' भविष्य “ओळखण्याची” कला अन् पाण्याचं साम्राज्य : एक जबरदस्त सक्सेस स्टोरी – InMarathi

भविष्य “ओळखण्याची” कला अन् पाण्याचं साम्राज्य : एक जबरदस्त सक्सेस स्टोरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पाणी’ ही आपल्या शरीराची अत्यावश्यक गरज आहे. शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी न प्यायल्याने, कित्येक आजारांची सुरुवात होऊ शकते असं डॉक्टर नेहमीच सांगत असतात. पाऊस भरपूर पडणाऱ्या भारत देशात पिण्याचं पाणी हे नेहमीच नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होत असतं.

भारतातील कोणत्याही हॉटेलमध्ये पाणी हे फुकट दिलं जातं. पाऊस न पडणाऱ्या आखाती देशांमध्ये मात्र आपल्याला पाणी हे विकत घेऊनच प्यावं लागतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप मध्ये शुद्ध पाणी मिळण्याचं प्रमाण खूप कमी झालं होतं, म्हणून तिथे ‘बॉटल्ड वॉटर’ या उद्योग क्षेत्राची सर्वप्रथम सुरुवात झाली होती.

 

bisleri inmarathi

इलॉन मस्क नव्हे – विजेवर चालणारी कार या भारतीयाने शोधून काढली होती…!

पाण्याने समृद्ध असलेल्या आपल्या भारत देशात सुद्धा, शुद्ध, मिनरलयुक्त पाणी विकलं जाऊ शकतं, हे सर्वप्रथम लक्षात आलं ते ‘बिसलेरी’ कंपनीला.

आज जगभरात शुद्ध पाणी म्हणजे ‘बिसलेरी’ हे जणू समीकरणच झालं आहे. “एक बिसलेरी देना” हे वाक्य कित्येक वेळेस आपल्या कानावर पडत असतं. हे वाक्य म्हणजे बिसलेरीने लोकांच्या मनात कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे.

कोणी आणली ही ‘बिसलेरी’ भारतात? कशी झाली ही बिसलेरी जगातील शुद्ध पाणी विकणारी अग्रगण्य कंपनी ? जाणून घेऊयात.

१९६९ मध्ये ‘फेलीस बिसलेरी’ या इटलीच्या व्यक्तीने त्याची कंपनी ‘बिसलेरी लिमिटेड’ ही मार्केटमधील अत्यल्प प्रतिसादामुळे विकायला काढली होती. पारले ग्रुपच्या रमेश चौहान यांनी बिसलेरी ही कंपनी विकत घेण्याचं धाडस केलं.

 

bisleri inmarathi 3

 

शुद्ध पाणी विकण्याच्या या व्यवसायात रमेश चौहान यांना हे लक्षात आलं होतं, की भारतात काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. ज्याचा काही लोकांना त्रास होत आहे. भविष्यात शुद्ध पाण्याची गरज वाढत जाईल. लोक त्यासाठी पैसे खर्च करायला मागे पुढे बघणार नाहीत. प्रवास करतांना तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट असेल. हे मुद्दे लक्षात घेऊन पारले उद्योग समूहाने बिसलेरी मिनरल वॉटरचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

बिसलेरीची पहिली जाहिरात ही वर्तमानपत्रात करण्यात आली होती. ज्यामध्ये एका वेटरला ग्राहकांना बिसलेरी बॉटल देतांनाचा फोटो होता. “बिसलेरी, वेरी वेरी एक्स्ट्रा ऑर्डीनरी” हे कंपनीची सर्वात पहिली टॅगलाईन होती.

बिसलेरी हे एक इटालियन नाव असल्याने आणि बॉटलचा आकार, रंग हे आकर्षक असल्याने अल्पवधीतच बिसलेरीच्या पाण्याला लोकमान्यता मिळाली.

आज बिसलेरीचे जगभरात एकूण १२२ हून जास्त प्लांटस आहेत. ४५०० विविध भागात वितरक आहेत आणि फक्त भारतात ५००० वितरण करणारे ट्रक आहेत. प्रत्येक महिन्यात बिसलेरीच्या १५ करोडहून अधिक बॉटल्सची विक्री होते.

 

bisleri inmarathi 1

 

१९८० च्या दशकात काचेच्या बाटलीतून विकला जाणारा सोडा सुद्धा खूप लोकप्रिय होता. पारले उद्योग समूहाने ‘बिसलेरी सोडा’ची कार्बन युक्त आणि कार्बन विरहित या दोन प्रकारात निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे ‘बिसलेरी’ हे नाव लोकांपर्यंत एकापेक्षा जास्त वस्तूंसाठी जाऊ लागलं.

पीव्हीसी प्रकारच्या बॉटलमधून अधिक दणकट असलेल्या PET बॉटल्स कडे वळणं हा निर्णय सुद्धा बिसलेरी साठी हिताचा ठरला होता. या प्रकारामुळे बिसलेरी ची बॉटल ही अधिक पारदर्शक दिसायला लागली होती. बिसलेरीकडे बघूनच पाणी किती शुद्ध आहे याचा अंदाज लोकांना या बॉटल प्रकारात येत होता.

१९९१ मध्ये बिसलेरीने २० लिटर्सच्या बॉटलची निर्मिती करायला सुरुवात केली आणि घराघरात पोहोचलेली बिसलेरी लोकांना त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा दिसू लागली. हीच तर असते खरी मार्केटिंग.

 

bisleri inmarathi 4

टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय!

१९९३ मध्ये पारले उद्योग समूहाच्या हे लक्षात आलं, की सोडा बॉटलपेक्षा चांगला प्रतिसाद हा आपल्याला ‘बिसलेरी मिनरल वॉटर’च्या विक्रीतून मिळत आहे. सोडा ब्रँड हे कोका कोला ग्रुपला विकण्याचा निर्णय घेतला आणि आपलं पूर्ण लक्ष त्यांनी ‘बिसलेरी’वर केंद्रित केलं.

बिसलेरीच्या आकारामुळे आणि किंमतीमुळे केवळ एक वर्ग हे पाणी विकत घेत आहे. जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी छोट्या बॉटल बिसलेरीची निर्मिती करायला सुरुवात केली. ५०० मिलीची बिसलेरी बॉटल जेव्हा ५ रुपयांना उपलब्ध करून दिली गेली, तेव्हा बिसलेरीची विक्री फार मोठ्या प्रमाणावर वाढली.

बिसलेरीच्या यशाची काही कारणे सांगता येतील :

१. निर्मिती मूल्य कमी ठेवणे

२. छोटी ५०० मिली बॉटलची सुरुवात केल्यानंतर लोकांना १ लीटरच्या बॉटलमुळे वाया जाणारं पाणी वाचवता आलं.

३. बिसलेरीचा खप वाढण्यासाठी भारताचं दरवर्षी भारताची वाढणारी लोकसंख्या, मागणी हे सुद्धा ठरलं. ३०० करोड इतकी पूर्ण मागणी असलेल्या या शुद्ध पाण्याच्या क्षेत्रात बिसलेरीचा जवळपास ४०% म्हणजे ७५ करोड बॉटल्स इतका मार्केट शेअर आहे.

४. बांधकामाच्या, पिण्याच्या पाण्याच्या अपूर्ण सोयी देणाऱ्या भारतातील काही बिल्डर्समुळे सुद्धा बिसलेरीला १२ लिटरची बॉटल्स सारख्या नवीन प्रकारात काम करण्याची संधी मिळाली. या प्रकारात प्रतिलिटर ३ रुपये इतका कमी दर देऊन बिसलेरीने ग्राहकांना आकर्षित केलं.

५. गुणवत्ता दर्जा राखण्यासाठी बिसलेरी ने १९९८ मध्ये १० प्रक्रिया ठरवल्या ज्यामुळे कंपनीतून बाहेर जाणारी प्रत्येक बॉटल ही ११४ टेस्ट पार करून जाऊ लागली. इतक्या टेस्ट करणारी बिसलेरी ही जगातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे.

२००६ मध्ये कंपनीने बॉटलचा निळा रंग बदलून हिरव्या रंगात बॉटलची निर्मिती, विक्री करण्यास सुरुवात केली. हरित वातावरणाचं समर्थन करणारा हा रंग सुद्धा लोकांना लगेच पसंत पडला. त्यासोबतच २०१७ मध्ये आपल्या बॉटलवर मराठी, गुजराती, पंजाबी, तामिळ, तेलगू अशा प्रादेशिक भाषांमध्ये बिसलेरीचं नाव लिहून प्रत्येक प्रांतात लोकांना आपलंसं केलं.

रमेश चौहान यांनी ४० वर्ष कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. २०१९ मध्ये अँजेलो जॉर्ज यांनी बिसलेरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.

 

bisleri man inmarathi

 

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये कंपनीने ‘बिसलेरी@डोअरस्टेप’ ही होम डिलिव्हरीची व्यवस्था सुरू केली आणि आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली.

आपल्या गोड आणि शुद्ध पाण्याने बिसलेरी लोकांना असाच आनंद आणि डोळे झाकून विश्वास ठेवता येईल असं पाणी पाजत राहील अशी आशा करूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?