' IPL सट्टेबाजी ते ब्लु फिल्म, राज कुंद्राचे विकृती दर्शवणारे ६ किळसवाणे 'उद्योग'

IPL सट्टेबाजी ते ब्लु फिल्म, राज कुंद्राचे विकृती दर्शवणारे ६ किळसवाणे ‘उद्योग’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याला सोमवारी रात्री उशीराने मुंबई क्राइम ब्रॅॅन्चने अटक केली आणि बॉलिवूडमधील अनेकांच्या धातीत धडकी भरली. पॉर्न फिल्म्स बनवणं आणि काही अॅप्सवर त्या प्रद्शित करणं या आरोपांखाली राज कुंद्राला ही अटक झाली असल्याने चकाचक मुखवट्यांच्याआड लपलेला आणखी एक विकृत चेहरा’ समोर आला.

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवणा-या बॉलिवूडकरांना ‘ना जनाची, ना मनाची’ हे सत्य वारंवार उघड होतंच. मग राज कुंंद्रा तरी याला अपवाद कसे ठरणार.

 

raj inmarathi

 

एका यशस्वी, देखण्या अभिनेत्रीचा पती एवढीच ओळख त्याची ओळख नाही. स्वतः उद्योजक असलेल्या राज यांचे हे ‘उद्योग’ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटण्याची गरज नाही कारण केवळ या प्रकरणातच नव्हे तर यापुर्वी अनेक विवादांमध्ये अडकलेल्या राज यांना पोलिस चौकशी, आरोप-प्रत्यारोप यांची सवयच असल्याचं लक्षात येतं.

विश्वास बसत नाहीये? मग जरा इतिहासात डोकावूया. राज कुंद्रा यांच्या खळबळजनक आयुष्याची भलीमोठी यादी थोडक्यात पाहूयात.

१. आय पी एलमध्ये सट्टेबाजी

राजस्थान रॉयल्सची मालकी असणारं कुन्दा कुटुंबं सट्टेबाजीच्या आरोपात चांगलंच अडकलं होतं. राज कुंद्रा हे टीमचे सहमालक असून आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी या दोन्ही आरोपांखाली ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.

 

raj ipl inmarathi

 

लोढा समितीच्या चौकशीतही त्यांना दोषी मानण्यात आलं असून यासाठी राजस्थान रॉयल्स टीमवर तब्बल २ वर्षं बॅन लावण्यात आला होता.

२. बिटकॉइन स्कॅम

बॉलिवूडकरांचा लाडका विषय असलेल्या बिटकॉइन स्कॅममध्येही राज कुंद्रा अडकले होते. आर्थिक नफा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या राज कुंद्रा यांनी काही बॉलिवूडकरांसह बिटकॉइनची प्रसिद्धी तसेच व्यवहार केल्याचं उघड झालं होतं.

यामध्ये बिटकॉइनचा आधार घेत अनेकांना चुना लावल्याचाही आरोप राज कुंंद्रा यांच्यावर करण्यात आला होता.

 

raj kundra inmarathi

 

पुणे क्राइम ब्रॅन्च तसचे इडी या दोघांच्या सखोल चौकशीला सामोरं गेल्यानंतरही राज कुंद्रा यांना आता नवा गुन्हा करण्याचं धाडसं व्हावं म्हणजे नवलंच!

३. पत्नीच्या चारित्र्यावर हल्लाबोल

राज यांचं पहिलं लग्न कविता यांच्याशी झालं होतं. मात्र लग्नानंतरच्या काही वर्षातच राज यांनी आपल्या पत्नीवर संशय घ्यायला सुरुवात केली. पत्नी कविता हिचे तिच्या बहिणीच्या नवऱ्याशीच संबंध असल्याचा आरोप राज यांनी खुलेआम केला होता.

 

raj wife inmarathi

 

आपल्या आईने पत्नीला बहिणीच्या नवऱ्यासह रंगेहाथ पकडल्याचीही कबुली राज यांनी मिडीयाला दिल्याने एकच खळबळ माजली होती.

४ शिल्पाशी विवाहबाह्य संबंध

एकीकडे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राज कुंद्रा स्वतः विवाहित असतानाच अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याशी सुर जुळले. या देखण्या अभिनेत्रीशी लग्न करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी खुलेआम स्पष्ट केलं होतं.

 

shilpa shetty inmarathi

 

यावेळी शिल्पा या देखील राज कुंद्रा यांच्याशी लग्न करायला उत्सुक असल्याने या दोघांनीच मिळून कविता यांच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणला, मात्र कविता या सहजासहजी घटस्फोट देण्यास तयार नसल्याने अखेरिस राज यांनी कविता यांच्यावर खोटे आरोप करत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक घटस्फोट मिळवला असाही आरोप त्यांची पत्नी कविता यांनी मिडीयासमोर केला होता.

घटस्फोटाची प्रक्रिया पुर्ण होताच तातडीने राज आणि शिल्पा यांनी विवाह केल्याचा पुरावाही त्यांनी दिला होता.

 

shilpa raj inmarathi

हे ही वाचा – बॉलिवूडच्या रंगीत दुनियेचं “हे” वास्तव जाणीवपूर्वक लपवलं गेलं आहे…नेहमीच…!

५. २४ लाखांची हेराफेरी

एकीकडे क्रिकेट मॅच तर दुसरीकडे फिल्म इंडस्ट्री, या वेगवेगळ्या क्षेत्रात घोटाळ्यांची कमतरता भासली म्हणून राज कुंद्रा यांनी आपला मोर्चा कापड उद्योगाकडे वळवला.

भिवंडीतील एका कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर २४ लाख रुपयांची हेराफेरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

shilpa inmarathi

 

झालं असं की बिग डील्स या कंपनीच्या संचालत मंडळावर कुंद्रा दाम्पत्याचं नाव आहे. या कंपनीव्दारे कापड व्यवहार करण्यासाठी त्यांनी अनेक ग्राहकांकडून एकूण २४ लाख रुपयांचय्या ऑर्डर्स घेतल्या, मात्र ज्या मलोटिया टेक्सटाइलच्या नावावर या ऑर्डर्स घेण्यात आल्या, त्यांनाही पैसे दिले नाहीत आणि त्याचा मोबदला ग्राहकांना कधीही मिळाला नाही.

२४ लाखांचं नेमकं झालं काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

६ अभिनेत्री पुनम पांडे फसवणूक प्रकरण

बोल्ड अवताराने कायमच वादात अडकणाऱ्या अभिनेत्री पुनम पांडे हिचा फसवणूकीचा आरोप चांगलाच गाजला होता. राज आणि त्यांचा मित्र सौरभ या दोघांनी मिळून अक जाहिरात एजन्सी सुरु केली. त्यासाठी अभिनेत्री पुनम पांडे हिच्याशी करार केला.

मात्र या करारात अनेक गोष्टी चुकीच्या तसेच फसवणूकीच्या असल्याचे लक्षात येताच पुनम पांडे हिने स्वेच्छेने हा करार रद्द केला. मात्र कायदेशीररित्या करार रद्द होवूनही राज यांनी आपल्या फोटांचा गैरवापर केल्याचा आरोप पुनमने केला होता.

 

raj poonam inmarathi

 

त्यानंतर जाहिरात एजन्सीच्या ऑफिसमध्येही पुनम आणि राज यांच्यात हमरीतुमरी झाल्याचेही अनेकांनी पाहिले होते.

बॉलिवूड, उद्योग, क्रिकेट… असे एकही क्षेत्र नाही जिथे घोटाळ्यांमध्ये राज यांचे नाव दिसत नाही. एरव्ही उच्चभ्रु पार्ट्यांमध्ये वावरणाऱ्या, योगा, सामाजिक बांधिलकी अशा विषयांवर लंब्याचौड्या गप्पा हाकणाऱ्या कुंद्रा दाम्पत्याला अशी कृत्य करताना भिती वाटू नये हेच नवल आहे.

अर्थात सॉफ्ट पॉर्नचा आधार घेत पैसे कमावणाऱ्यांची संख्या सध्या कमी नसल्याने इतरांप्रमाणेच राजही यातून सहीसलामत सुटेल?, इतर गुन्ह्यांप्रमाणेच यातूनही त्याची सुटका होत पुन्हा उजळ माथ्याने नवा उद्योग करेल? की या प्रकरणी तरी कठोर शिक्षा भोगावी लागेल? याचं उत्तर येणारा काळच देईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?