' नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा हा हिंदी सिनेमा बेतलाय चक्क एका 'मराठी सिनेमावर'...

नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा हा हिंदी सिनेमा बेतलाय चक्क एका ‘मराठी सिनेमावर’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड आणि रिमेक्स हे एक समीकरणच बनून गेले आहे. अगदी ५०च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये प्रामुख्याने साऊथच्या फिल्म्सचे रिमेक्स बनले जात होते. साऊथमध्ये एखादा चित्रपट चालला नाही तर तो हिंदीत मात्र सुपरहिट होत असे.

साऊथच्या फिल्म्स हिंदीत हिट करण्याचं श्रेय जात ते राजश्री प्रोडक्शनचे संस्थापक स्व. तारांचंद बडजात्यांना. त्यांनी अनेक साऊथच्या चित्रपटांना केवळ हिट करून नाही दाखवले तर स्वतः त्यांनी त्या चित्रपटांच्या वितरणाची जवाबदारी स्वीकारली होती.

 

Gajhani Remake Inmarathi

 

केवळ साउथचे सिनेमे हिंदी वाले घेत नव्हते तर इतर भाषेतील सिनेमेसुद्धा ते घेत होते, मग आपल्या मातीतील चित्रपट कसे मागे पडतील?  चित्रमहर्षीं ज्यांना संबोधले जाते ते म्हणजे व्ही. शांताराम, ते सुद्धा एकावेळी दोन्ही भाषेत सारख्याच विषयांचे चित्रपट बनवत. सैराट सारखा मराठीतली गाजलेला सिनेमा सुद्धा हिंदीत येऊन गेला मात्र तिकडे तो अपयशी ठरला.

मिमी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. ज्यात सुखवाहा गोष्ट होती ती म्हणजे मराठीतील आघाडीची बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली तर कीर्ती सनोन ही मुख्य अभिनेत्री आहे तर पंकज त्रिपाठी, मनोज पहावा, सुप्रिया पाठक यासारख्या दिग्गज कलाकार दिसले.

 

mimi inmarathi

हे ही वाचा – केवळ सकारात्मक कथा मांडून साऊथच्या निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये खेचून आणणारा अवलिया

चित्रपटाची कास्ट तगडी आहेच पण चित्रपटाची कथा चक्क एका मराठी सिनेमावरून घेतली आहे, तो म्हणजे मला आई व्हायचे आहे ज्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बरं ज्या काळात हा सिनेमा येऊन गेला त्याकाळात मराठीत एकीएकडे नटरंग सिनेमाने यशाचे विक्रम मोडले होते, त्याकाळात हा  वेगळ्या धाटणीचा मराठी सिनेमा येऊन गेला होता. 

आज महिलांच्या अंतर्वस्त्रावरून, मासिक पाळीवरून सर्रास उघडपणे चर्चा केली जाते. पण साधारण १० वर्षांपूर्वी असे विषय उघड्पणे चर्चिले जात नव्हते. सरोगसी हा मुद्द्यावरून १० वर्षपूर्वी अनेक उलटसुलट चर्चा होत होती, खुद्द शाहरुख खान सुद्धा सरोगसी प्रकारांमुळे चर्चेत आला होता.

 

mimi 2 inmarathi

 

मला आई व्हायचे आहे हा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या सुद्धा एक महिलाच आहेत, ऍड. समुद्धी पोरे या मुंबई हायकोर्टात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा संबंध समाजातील तळागाळातील लोकांशी येत असतो त्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले अशा सर्व लोकांशी येत असल्याने, त्यांना रोज नवनवे समाजातील प्रश्न कळत असतील.

परदेशातील अनेक जोडपी आज भारतात येतात ती केवळ भारतीय स्त्रियांकडून मुलं जन्माला घालण्यासाठी, त्याबदल्यात भारतीय स्त्रियांना भरभक्कम पैसे देऊ करतात. आई होणं हा स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. मात्र परदेशातील चालीरीती आणि तिकडच्या स्त्रियांची एकूणच मानसिकता वेगळी आहे. तसेच तिकडच्या स्त्रियांना मुलं न होणे, किंवा मातृत्वाची जवाबदारी न घेणे, अथवा मातृत्वसाठी शरीर सुद्धा तयार नसणे, अशा अनेक समस्या त्यांना असतात म्हणून असे जोडपी भारतात येतात. 

 

samruddhi pore

 

समृद्धी पोरे यांचा संबंध सुद्धा अशाच एका सरोगसी केसशी आल्याने, या सरोगसी प्रश्नावर फिल्म करायचे ठरवले. उर्मिला कोठारे प्रमुख भूमिकेत होती. या सिनेमाचे वैशिष्टय असं आहे की या चित्रपट जे सरोगेसी मधून जन्मला आले आहे ते वास्तवात सुद्धा सरोगसी मुलं आहे.

आज दहा वर्षानंतर हिंदीत असा विषय आणायचे धाडस सुद्धा लक्ष्मण उतेकर सारख्या मराठी दिग्दर्शकाने आणले आहे. मराठीत या चित्रपटाला  इमोशनल टच देण्यात आला होता, मात्र हिंदीत थोडा हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला आहे असे ट्रेलर वरून दिसत आहे.

 

mimi 1 inmarathi

हे ही वाचा – मराठीतला मास्टरपीस “अशी ही बनवाबनवी” एका फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक होता!

रोहित शेट्टी सारखा दिग्दर्शक खरं तर मराठी कलाकृती हिंदीत हिट करून एक यशस्वी दिग्दर्शक बनला आहे.तो स्वतः देखील कबूल करतो की मराठी मधील विषय, साहित्य, अभिनेते हे उत्तम आहेत.

आज बॉलीवूडमध्ये समाजातील प्रश्नांनावर अनेक सिनेमे येत आहेत. कधीकाळी बॉलीवूड मध्ये तद्दन मसाला सिनेमांची गर्दी होती मात्र आज अनेक नवनवीन दिग्दर्शक पुढे येऊन वेगवेगळे विषय हाताळत आहेत. सिनेमा हा खरा तर समाजाचा आरास असतो असे मानणारे लोक आपल्या कलाकृतीतून हे दाखवत आहेत. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?