काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लहान मुलांना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे “मोठेपणी कोण होणार?” तेव्हा लहान मुलं खूप निरागसपणे उत्तरं देतात. काही लोकांना ट्राफिक पोलीस व्हायचं असतं,

काहींना बसचा कंडक्टर व्हायचं असतं, काहींना ड्रायव्हर व्हायच असतं. थोडक्यात त्यांना जी व्यक्ती सॉलिड वाटते किंवा आवडते, त्यांना मोठेपणी तेच व्हायचं असतं.

 

career-marathipizza01
envisagebpo.com

 

आपण सुद्धा लहान असताना आसपासच्या माणसांकडे बघून आपण मोठेपणी काय व्हायचं हा विचार करत असू. अर्थात आपल्याकडे तेव्हा तुलनेने खूप कमी पर्याय होते. परंतु आज मुलांकडे भरपूर करियर ऑप्शन्स आहेत. सर्वात मोठे ऑप्शन म्हणजे डिजिटल मिडिया!

आपल्या लहानपणी डिजिटल मिडियाचा उदय झालेला नव्हता त्यामुळे आपल्यापुढे त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स पुढे जाऊन निर्माण होऊ शकतील ह्याची आपल्याला कल्पनाही नव्हती. आज आपण अशाच काही जॉब्स बद्दल जाणून घेणार आहोत जे काही वर्षांपूर्वी अस्तित्वात सुद्धा नव्हते.

 

१. ब्लॉगर

 

blogger-marathipizza
moneyconnexion.com

 

हल्लीच्या डिजिटल मिडिया मध्ये ब्लॉगर आणि कंटेंट रायटर्सची विविध गोष्टींसाठी खूप आवश्यकता भासते. वेबसाईटचे कंटेंट लिहिण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा ऑनलाईन व्यासपीठावर प्रसार किंवा प्रचार करण्यासाठी ब्लॉगर्स आणि कंटेंट रायटर्सची आवश्यकता भासते.

हे लोक एकतर स्वतंत्रपणे काम करताना दिसून येतात किंवा अनेक मिडिया हाउसेस आणि वर्क फॉर एजन्सीजसाठी हे लोक काम करताना दिसतात. कुठेही काम केले तरी हे लोक अतिशय उत्तम प्रकारे आपले सुंदर लिखाण जगापुढे मांडतात.

ह्या डिजिटल मिडियाद्वारे आपल्याला एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोचता येते आणि हे काम करून लोक उत्तम प्रकारे त्यात करियर करत आहेत, ह्यापैकी काहींना तर त्यांच्या लिखाणासाठी भरपूर मानधन मिळते. लेखकांसाठी करियरचा हा ऑप्शन १०-१५ वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता.

 

२. सोशल मिडिया मॅनेजर 

 

social-media-manager-marathipizza
blog.firebrandtalent.com

 

खरंतर आपण सगळेच सोशल मिडियावर ऍक्टिव्ह असलेले लोक सोशल मिडिया मॅनेजर आहोत असे म्हणायला हरकत नाही. आपण अनेक गोष्टी ट्वीटर वर ट्वीट करत असतो

किंवा instagram वर परफेक्ट फिल्टर सिलेक्ट करत असतो किंवा फेसबुक वर आपल्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी पोस्ट करून त्या हजारो लोकांपर्यंत पोचवत असतो.

थोडक्यात सोशल मिडीयाचा प्रसिद्धीसाठी कसा वापर करायचा हे आपल्याला पक्के माहीत असते. अगदी हेच काम सोशल मिडिया मॅनेजरचे असते. ह्या जॉब साठी कुठले विशिष्ट क्वालिफिकेशन लागत नाही.

तुम्हाला सोशल मिडिया मॅनेजर व्हायचे असेल तर सोशल मिडीयाचा थोडा अनुभव किंवा डिजिटल मार्केटिंगची माहिती असणे आवश्यक आहे.

 

३. युजर एक्स्पीरियंस डिजायनर

 

user-experience-designer-marathipizza
kent.edu

 

तुम्हाला जर तेच ते templates किवा वेबसाईटचे पेजेस डिझाईन करून कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमची कला युझर एक्स्पीरियंस डिझायनर होऊन त्यात दाखवू शकता. युजर एक्स्पीरियंस डिझायनरला ‘UX’ असेही म्हणतात.

हे डिझायनर्स मोबाईल अॅप्लिकेशन्स वर काम करतात. तसेच हे अॅप्लिकेशन वापरताना लोकांना काय काय अडचणी येतात, कुठले एरर्स येतात किंवा लोकांना अॅप्लिकेशन मध्ये काय हवे , UI (user interface) कसे हवे , कुठल्या प्रकारचे बदल लोकांना अपेक्षित आहेत,

ह्या डेटावर काम करतात किंवा त्यांच्याकडून युजर्सना काय वेगळे आणि स्पेशल देता येईल ह्यावर तसेच अँप कसे एन्गेजिंग बनवता येईल ह्यावर ते काम करतात.

 

४. अॅप्लिकेशन डेव्हलपर

 

app-developer-marathipizza
solutionsreview.com

 

१५ वर्षांपूर्वी स्मार्टफोन्सचा उगम झाला नव्हता त्यामुळे अॅप्लिकेशन म्हणजे अर्ज इतकेच आपल्याला माहित होते. त्यामुळे हे अॅप डेव्हलपर्स सुद्धा नव्हते. पण आता अॅप्लिकेशन म्हणजे मोबाईल अॅप्लिकेशन हे समीकरण झाले आहे.

त्यामुळे आता वेगवेगळे अॅप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी लोकांना अॅप्लिकेशन डेव्हलपरची मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागली आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, कुकिंग साठी अॅप , प्रवासासाठी अॅप, हॉटेल्स साठी अॅप असे आपल्या सर्व गरजांसाठी व्यवस्थित चालणाऱ्या अॅप्स डेव्हलप करणाऱ्या अॅप्लीकेशन डेव्हलपर्सची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ह्या आधी कोणाला वाटलेही नसेल की आयटीची डिग्री हा इतका मस्त जॉब मिळवून देईल!

 

५. स्पोर्ट्स मॅनेजर

 

sports-manager-marathipizza
keywordsuggest.org

 

जर तुम्ही फिजिकल एज्युकेशन मध्ये शिक्षण घेतले असेल किंवा तुम्ही एक चांगले खेळाडू आहात किंवा तुम्हाला क्रीडा अभ्यासक्रम कसा असायला हवा ह्याचे ज्ञान आहे.

किंवा खेळाडूंना कसे चांगले प्रशिक्षण द्यावे ह्याचा तुमचा चांगला अभ्यास आहे किंवा खेळांचे मॅनेजमेंट कसे असावे किंवा खेळाच्या संस्थात्मक पैलूंबद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे, तर तुम्ही स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून नक्की चांगले करियर करू शकता.

तुमच्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही एखाद्या शाळा किंवा कॉलेजच्या स्पोर्ट्स टीम पासून सुरुवात करून नंतर राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करू शकता. एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सुद्धा काम करू शकता.

 

६. चीफ लिसनिंग ऑफिसर

 

clo-marathipizza
linkedin.com

 

हल्ली कंपन्यांमध्ये चीफ लिसनिंग ऑफिसर ही पोस्ट अतिशय महत्वाची मानली जाते. कंपनीच्या पार्टनर्सचे बोलणे, वेगवेगळ्या क्लायंटचे म्हणणे कंपनी पर्यंत पोचवण्याचे महत्वपूर्ण काम हे ऑफिसर्स करतात.

जर तुम्हाला चीफ लिसनिंग ऑफिसर म्हणून काम करायचे असे तर त्यासाठी संबंधित क्षेत्राचा अनुभव गाठीशी असायला हवा. ही पोझिशन इतकी महत्वाची आहे.

की बऱ्याच वेळा कंपनीचा सीइओच हे काम करतो, कारण ह्या पोझिशनच्या लोकांना क्लायंट किंवा पार्टनर सोबतच्या मिटिंग मधला एकही शब्द मिस करून चालत नाही.

बऱ्याच वेळा ह्या ऑफिसर्स कडून क्लायंटच्या प्रॉब्लेमवर लगेच सोल्युशन सांगण्याची जबाबदारी सुद्धा असते. ह्या साठी तुम्ही किती एकाग्रतेने समोरच्याचे बोलणे ऐकू शकता आणि समजून घेऊ शकता हे सर्वात मोठी आवश्यकता आहे.

 

७. बिग डेटा अनॅलिस्ट

 

big-data-analyst-marathipizza
datasciencetech.institute

 

रोज नवनवीन येणारे ऑनलाईन ट्रेंड्स समजून घेणे, त्याचा इंटरनेट वर कंपनीच्या किंवा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे हे बिग डेटा अनॅलिस्टचे काम आहे.

ह्या कामासाठी प्रचंड बुद्धिमत्ता आणि डेडीकेशनची आवश्यकता असते. तसेच डिजिटल मार्केटिंगचे आणि बिग डेटाचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक असते. तुम्ही सुरुवात करून आपल्या कौशल्यावर हळू हळू पुढे गेलात तर ह्या क्षेत्रात प्रचंड पैसा व मान मिळवू शकता

 

८. YouTube कंटेंट क्रियेटर

 

indian-youtuber-marathipizza
economictimes.indiatimes.com

 

ह्या डिजिटल मिडीयाच्या जमान्यात YouTube चे महत्व सर्वांनाच माहित आहे. YouTube वर स्टार होऊन प्रसिद्धी मिळवणे हल्ली प्रतिष्ठेचे मानले जाते. Ryan Higa, BB आणि PewDiePie ही नावे तुम्हाला माहित असतीलच.

YouTube channel सुरु करून त्यावर वेळोवेळी व्हिडीयोज टाकून जास्तीत जास्त सदस्य मिळवण्याकडे हल्ली लोकांचा कल असतो. तुमच्याकडे जर लोकांचे मनोरंजन करण्याची कला असेल किंवा भरपूर नॉलेज असेल,

ते आकर्षक प्रकारे लोकांपुढे मांडण्याची कला असेल तर तुमच्यासाठी हे करियर ऑप्शन खुले आहे. कॅमेरा पुढे किंवा कॅमेरा मागे काम करून तुम्ही स्वतंत्रपणे हे करू शकता.

एखाद्या मिडिया हाउस किंवा इंटरटेनमेंट कंपनीला जॉईन होऊन तुम्ही डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर किंवा प्रोड्युसर म्हणून हे काम करू शकता.

 

९. व्हर्च्युअल असिस्टंट

 

virtual-assistant-marathipizza
udemy.com

 

ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचे आहे त्यांच्यासाठी तर हा जॉब एकदम चांगला आहे. चॅट इंजिनद्वारे तुम्ही कंपनीच्या क्लायंटना त्यांच्या प्रॉब्लेम्स साठी ऑनलाईन मदत किंवा असिस्टन्स देऊ शकता.

ज्यांना ऑफिसला न जाता स्वतःच्या घरी बसून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या करियर ऑप्शनचा विचार करायला हरकत नाही.

 

१०. जेनेटिक कौन्सेलर

 

genetic-counselor-marathipizza
healthcare-salaries.com

 

तुम्ही जर बायोलॉजी किंवा हेल्थकेअर मध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्ही जेनेटिक कौन्सेलर म्हणून काम करू शकता. ह्यात तुम्ही लोकांना अनेक आजारांबद्दल माहिती देऊन त्यांचे रोगनिदान करू शकता,

किंवा त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून होऊ शकणाऱ्या अनुवंशिक आजारांबद्दल सावध करू शकता. ह्या करियर मध्ये कौशल्यपूर्ण काम करणाऱ्याला भरपूर मानधन मिळते.

त्यामुळे आता तुम्हाला त्याच त्या करियर ऑप्शनचा विचार करण्याची गरज नाही. ह्यापैकी कुठलाही करियर ऑप्शन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकता व प्रचलित नोकऱ्यांपेक्षा काही वेगळे करू शकता.

हे देखील वाचा : (परदेशामध्ये नोकरी करायचीये? मग हे ५ कोर्स तुमची स्वप्न पूर्ण करतील!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

  • March 10, 2020 at 3:18 am
    Permalink

    Nice

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?