' पंजाब कॉँग्रेसच्या प्रेसिडेंटपदी 'सिद्धू'ची निवड; वाचा त्याच्या वादग्रस्त कृत्यांचा पाढा!

पंजाब कॉँग्रेसच्या प्रेसिडेंटपदी ‘सिद्धू’ची निवड; वाचा त्याच्या वादग्रस्त कृत्यांचा पाढा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॅप्टन अमरींदर आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातली अनबन टर आपण गेले काही दिवस ऐकत आहोतच, पण नुकतंच पंजाब प्रेसिडेंट म्हणून कॉँग्रेसने नवज्योत सिंगची निवड केल्याने हा वाद आणखीनच चिघळणार अशी दाट शक्यता दिसत आहे.

तसं बघायला गेलं तर नवज्योत आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. त्याच्या अतरंगी शायरीपासून वादग्रस्त राजकीय करियरपर्यंत आपण सगळ्यांनीच त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वैचारिक धारणेचा अनुभव घेतलेला आहे.

 

navjyot singh siddhu inmarathi

 

नुकतंच पंजाब कॉँग्रेसच्या अध्य्क्षपदी सोनिया गांधी यांनी सिद्धूचं नाव पुढे केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरच कॉँग्रेसची परिस्थिती आणि त्यातून हा सोनिया गांधी यांनी घेतलेला हा निर्णय बघता सगळीकडेच सिद्धू आणि अमरींदर यांच्यातल्या वादात आणखीन भर पडणारच अशीच चर्चा रंगताना दिसत आहे!

हे ही वाचा निवृत्तीनंतर काय करत आहेत हे ८ माजी क्रिकेटपटू? वाचून थक्कच व्हाल!

सिद्धूचं नाव समोर आल्याने मात्र, बऱ्याच लोकांना ते का खटकलं असावं? त्यामागचं कारण काय? सिद्धूची अशी वादग्रस्त इमेज होण्यामागे खुद्द सिद्धूच कसा जबाबदार होता हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

१९८८ सालच्या रोड रेज केसची तर आपल्याला माहिती असेलच, २० वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, त्या अपघातात सिद्धूचं नाव देखील गोवलं गेलं होतं!

खरंतर त्या दिवशी १९८८ साली कार पार्किंगच्या जागेवरून एक वयस्कर गृहस्थ गुरनाम सिंग आणि नवज्योत यांच्यात बाचाबाची झाली, आणि प्रकरण एवढं वाढलं की दोघांमध्ये शारीरिक झटापटही झाली.

 

siddhu inmarathi

 

असं म्हंटलं जातं की सिद्धूने तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीला बेदम मारहाण केली, पण सिद्धूने नेहमीच ती गोष्ट एक अपघात होता असंच स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि त्याचं खापर सिद्धूच्या माथी मारायचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.

या केसमध्ये सिद्धूने शिक्षाही भोगली आणि दंड सुद्धा भरला अखेरीस सुप्रीम कोर्टाने कोणत्याही सबळ पुरावे नसल्या कारणाने सिद्धूची शिक्षा रद्द केली!

असंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.

सिद्धू जितका तापट आहे तितकाच तो असंबद्ध बडबडतो, अशाच एका वादग्रस्त विधानानंतर लोकांनी सिद्धूला प्रचंड ट्रोल केलं जातं ते विधान म्हणजे पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याने केलेलं स्टेटमेंट.

 

pulwama attack inmarathi

 

पुलवामाचा भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर आपल्या जवानांनी त्यांना यमसदनी पाठवण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राइक तर आपल्याला माहीत आहे, पण जेव्हा आपल्या ४० जवानांचे प्राण या दहशतवाद्यांनी घेतले आणि पाकिस्तानच्या संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती.

तेव्हा नवज्योत सिंग सिद्धूने केलेलं विधान हे अनेकांना खटकणारंच होतं, त्यावेळेस कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये सिद्धू काम करत होता, तेव्हा त्याने पाकिस्तानचं नाव न घेता असं विधान केलं की “काही मूठभर लोकांमुळे साऱ्या देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य आहे का?”

त्याच्या या वाक्यावरून तो कीती असंवेदनशील आहे याची प्रचिती आलीच, शिवाय या हल्ल्याचा त्याने निषेध व्यक्त केलाच पण ते करताना त्याने हाच सवाल केला की काही दहशतवादी असतात म्हणून साऱ्या देशालाच दोषी म्हणून धरणार का?

सिद्धूच्या या वक्तव्याची अनुपम खेर, मनोज जोशी अशा कित्येक कलाकारांनी आलोचनादेखील केली. त्याच्या या वर्तणूकीमुळे त्याला कपिल शर्माच्या शोमधून काढण्यात आलं आणि त्याजागी अर्चना पुराण सिंह हिला घेण्यात आलं.

 

comedy nights inmarathi

 

सिद्धू हा वायफळ तर बोलतोच पण तो तितकाच थापाड्या पण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल, काही यूट्यूब व्हीडियोजमध्ये सिद्धू त्याचा सचिन तेंडुलकरसोबतचा एक किस्सा सांगतो ज्यात तो आणि सचिन एकत्र सलामीला गेले होते.

मुळात त्या व्हीडियोजमध्ये सिद्धूने २ वेगवेगळी वर्षे नमूद केली आहेत, आणि त्या वर्षामधला फरक बघता तोवर सचिनने क्रिकेटमध्ये पदार्पणही केलेलं नव्हतं. यावरूनच सिद्धू हा कीती फेकू आहे याची आपल्याला कल्पना आली असेल!

आपल्याकडे आपण नगरसेवक निवडतानासुद्धा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासतो, पण इथे तर कित्येक प्रकारचं गैरवर्तन करून, गुन्हा दाखल असूनही सिद्धूला पंजाब कॉँग्रेसचा प्रेसिडेंट केलं जातं हे कुठेतरी चुकीचं आहे अशी लोकांची समजूत आहे.

 

siddhu 2 inmarati

 

बाकी सिद्धूने सर्वप्रथम एक खेळाडू म्हणून किंवा नंतर राजकारणी म्हणून त्याचं कार्य बजावलं आहेच, पण या सगळ्या इतर गोष्टींमुळेसुद्धा त्याची या पदी झालेली निवड पंजाबच्या राजकारणाचा चेहरा बदलू शकते किंवा चेहरा बिघडूही शकते!

===

हे ही वाचा या कारणामुळे राजीव गांधींनी मतदानासाठीचे वय १८ वर्षे केले..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?