' बाई आणि ब्रा - या विळख्यात 'तिला' अडकवणाऱ्यांना हेमांगी कवीचा सणसणीत टोला

बाई आणि ब्रा – या विळख्यात ‘तिला’ अडकवणाऱ्यांना हेमांगी कवीचा सणसणीत टोला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्त्री आणि तिचे शरीर यांचा संबंध थेट लाज, संस्कार यांच्याशी जोडला जातो. तोकडे कपडे, फॅशन करणाऱ्या मुलींना मर्यादेत राहण्याची आठवण करून देण्यासाठीही अनेकजण न बोलवता पुढे येतात, मात्र अंतर्वस्त्रासारख्या अत्यंंत खाजगी बाबतीतही नाक खुपसणाऱ्यांवर  अभिनेत्री हेमांगी कवी हिने सोशल मिडीयावर हल्लाबोल चढवलाय. एक स्त्री आणि संवेदनशील मनाची तरिही परखडपणे व्यक्त होणाऱ्या हेमांगीची पोस्ट प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.

 

hemangi kavi dhumal inmarathi

 

===

बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे  (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!

मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!

 

bra inmarathi

 

अर्थात त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice! पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…

ब्रा, ब्रेसियर (अंतर्वस्त्रा) चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!

Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!

ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?

कितीतरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात. tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकटपट्टी लावतात. बाप रे!. कशासाठी एवढं आणि का?

 

breast tb inmarathi

 

कितीतरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही ‘लोग क्या कहेंगे’ यासाठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात.

कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!

स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी ‘काढण्याची मुभा’ दिल्यासारखी काढून ठेवायची! त्यावेळीही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार?

हे ही वाचा – विचित्र वाटेल, पण हे अंतर्वस्त्र नको म्हणून महिलांनीच आंदोलन केलं होतं…वाचा

bra 1 inmarathi

 

बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ, पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो प्रॉब्लेम त्या पुरुषांचा आहे.

आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं ‘त्यांच्या’ डोक्यात पक्कं आहे!

आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही!  बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो.

याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही.

अरे किती ती बंधनं? किती ते ‘लोक काय म्हणतील’चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या!

 

girls inmarathi

 

खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वेच्छेने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?