' सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!

सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज डिजिटल क्रांतीमुळे घरबसल्या आपण बँकांपासून ते अगदी सगळ्या प्रकारची बिले भरण्यापर्यंतची काम काही मिनिटात करून टाकतो. जितके तंत्रज्ञान प्रगत तितकेच त्याचे तोटे देखील आपण अनुभवत असतो. आता सायबेरगुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे.

कालपासून एक मुद्दा सतत गाजतो आहे तो म्हणजे Pegasus हॅकिंग वाद, आंतराष्ट्रीय मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार ४०च्या वर भारतातील पत्रकारांचे आणि इतर महत्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक करण्यात आले आहेत. याच मुद्दयावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…

नक्की प्रकरण काय?

Pegasus हे एक हॅकिंग सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरची मदत घेऊन भारतातील महत्वाच्या व्यक्तींचे आणि पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा पत्रकरांचे फोन हॅक करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मीडिया मधून १६ मीडिया फर्मनी हा प्रस्ताव आपापल्या न्युज मध्ये पब्लिश केला आहे.

 

nso inmarathi

 

सरकारच काय म्हणणं?

विरोधी पक्षाने यावरून सरकारला घेरलं असताना सरकारने आपल्या परिपत्रकावद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्यात सरकारच असं म्हणणं आहे की,

 

nso inmarathi 2

हे ही वाचा – नेहरू ते ठाकरे, राजकारण्यांचं विठुरायाशी नेमकं नातं आहे तरी काय? वाचा हे ६ किस्से

मुळात भारत देशात लोकशाही असल्याने प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०१९ आणि आयटीच्या गाइडलाईन्स नुसार, ‘व्यक्तीचा स्वतःचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल’ असे त्यामध्ये नमूद केले आहे.

मागे सुद्धा अशाच पद्धतीचे रिपोर्ट सादर केले गेले होते जे फक्त वास्तविक होते ज्यात कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे आढळले गेले नव्हते. तसेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते अमान्य केले होते.

 

‘त्या’ सॉफ्टवेअर कंपनीचं म्हणणं काय? 

NSO ग्रुप द्वारा हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. Pegasus हे असे एक सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या द्वारे व्हॉटसअँप सारखे अँप्लिकेशन सुद्धा हॅक होऊ शकते. हे सॉफ्टवेअर इतकं ऍडव्हान्स आहे की केवळ एका मिसकॉल वरू हे अँप्लिकेशन फोन मध्ये इन्स्टॉल होऊ शकते.

 

nso inmarathi 1

 

कंपनीवर हॅकिंगच्या होणाऱ्या आरोपावर कंपनी आपले स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनी सरकारला केवळ टूल विकतात. तसेच या हॅकिंगशी त्यांचा काहीच संबंध नाही. रिपोर्ट मध्ये जे मुद्दे मांडले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत, तसेच या कंपनीने  रिपोर्टच्या विरोधात थेट मानहानीची केस दाखल केली आहे.

 

आक्रमक विरोधी पक्ष:

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, आपल्याकडील अधिवेशन केवळ २ दिवसात उरकून घेतले. संसदेत राहुल गांधींनी तसेच इतर पक्षांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांना टार्गेट केले आहे. आधीच वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात लसीकरणाचा उडालेला गोंधळ,यावरून विरोधी पक्ष आधीच आक्रमक झाला आहे.

 

rahul gandhi inmarathi

हे ही वाचा – कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका फरक काय असतो? जाणून घ्या…

देश राहण्यासाठी सुरक्षित नाही, देशात असंतोष वाढला आहे, अशी मत काही वर्षांपूर्वी काही सेलिब्रेटी मंडळींनी मंडळी होती.यामागे त्यांचा नेमका कोणता राजकीय हेतू किंवा केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधान करणं यापैकी काही कारण असू शकतात.

काही वेळा देशाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी हॅकिंगचा वापर केला जातो मात्र अशा गोष्टीचा गैरवापर करून आपला राजकीय स्वार्थ साधून घेणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?