्न फिल्म्स बनवून त्या वेगवेगळ्या मोबाईल अॅपवर विकण्याचा गंभीर गुन्हा राज यांच्यावर लावण्यात आला असून आता आणखीन किती गोष्टी बाहेर येतील याचा अंदाज आपण लावू शकतो.

 

raj kundra inmarathi

 

बॉलिवूड किंवा या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा हा बीभत्स चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या समोर आला आहे आणि यावेळेस पोलिसांकडे पुरावे असल्याचंही स्पष्ट होत आहे.

एकंदरच गेली काही वर्षं बॉलिवूड असो किंवा डिजीटल माध्यमं असो सगळीकडेच हा असा भडक कंटेंट सर्रास आपल्याला बघायला मिळतोय. आजकालचे सिनेमे असो नाहीतर वेबसिरिज हे असले भडक सीन्स, न्यूडिटी, शिवीगाळ, समलैंगिक संबंध या असल्या गोष्टी खुलेआमपणे दाखवल्या जाऊ लागल्या आहेत.

नेटफ्लिक्स, प्राइम किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सगळ्याच कंटेंटमध्ये तुम्हाला हे सगळं अगदी ठासून बघायला मिळतं. आजकाल मोठमोठे अभिनेते अभिनेत्रीसुद्धा हे असले सीन्स देताना पुढचा मागचा कसलाही विचार करत नाहीत.

एकेकाळी ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातल्या मंदाकिनीला धबधब्याखाली आंघोळ करताना बघून कित्येकांनी नाकं मुरडली होती, तीच लोकं आज सेक्रेड गेम्स, मिर्जापुर, गेम ऑफ थ्रोन्ससारख्या सिरिजमधले तसले सीन्स चवीने बघतायत.

 

bold scenes inmarathi

 

एकंदरच समाजाची मानसिकता अजूनही तशीच आहे, वरवर सगळेच म्हणतात की मी हे असले भडक सीन्स बघत नाहीत पण वास्तव काहीतरी वेगळंच असतं, सगळेच या गोष्टी चोरून बघतच असतात, नाहीतर अशा सीन्सची डिमांड कधीच वाढली नसती नाही का?

असो पण सध्या तर डिजीटल माध्यमांवर तर कसलंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाहीये. सध्या दिवसागणिक असे कित्येक प्लॅटफॉर्म लॉंच होत आहेत ज्यावर फक्त आणि फक्त हा असला भडक, एरॉटीक किंवा सेमीन्यूड कंटेंट दाखवला जात आहे ज्याला आजच्या भाषेत ‘सॉफ्ट पॉर्न’ असंही म्हणतात!

याचा अर्थ असा की तुम्ही अगदी विदेशात दाखवता तसं पद्धतशीरपणे पॉर्न दाखवू शकत नाही, पण एरॉटीकाचा किंवा काही काल्पनिक कथांचा आधार घेऊन तुम्ही त्यात थोडीफार न्यूडिटी आणि पॉर्न सदृश्य कंटेंट दाखवू शकता.

नेटफ्लिक्स आणि इतर काही परदेशी वेबसिरिजच्या यशानंतर हा प्रयोग करणारं पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे एकता कपूरचा ‘अल्ट बालाजी’! सर्वप्रथम यावर काही चांगल्या वेबसिरिज आणि सिनेमे दाखवण्यात आले.

नंतर ‘गंदी बात’ या वेबसिरिजमधून एकता कपूरने प्रेक्षकांची नस अगदी अचूक पकडली आणि हळूहळू हा प्रवास सॉफ्टपॉर्नकडे झुकू लागला.

 

gandi baat inmarathi

 

लोकांच्या लैंगिक भावना चाळवण्यासाठी त्यांना केवळ ३०० रुपयात याचं आमिष दाखवण्यात आलं आणि बघता बघता अल्ट बालाजी हा आज डिजिटल विश्वातला बऱ्यापैकी मोठा ब्रॅंड झाला.

अन्वेषी जैन जी आज सोशल मीडिया स्टार आहे, इंस्टाग्रामवर तिचे करोडो फॉलोवर्स आहे, तिला गेल्या २ ते ३ वर्षांपूर्वी कुणीच ओळख नव्हतं, केवळ ४८०० रुपये घेऊन मुंबईत अभिनय क्षेत्रात करियर करायला आलेल्या अन्वेषी जैनची आजची कमाई ४ ते ५ करोड इतकी आहे.

हे ही वाचा ३० हून अधिक महिलांनी ‘तसले’ व्हीडिओ विनापरवानगी वापरणाऱ्या साईटवर केली केस!

भारतात सर्वात जास्त गुगलवर सर्च केलेलं नाव जरी कोणी असेल तर ते ‘अन्वेषी जैन’! एकता कपूरच्या अल्ट बालाजीच्या गंदी बात सिरिजच्या दुसऱ्या सीझनमधून तिने या क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्याच सिरिजमध्ये एक अत्यंत बोल्ड भडक असा लेसबीयन सीन देऊन तिने नेटकऱ्यांच्या मनात जागा मिळवली ती कायमची.

 

anveshi jain inmarathi

 

अजूनही तिला मोठा असा रोल कोणताही मिळालेला नाही पण तरी एकता कपूरच्या प्लॅटफॉर्मवरुन तिच्या बोल्ड इमेजमुळे तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळेच आज तिचं नाव लोकांच्या तोंडात बसलं.

अर्थात ही तर सुरुवात होती, नंतर अल्ट बालाजीने रागिनी एमएमएस किंवा देव डीडी अशा अनेक बोल्ड भडक सिरिज काढून त्यांचा भडिमार सुरूच ठेवला, कित्येक लोकांना ओळख मिळवून दिली खरी पण त्यांच्यावर ‘सॉफ्टपॉर्न’चा जो ठपका बसलाय तो कायमचाच.

या असल्या सिरिज किंवा सिनेमात काम करणाऱ्यांना पुढे कामं मिळतीलही पण ती त्यांच्या याच इमेजला अनुसरून असतील. सध्याच्या सोशलमीडियाच्या काळात सगळ्यांनाच attenetion पाहिजे, आणि त्यासाठी लोकं कोणतीही किंमत द्यायला तयार असतात!

अर्थात या सगळ्यात प्रेक्षकांचं सहभागही तितकाच आहे. आज गंदी बात सारख्या सिरिजचे ६ सीझन तयार होऊन ते तितकेच लोकप्रिय होऊ शकतात याचा अर्थ हाच की आपला प्रेक्षकही अजून त्याच मानसिकतेने ग्रसित आहे.

बरं या सगळ्या गोष्टींना केवळ एकता कपूरच जवाबदार आहे असं नाही, तिने केलेलं हे धाडस बघून आता सॉफ्टपॉर्नसाठीही अनेक स्पर्धक मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला दिसून येईल.

 

ott plaforms inmarathi

 

उल्लू, फ्लीज मुव्हिज, कुकु, हॉटशॉटस, असे विविध ओटीटी प्लॅटफॉर्म केवळ या अशाच अश्लील कंटेंटसाठी लोकप्रिय झाले आहेत. भारतातील या सगळ्या प्लॅटफॉर्मची कमाई बघता हे प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससारख्या तगड्या स्पर्धकालाही टक्कर देतील.

कामूक सेक्स कॉमिकमधून कित्येकांच्या हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या ‘सविता भाभी’ या पात्राला उल्लूसारख्या प्लॅटफॉर्मने ग्लोरीफाय करून त्या सिरिजला एक पॉर्न फिल्म म्हणून सादर केलं गेलं ते ‘कविता भाभी’च्या रूपात.

आजही तुम्ही सोशल मीडियावर कविता भाभी असं सर्च केलंत तर पहिले उल्लूच्याच या सिरिजचे व्हीडीयोज आणि फोटोज समोर येतील. यात अगदीच पूर्णपणे न्यूडिटी नसली तरी उल्लूच्या सगळ्याच वेबसिरिज या सेक्स याच विषयाभोवती फिरतात.

 

kavita bhabhi inmarathi

 

याहून आणखीन एक पाऊल पुढे म्हणजे हॉटशॉट सारखा प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मवर तर न्यूडिटीसाठी काहीच नियमावली नाहीये, या प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज किंवा फिल्ममध्ये तुम्हाला सर्रास टॉपलेस सेक्स सीन्स तुम्हाला पाहायला मिळतात.

फ्लीज, कुकु किंवा गुपचुप यासारखे काही प्लॅटफॉर्मसुद्धा सध्या बरेच चर्चेत आले आहेत. अगदी पूर्ण न्यूडिटी नाही पण थोडंफार भडक चित्रण आणि अश्लील कंटेंट यासाठी या सगळ्या प्लॅटफॉर्मचा तर सर्रास वापर होताना दिसतो.

किंबहुना सॉफ्टपॉर्न कंटेंट बिनदिक्कतपणे लोकांना पाहता यावा यासाठीच केलेली ही एक तरतूद आहे असंच म्हणावं लागेल.

हे सगळे प्लॅटफॉर्म हा कंटेंट बघायचे आपल्याकडून पैसे घेतात, पण एमएक्स प्लेयरसारखा भारतात सर्वात जास्त पाहिला जाणारा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मतर आजकाल या गोष्टी अगदी फुकटात दाखवत आहे.

याच प्लॅटफॉर्मवर नुकतीच गेल्या लॉकडाउनमध्ये रिलीज झालेली ‘मस्तराम’ ही केवळ त्यातल्या या बोल्ड भडक न्यूडसीन्ससाठीच जास्त पाहिली गेली. बघायला गेलं तर ही एक एरॉटीका सिरीज होती आणि मस्तराम हे नाव भारतीयांना नवीन नाही.

 

mastram inmarathi

 

पण तरी कथानक ठीकठाक असूनही प्रेक्षकांचं सगळं लक्ष त्यातल्या हॉट बेड सीन्सकडेच होतं. बऱ्याच चांगल्या कलाकारांनी यात काम केलं पण अनावश्यक आणि बीभत्स असे बोल्ड सीन्समुळे याकडे फक्त एक सॉफ्टपॉर्न म्हणूनच बघितलं गेलं.

केवळ मस्तरामच नव्हे तर अशा बऱ्याच इतर साइट्सचा बोल्ड कंटेंटही तुम्हाला एमएक्स प्लेयरवर बघायला मिळतो तो पण अगदी मोफत! खासकरून लॉकडाउन काळात या सगळ्या ‘सॉफ्टपॉर्न’मध्ये वाढ झाल्याचंही एका सर्वेनुसार सांगितलं जातं.

अर्थात हे सगळं अजूनही भारतात अवैध म्हणजेच बेकायदेशीर आहे, त्यामुळे अल्ट बालाजी सोडलं तर इतर कोणतेही प्लॅटफॉर्म आणि त्यावरचा कंटेंट कायदेशीररित्या आपल्याला बघायला परवानगी नाही, पण तरी एवढं बंधन असूनही आज या अशाच गोष्टी भारतात जास्त बघितल्या जात आहेत.

पॉर्न, सॉफ्टपॉर्न, बोल्ड सीन्स, न्यूडिटी हे सगळं योग्य का अयोग्य या वादात न पडता या सगळ्याचा येणाऱ्या पिढीवर नेमका कसा परिणाम होणार आहे याचा आपण विचार करायलाच हवा.

सध्या स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या काळात हा असला भडक कंटेंट कोणाच्याही हातात पडू शकतो, त्यातून कोणताही बोध घेतला जाऊ शकतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या या आपल्या कल्पनेपलीकडच्या आहेत.

भारतात जितकं सेक्स एज्युकेशन जितकं महत्वाचं तितकीच इंटरनेट साक्षरतासुद्धा महत्वाची आहे. इंटरनेटचा जास्तीत जास्त सदुपयोग करून आक्षेपहार्य कंटेंटपासून लांब कसं राहता येईल हेदेखील शिकवणं महत्वाचं आहे.

 

bold content inmarathi

 

आज या सगळ्या सॉफ्टपॉर्न बनवणाऱ्या लोकांना फक्त जवळचा नफा दिसतोय, पण यामुळे येणारी पुढची पिढी कशी बरबाद होईल या नुकसानाचा ते विचार करणारच नाहीत कारण त्यांना या स्पर्धेत टिकून राहायचं आहे.

त्यामुळे हे प्लॅटफॉर्म बंद करा असं न म्हणता आपणच या अनावश्यक बीभत्स चित्रण करणाऱ्या प्लॅटफॉर्मचे पैसे भरणं बंद केलं पाहिजे.

ईकॉनॉमिक्सचा डिमांड सप्लायचा नियम इथेही लागू होतो. मार्केटमध्ये ज्या गोष्टीची डिमांड सर्वात जास्त असते तीच गोष्ट जास्त पुरवली जाते, आणि ही डिमांड कमी करणं हे सर्वस्वी ग्राहकाच्या हातात असतं.

त्यामुळे या सॉफ्टपॉर्नच्या जाळ्यात गुरफटलेल्या प्लॅटफॉर्मची मक्तेदारी संपवायची असेल तर आपल्यालाच त्यासाठी काही कठोर पावलं उचलायला हवीत त्यासाठी मार्केटला दोष देऊन चालणार नाही.

===

हे ही वाचा सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?