' चित्रपटात दाक्षिणात्य लोकांना ठराविक साच्यातच दाखवायचं का? ७ खुळचट प्रकार

चित्रपटात दाक्षिणात्य लोकांना ठराविक साच्यातच दाखवायचं का? ७ खुळचट प्रकार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चेन्नई एक्सप्रेस सिनेमा आपल्याला सगळ्यांच्याच अजूनही स्मरणात असेल, किंग खान शाहरुखच्या करियरला किकस्टार्ट देणारा, दीपिका पदूकोणच्या करियरमधला एक महत्वाचा सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं.

हा सिनेमा जेव्हा रिलीज केला गेला तेव्हा यातल्या काही तामिळ डायलॉग्सचं हिंदीत भाषांतरसुद्धा केलं गेलं नव्हतं. एकंदरच साऊथच्या भाषेला मान देण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने हे पाऊल उचललं होतं!

यातली गाणी दीपिकाचं ‘चलो’ असं टिपिकल साऊथस्टाइलमध्ये म्हणणं, त्यातले सीन्स हे आजही लोकं आवडीने बघतात त्यावर मीम्सही शेअर होतात, कामर्शियली हा सिनेमा प्रचंड हिट असला तरी यातही बॉलिवूडच्या इतर सिनेमांप्रमाणे दाक्षिणात्य लोकांना स्टीरिओटाइप केलं गेलं!

 

chennai express inmarathi

 

बॉलिवूडमध्ये गुजराती, महाराष्ट्रियन, साऊथ इंडियन, बंगाली, गोवन अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना एका ठराविक साच्यातच दाखवलं जातं हे आपण आजवरच्या कित्येक कलाकृतितून पाहिलं असेल.

जसं की मराठी माणसाला नेहमी रंजलेला गांजलेला दाखवणं किंवा एखाद्या नोकराची दुय्यम भूमिका देणं, बंगाली लोकांना फक्त मासे खाण्यात पटाईत दाखवणं, गुजराती लोकांना सतत पैशाचा विचार करताना दाखवणं, गोव्यातल्या लोकांना कायम ‘सुसेगाड’ म्हणून संबोधणं!

 

anushka and aishwarya inmarathi

 

अशी कित्येक उदाहरणं देता येतील, तसंच आपल्या या फिल्म्समध्ये साऊथ इंडियन म्हणजे दाक्षिणात्य लोकांनाही एकाच साच्यातलं दाखवलं जातं, त्याविषयीच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

कशाप्रकारे सिनेमातल्या साऊथ इंडियन पात्र लिहिलं जातं? त्याची वेशभूषा, खाण्याच्या सवयी, देहबोली, सगळंच कशाप्रकारे स्टीरिओटाईप केलं जातं ते बघूया!

हे ही वाचा ह्या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात!

१. साऊथ इंडियन लोकांना कायम मद्रासीच असतात:

 

aparichit inmarathi

 

आपल्या देशाच्या प्रांतवार रचनेनुसारच तिथल्या लोकांना संबोधलं जातं, जसं उत्तरेकडच्या लोकांना नॉर्थ इंडियन म्हंटलं जातं, महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रियन संबोधलं जातं, बंगालच्या लोकांना बंगाली म्हंटलं जातं तसंच केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या प्रदेशातल्या लोकांना साऊथ इंडियन म्हणतात!

पण भारतीय सिनेमात साऊथ इंडियन म्हणजे कायम मद्रासी अण्णा हा जो काही गैरसमज ठासून भरलेला आहे तो अजूनही दूर झालेला नाही, अजूनही कोणत्याही भारतीय सिनेमातल्या साऊथ कडच्या पात्राला मद्राशी म्हणूनच ओळख दिली जाते!

२. सगळेच साऊथ इंडियन्स भरतनाट्यम शिकलेले असतात:

 

mehmood in padosan inmarathi

 

पडोसन चित्रपटातला महमुद जसा संगीत आणि नृत्यात निपुण दाखवला आहे तसंच कित्येक चित्रपटात साऊथ इंडियन लोकांना कायम संगीतान आणि खासकरून भरतनाट्यममध्ये रुची असलेलं दाखवलं जातं.

साऊथच्या लोकांना इतरही अनेक छंद असतात, हे मान्य आहे की त्यांच्या संस्कृतीत नृत्य आणि संगीत याला जास्त महत्व आहे पण तरी ती लोकं इतरही कलांमध्ये निपुण असतात हेदेखील तितकंच खरं आहे!

३. साऊथची लोकं कायम लुंगी घालतात :

 

lungi inmarathi

 

वेशभूषेचा चित्रपटसृष्टीवर सर्वात जास्त प्रभाव आहे हे आपल्याला प्रत्येक सिनेमात जाणवतं. आजही अगदी महेश बाबू पासून अल्लू अर्जुन पर्यंत प्रत्येक कलाकार हा त्यांच्या त्यांच्या सिनेमात एकदातरी लुंगी घातलेला दिसतोच.

बॉलिवूडमध्येही कोणत्याही साऊथ इंडियन माणसाला दाखवायचं असेल तर ‘लुंगी’ यायलाच हवी, मग तो परींदा मधला खलनायक अण्णा साकरणारा नाना पाटेकर असो किंवा चेन्नई एक्सप्रेसमधला शाहरुख!

पण सगळ्याच साऊथ इंडियन लोकांना लुंगी घालणं पसंत असतं असंही नाही, रिती रिवाजापुरते एका ठराविक दिवशी काही लोक लुंगी घालतातही, पण त्या लोकांना केवळ लुंगीतच दाखवणं हेदेखील तसं चुकीचंच आहे!

४. सगळेच साऊथ इंडियन काळे असतात :

 

south indian actors inmarathi

 

रेसीजमचं याहून बेस्ट उदाहरण तुम्हाला आणखीन कुठेच मिळणार नाही, तारक मेहता मधला अय्यर असो किंवा धमाल चित्रपटातला विनय आपटे असो. साऊथ कडची सगळीच लोकं काळी असतात हे ज्या पद्धतीने आपल्या मनावर बिंबवलं गेलंय ते अजूनही लोकांच्या डोक्यात अगदी फिट आहे.

अगदी रजनीकांतच्या शिवाजी द बॉस या सिनेमातही या रेसीजमची प्रचंड खिल्ली उडवलेली आपण पाहिली आहेच.

साऊथच्या कित्येक अभिनेत्रीतर याला सर्वात मोठा अपवाद आहे. तापसी पन्नूपासून श्रुती हसन, सई पल्लवी, रश्मिका अशा कित्येक अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनादेखील लाजवतील इतक्या देखण्या आणि उजळ आहेत!

५. साऊथ इन्डियन्सची टिपिकल भाषा :

 

aiyo inmarathi

 

कोणत्याही सिनेमात एक जरी दाक्षिणात्य पात्र असेल तर त्याच्या तोंडी “अय्यो, अम्मा, अप्पा, मुरुगना” हे शब्द यायलाच हवेत हेदेखील भारतीय सिनेमांनी ठासून दाखवलं आहे.

रजनीकांत या सुपरस्टारची ओळखही “यन्ना रास्कला” या डायलॉगने करणारी चित्रपटसृष्टि इतर साऊथ इंडियन लोकांना सोडेल असं वाटत असेल तर तो गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.

आजही साऊथ इंडियन लोकांच्या या शब्दावरून आणि त्यांच्या उच्चारावरून आपल्या सिनेमात प्रचंड खिल्ली उडवली जाते!

६. साऊथची लोकं फक्त इडली डोसा खातात :

 

idli inmarathi

 

चेन्नई एक्सप्रेसमधला शाहरुख जेव्हा ट्रेनमध्ये झोपेतून जागा होतो तेव्हा त्याच्यासमोर एक आडदांड माणूस इडली खाताना दिसतो तर सैराटसारख्या आशयघन सिनेमातही जेव्हा आर्चि परश्या हैदराबादला जातात तेव्हा ते एका इडली डोसाच्याच ठेल्यावर कामाला लागतात.

आपल्या सिनेमांमध्ये साऊथची लोकं फक्त इडली डोसाच खातात हे जरी दाखवत असले तरी त्यापेक्षा अजून ते बऱ्याच वेगळ्या गोष्टी खातात. त्या लोकांना रस्सम, पायसम, पुट्टू अशा वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना सिनेमात कधीच दाखवलं जात नाही!

साऊथच्या खाद्यसंस्कृतीतही प्रचंड प्रकार आहेत पण सिनेमात ग्लोरीफाय केलं जातं ते फक्त इडली आणि डोसा!

७. साऊथ इंडियन लोकं हिंदी ‘बोलतच’ नाहीत :

 

chennai express 2 inmarathi

 

हा एक खूपच मोठा गैरसमज आहे, फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर रोजच्या जीवनातही आपण सगळेच असा विचार करतो की साऊथची लोकं ही हिंदी बोलतच नाहीत, किंवा अगदी वेळ पडली तर ती अगदी तोडकं मोडकं हिंदी बोलतात!

मुळात त्या लोकांना त्याच्या भाषेचा अभिमान आहे म्हणून ते हिंदीत बोलणं टाळतात पण याचा अर्थ त्यांना हिंदी येतच नाही असं नाही.

कित्येक साऊथ इन्डियन्स नॉर्थला किंवा महाराष्ट्रात राहूनही अस्खलित हिंदी आणि मराठी बोलतात, पण आपल्या सिनेमात कायम साऊथच्या लोकांना हिंदीचा फोबियाच आहे असं चित्र निर्माण केलं गेलं आहे!

या काही दाक्षिणात्य लोकांबद्दलच्या गैरसमजुती चित्रपटातून सर्रास पसरवल्या गेल्या आहेत, तुम्हालाही आणखी काही गोष्टी माहीत असतील तर त्या कॉमेंटमध्ये अवश्य कळवा!

===

हे ही वाचा मारवाडी लोकांसारखं अफाट यश, मराठी माणूसही मिळवू शकतो, वाचा ही १५ सिक्रेट्स!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?