' कधीकाळी मेकॅनिक तर कधी रेडिओवर गाणी गाऊन हा गायक बनला 'गझल सम्राट'!!!

कधीकाळी मेकॅनिक तर कधी रेडिओवर गाणी गाऊन हा गायक बनला ‘गझल सम्राट’!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ ही म्हण काही लोक आपल्या खरी करून दाखवतात. ‘मेहदी हसन’ या गझल गायकाच्या करिअर बद्दल माहिती वाचल्यावर तुम्हाला सुद्धा नक्की असंच वाटेल. ‘शहेनशहा ऑफ गझल’ या बिरुदाने ओळखल्या जाणाऱ्या या गायकाने नेहमीच आपल्या सुफी गायकीने जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

 

mehandi hasaan 1 inmarathi

हे ही वाचा – जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज नाकारला होता

राजस्थान मधील लुना या गावातील जन्म आणि फाळणी च्या वेळी पाकिस्तान मध्ये झालेलं स्थलांतर असं संघर्षमय आयुष्य जगून ही त्यांनी आपल्या कलेची आस कधीच सोडली नाही. हेच कारण आहे ज्यामुळे मेहदी हसन यांना दोन्ही देशातील लोक आपलं समजतात आणि त्यांच्या गाण्यांवर जीवापाड प्रेम करतात.

मेहदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी झुंझुनू या राजस्थान मधील शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या लुना गावात झाला होता. पारंपारीक पद्धतीने हसन यांचं ‘कलावंत’ हे घराणं मागच्या १५ पिढ्यांपासून संगीत क्षेत्राची सेवा करत आहेत.

 

mehandi hasaan 2 inmarathi

 

मेहदी हसन यांनी गाण्याचं शिक्षण आपले वडील उस्ताद अझीम खान आणि काका इस्माईल खान यांच्याकडून घेतलं होतं. हे दोन्ही गायक त्यांच्या धृपद गायकीसाठी लोकप्रिय होते. भारत- पाकिस्तान फाळणी नंतर हसन परिवाराला पाकिस्तानमध्ये जावं लागलं होतं.

पाकिस्तानमध्ये सुरुवातीच्या काळात हसन परिवाराच्या कलेची कदर केली गेली नाही. मेहंदी हसन हे आपल्या तरुणपणी पाकिस्तानमधील एका सायकलच्या दुकानात मेकॅनिक म्हणून काम करत होते. काही वर्षांनी त्यांनी मोटर मेकॅनिकचं काम सुरू केलं. पण, ही कामं करत असतांना त्यांनी कधीही आपल्या कलेचा विसर पडू दिला नाही.

 

partition inmarathi

 

मेहदी हसन हे गझल गायनाचे कार्यक्रम करू लागले. आर्थिक परिस्थिती सोबत झगडत असलेल्या पाकिस्तान मध्ये मेहदी हसन यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांना अत्यल्प प्रतिसाद मिळायचा. आजच्या सारखा सोशल मीडिया त्या काळात उपलब्ध नसल्याने मेहदी हसन यांना आपलं गाण्यावरचं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी खूप वर्ष मेहनत घ्यावी लागली होती.

 

mehandi hassan 3 inmarathi

 

१९५० चं दशक हे मेहदी हसन यांच्या संघर्षाचं फळ देणारं ठरलं. उस्ताद बरकत अली, बेगम अखतर, मुख्तार बेगम हे गायक त्यावेळी लोकप्रिय होते. या गायकांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मेहदी हसन यांना १९५७ चं वर्ष उजाडण्याची वाट बघावी लागली. मेहदी हसन यांनी पाकिस्तानच्या रेडिओ वरून गाणं गायला सुरुवात केली.

ठुमरी या गाण्याच्या प्रकारात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं आणि लवकरच त्यांची ओळख एक ‘ठुमरी गायक’ म्हणून होऊ लागली. लवकरच त्यांना बॉलीवूड सिनेमात गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मेहदी हसन यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.

 

mehandi hasaan 4 inmarathi

 

मेहदी हसन यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘दिल-ए- नादान’, ‘रंजीश ही सही’, ‘मोहब्बत करने वाले’ या गझल चा समावेश होतो. त्यांनी गायलेलं ‘क्या टुटा है तेरे अंदर’ ही गझलचे शब्द हे प्रत्येक रसिक प्रेक्षकाला आपल्या अंतरंगात डोकावण्यास भाग पाडतात.

प्रेम, विरह आणि ब्रेकअप अश्या सर्व प्रकारच्या गाण्यात मेहदी हसन यांचा हातखंडा होता. त्यांचं कोणतंही गाणं ऐकलं तरी चाल सोबतच त्या गाण्याच्या शब्दांच्या अर्थाने माणूस भारावून जातो अशीच ती गाणी आहेत. ‘प्रेम आणि तर्कशास्त्र यांना एकत्र आणणारा गायक’ हे बिरुद मेहदी हसन यांना त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी बहाल केलं होतं.

मेहदी हसन यांच्या गाण्यांचा काळ हा १९५७ ते १९९९ हा सांगितला जातो. २००० साली झालेल्या घश्याच्या कर्करोगाने त्यांना गायनापासून दूर केलं. २००९ मध्ये त्यांनी आपलं गाणं पूर्णपणे थांबवलं.

२००९ मध्ये त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं हे फ़हात शेहझाद यांचं “तेरा मिलना बहोत अच्छा लगता है” हे त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं होतं. एका अल्बमसाठी गायलेलं हे गाणं लता मंगेशकर यांच्यासोबत ड्युएट असावं अशी मेहदी हसन आणि निर्मात्यांची फार इच्छा होती.

 

lata mangeshkar inmarathi

हे ही वाचा – हा गायक एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

लता मंगेशकर यांनी या विनंतीला मान दिला आणि २०१० मध्ये गाण्याच्या ट्रॅक वरून त्यांनी मुंबईच्या स्टुडिओ मध्ये गाण्यातील आपल्या भागाची रेकॉर्डिंग केली, आणि अशाप्रकारे हे ड्युएट गाणं रिलीज करण्यात आलं.

१३ जून २०१२ रोजी मेहदी हसन यांचं कराची येथील हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८४ वर्षी निधन झालं. मेहदी हसन यांची गाणी, त्यांनी सादर केलेले कार्यक्रम त्यांच्या चाहत्यांनी युट्युबवर अपलोड केले गेले आहेत. जगभरातील संगीतप्रेमी हे त्यांचा आस्वाद घेत असतात. संगीत हे कोणत्याही सीमा रेषेला पार करणारं असतं हे मेहदी हसन, नुसरत फतेह अली खान यांच्या करिअरकडे बघून आपण नक्कीच म्हणू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?