' लोणचं, मसालेदार करी बनवून भारतीय वंशाचा हा पट्ठ्या बनला ऑस्ट्रेलियाचा मास्टर शेफ – InMarathi

लोणचं, मसालेदार करी बनवून भारतीय वंशाचा हा पट्ठ्या बनला ऑस्ट्रेलियाचा मास्टर शेफ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नुसतं पापड लोणची विकून एखादा माणूस ३०० कोटींचा मालक कसा बनू शकतो? असा सवाल माझ्या नवऱ्याची बायको या  सिरीयलच्या टीकाकारांनी विचारला होता. ती मालिका संपत नाही तर त्याचा पुढचा पार्ट असणारी सिरीयल म्हणजे अगंबाई सुनबाई तिथेही तोच मसाला वापरला आहे.

 

radhika-masale-inmarathi

 

MDH सारखे मसाल्यांचे ब्रँड कोटीत कमवत आहेत, कारण त्यामागे इतक्या वर्षांची मेहनत आहे. आपल्याकडे सुद्धा प्रवीण लोणचं, बेडेकर लोणचं हे मराठी ब्रँड आजही अनेक घरात वापरले जातात. याच लोणची पापडावर एक भारतीय परदेशातील कुकिंग स्पर्धा जिंकतो, कोण आहे तो भारतीय जाणून घेऊयात…

 

justin inmarathi

 

आज घराघरात अगदी वडीलधारी मंडळीसुद्धा हमखास पिझ्झा प्रेमी असतात, मैद्याच्या त्या पावावर विविध भाज्या, नॉन व्हेज खायचा असेल तर चिकन  मटण असते. त्यावर एक्सट्रा चीज घालून लोक चवीपरीने खातात मात्र तीच लोक शेतातला शेतकरी भाकरीवर भाजी घेऊन खातो तर ते त्यांना आवडत नाही.

 

pizza inmarathi

 

पाश्चात्य देशातील अनेक कार्यक्रम आपल्याकडे आपल्या लोकांना पटेल अशा पद्धतीने दाखवले जातात. अगदी कौन बनेगा करोडपती पासून ते मास्टर्स शेफ पर्यंत. मास्टरशेफ हा कार्यक्रम नव्वदच्या दशकात यूके मध्ये सुरु झाला. आज ऑस्ट्रेलियामध्ये हा शोची कॉपी हिट ठरत आहे तसेच या शो ची  चर्चा जगभरात होत आहे. आणि अशा शो चा विजेता चक्क एक भारतीय आहे ज्याचं नाव आहे जस्टिन नारायण.

 

कोण आहे जस्टिन नारायण?

पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्य असलेला जस्टिनला अगदी लहानअसल्यासपासून जेवण बनवत असे, जेवण बनवता बनवता त्याला त्यातच आवडच निर्माण झाली. आमचा मुलगा इकडे असताना साध किचनमध्ये पाऊल ठेवायचा नाही मात्र आता तिकडे गेल्यावर सगळं स्वयंपाक करतो, असा डायलॉग मारणारे अनेक आई वडील आपल्या आसपास असतातच.

 

justin inmarathi 1

हे ही वाचा – बक्कळ पैसे असून सुद्धा ती रस्त्यावर विकतेय छोले कुल्चे, मग तुम्ही का लाजताय, वाचा.

जस्टिनला आईमुळे खरं तर प्रेरणा मिळाली. तसेच २०१७ साली त्याने भारत दौरा केला होता,  ज्यात त्याने आपल्या देशाची संस्कृती पहिली, आपल्याकडे असलेली खाद्यपरंपरा त्याला जवळून पाहता आली. आपल्या देशात १० कोसावर भाषा बदलते तिथे खाद्यसंस्कृतीतदेखील बदल होतातच.

भारतीय खाद्यसासंकृतीचा जस्टिनवर  प्रभाव पडल्याने त्याने स्पर्धेत सुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे सलाड, लोणची, चिकन प्रेमी तर संपूर्ण जगात असतील तरी आपल्या पद्धतीचे इंडियन चिकन, चिकन करी तसेच काही परदेशी पदार्थाना आपला अस्सल भारतीय तडक देऊन जस्टिनने जजेसची मन जिंकली.

 

heavy indian food Inmrathi

 

या स्पर्धेत त्याचाच बरोबरीने आणखीन एक भारतीय स्पर्धक होता तर दुसरा एक बांगलादेशी होता जो स्वतः व्यवसायाने कुक होता मात्र स्पर्धेत बाजी मारली ती मात्र आपल्या भारतीय वंशांच्या पठ्याने.

 

आता पुढे काय?

आपल्याकडे साहजिकच एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर स्पर्धकाला विचारातच पुढे काय? जस्टिनला स्पर्धेत जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि १.८६ करोड रुपये मिळाले. खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न आता साकार होईल ते म्हणजे त्याला आता स्वतःचा फूड ट्रक चालू करायचा आहे, त्या ट्रक मधून जे उत्पन्न मिळेल त्यातून तो भारतामधील झोपड्पट्टीतील मुलांच्या जेवणाची आणि शिक्षणाची सोय करणार आहे. 

 

food truck inmarathi

हे ही वाचा – युट्यूबवर सुपरहिट मराठमोळ्या मुलीची मिशेल ओबामांनी पाठ थोपटलीय, वाचा

स्वदेस मधला शाहरुख भारतातील परिस्थिती बघून थेट नासामधला जॉब सोडून भारतात येतो. सुंदर पिचाई गूगलचा सीईओ बनतो, अमेरिकेच्या संसदेत आज अनेक भारतीय चेहरे दिसत आहेत. भारतीय लोकांना त्यांचा बुद्धिमत्तेला आज जगात प्रचंड मागणी आहे मात्र त्यांच्या मायभूमीतच त्यांच्या बुद्धिमत्तेला, कौश्यल्यातेला डावलले जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?