' टाटा-अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींशी युद्ध छेडणारे 'नुस्लि वाडिया' आहेत तरी कोण?

टाटा-अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींशी युद्ध छेडणारे ‘नुस्लि वाडिया’ आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मध्यंतरी सायरस मेस्त्री हे नाव खूप चर्चेत होते. होय तेच सायरस मेस्त्री, जे टाटा ग्रुपचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना पदावरून हटवून मग रतन टाटांनी पुन्हा कंपनीची सूत्रे आपल्या हातात घेतली होती.

सायरस मेस्त्री यांचा पत्ता जेव्हा कट झाला, तेव्हा त्यांच्यासोबत आणखी एका मोठ्या उद्योगपतीची टाटा ग्रुपच्या मोठ्या पदावरून उचलबांगडी झाली होती, आणि ती व्यक्ती होती ‘नुस्ली वाडिया.’

हो हो तेच वाडिया जे पाकिस्तानी पंतप्रधान मोहम्मद अली जिनाचे नातू आहेत.

 

nusli wadiya mohammad ali jinnah inmarathi

 

टाटा आणि वाडिया यांच्यातला हा वाद हल्लीचाच आहे. पण याच वाडिया फॅमिलीचा अंबानी फॅमिली सोबतची लढाई फार जुनी आहे. आज बघुया वाडिया कुटुंबाच्या, अंबानी आणि टाटा या कुटुंबासोबत असलेल्या वादाबाबत, आणि त्यात कॉमन नाव असणाऱ्या नुस्ली वाडिया यांच्या बाबत.

 

 

वाडिया कुटुंबाचे नाव जेव्हा जेव्हा प्रकाशात येते, तेव्हा दोन कंपन्या आपोआप अधोरेखित होतात. एक म्हणजे बॉम्बे डाइंग आणि दुसरे म्हणजे ब्रिटानीया.

मुंबईच्या विकासात आणि पायाभरणीमध्ये पारशी समाजाचे किती योगदान आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुंबईचे प्रसिद्ध व्हीजेटीआय कॉलेज, हे याच पारशी वाडिया-पेटिट कुटुंबाचे देणे आहे.

अंबानी कुटुंबाशी स्पर्धा…!!

वाडिया कुटुंबाने मागच्या शतकभरापासून अनेक व्यवसायात आपला पाय मजबूत केला होता. हळूहळू त्यांनी आपला जम हा कापड व्यवसायात बसवायला सुरुवात केली होती.

जम बसणारच होता, एवढ्यात त्या स्वप्नांना सुरुंग लावला गेला, तो गुजरातमधून आलेले नवे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याकडून!

 

dhirubai ambani inmarathi

===

हे ही वाचा – शून्यातून एवढं उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या “ह्या” गोष्टी बरंच काही शिकवून जातात!

===

सत्तरच्या दशकात उदयाला आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीने अल्पावधीतच यशाची मोठमोठी शिखरे गाठण्यास सुरुवात केली होती.

१९८९ उजाडेपर्यंत रिलायन्सचा टर्नओव्हर हा ३००० कोटींच्या पल्याड गेला होता. बॉम्बे डाइंगची तुलना रिलायन्सशी होणे अशक्य होते. त्यांचा टर्नओव्हर केवळ ३०० करोड इतकाच होता.

बॉम्बे डाइंगला जिथे १०० करोड पार करायला १५० वर्षे लागली होती, तिथे रिलायन्सने केवळ १२ वर्षात १०० करोडचा टप्पा पार केला होता.

तीच रिलायन्स पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये घुसली होती. जिथे बॉम्बे डाइंगची निर्विवाद सत्ता होती. धीरूभाई अंबानी आणि नुस्ली वाडिया यांच्यात स्पर्धा सुरू झाली ती दोन रासायनिक कंपाउंडवरून.

 

bombay dyeing reliance inmarathi

 

एक म्हणजे डाई मिथाइल टेरेफ्थेलेट (डीएमटी) आणि दुसरे प्योरिफाइड टेरेफ्थैलिक एसिड (पीटीए) जे पॉलिस्टर कपडे बनवण्यासाठी वापरतात.

नुस्ली वाडियाची पसंद डीएमटी होती, तर धीरूभाई पीटीएने कपडे बनवू इच्छित होते. धीरूभाई अंबानी यांनी पिटीएपासून बनवलेल्या कपड्यांची अशी मार्केटिंग केली, की वाडिया त्यांच्या जवळपास सुद्धा नाही पोहोचू शकले. आणि बॉम्बे डाइंग शर्यतीत मागे पडली.

नंतर २०१७ मध्ये त्याच धीरूभाई अंबानीच्या लहान मुलाला, अनिल अंबानी यांना मागे टाकत नुस्ली वाडिया यांनी फोर्ब्जच्या यादीत मुसंडी मारली. १०० श्रीमंत लोकांच्या यादीत नुसती वाडिया २५ व्या स्थानावर होते आणि अनिल अंबानी ४५ व्या.

तीन-चार दशकापूर्वी ज्या अंबानीनी बॉम्बे डाइंग बुडवली होती, त्याच अंबानीच्या मुलाला मागे टाकत वाडिया यांनी पुन्हा बॉम्बे डाइंगचे नाणे  खणखणीत वाजवले होते.

टाटांशीही वाद

नुस्ली वाडिया हे अनेक दशके टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स आणि टाटा स्टीलचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. पण सायरस मेस्त्री आणि रतन टाटा यांच्यात झालेल्या वादामध्ये सायरस मेस्त्री यांची बाजू घेतल्यामुळे वाडिया याना टाटा संन्समध्ये असलेले आपले पद सोडावी लागली.

 

ratan tata and cyrus mistry inmarathi

 

टाटा मोटर्समधून काढून टाकल्यानंतर, वाडिया यांनी रतन टाटा यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. केसच्या ट्रायल दरम्यान वाडिया यांची एकूण संपत्ती ३.५ बिलियन डॉलरवरून थेट ७ बिलियन डॉलरपर्यंत वाढली होती.

पुढे २०२० मध्ये वाडिया यांनी टाटांवर केलेली आपली केस मागे घेतली. आणि मुख्य म्हणजे टाटा आणि वाडिया हे दोन्ही कुटुंब पूर्वापार पासूनचे मित्र आणि बिझनेस पार्टनर आहेत.

===

हे ही वाचा – शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा

===

 नुस्लि वाडिया नक्की आहेत तरी कोण?

नुस्लि हे मुंबईच्या प्रसिद्ध वाडिया कुटुंबाचे सदस्य होत. नेवल आणि दिना वाडिया यांचे ते चिरंजीव. ही असामी मोहम्मद अली जिना हे त्यांचे आजोबा, म्हणजेच त्यांच्या आईचे वडील! तर त्याच जिनांची पत्नी म्हणजे वाडियांची आजी रतनबाई पेटिट या टाटा-वाडिया कुटुंबातील सदस्य.

 

nusli wadia inmarathi

 

यावरून टाटा आणि वाडिया कुटुंबामधील संबंध लक्षात येतील.

नुस्ली वाडिया यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय वाढवत नेला. नंतर उद्योगाला उतरती कळा लागल्यावर रियल इस्टेटमध्ये त्यांनी आपला जम बसवला आणि वाडिया कुटुंबाच्या व्यवसायाला पुनरुज्जीवित केले.

पारशी समाजात बिझनेसचा असलेला किडा, त्यांना बिझनेस निर्माण करायला कसा प्रवृत्त करतो हे नुस्ली वाडिया यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

टाटा अंबानी सारख्या उद्योजकांना भिडून सुद्धा त्यांनी स्वतःचे असे साम्राज्य उभे करून ते वाढवून दाखवले.

===

हे ही वाचा – जाणून घ्या श्रीमंत लोकांचं सिक्रेट… या “१५ गोष्टी” ते चुकूनही करत नाहीत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?