' गडकरींनी पेट्रोल, डिझेलवर शोधलेला हा उपाय नक्की आहे तरी काय? जाणून घ्या – InMarathi

गडकरींनी पेट्रोल, डिझेलवर शोधलेला हा उपाय नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुझी गाडी सीएनजी आहे ना रे? मग तीच घेऊ पेट्रोल आधीच महाग झाले आहे, त्यात ऍव्हरेज कमी त्यापेक्षा तुझी गाडी घेऊ,असा संवाद आजकाल हमखास ऐकू येतो. सध्या पेट्रोलने शंभरी पार केली आहे त्यामुळे अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासाला बस ट्रेनचा पर्याय निवडतात.

 

nitin gadkari inmarathi

 

नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात देशातील पहिल्यावाहिल्या खाजगी एलएनजी प्लांटचे उदघाटन केले आहे. त्यावेळी ते म्हणाले, की हे नैसर्गिक इंधन असून पेट्रोल, डिझेलपेक्षा कमी प्रदूषण करणारे असून भविष्यात यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.

सध्या आपण अनेक पेट्रोल पंपांवर भली मोठी लागलेली रांग बघत असतो. ती असते सीएनजी भरण्यासाठीची लाईन, काही वर्षांपूर्वी प्रामुख्याने शहरी भागाच्या आसपासच सीएनजी पम्प दिसायचे मात्र आता हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली आहे.

 

cng pump 2 inmarathi

हे ही वाचा – १९८६ पासून “अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास..!

गडकरींनी उदघाटन केलेल्या या नवीन इंधनांचे नेमके काय फायदे आहेत ते किती किफायतशीर आहे ते आपण जाणून घेऊयात. तसेच सध्या वापरात असेल्या सीएनजी आणि एलएनजी मध्ये काय फरक आहे ते ही बघुयात

 

एलएनजी म्हणजे नेमकं काय आहे?

२१ वे शतक खऱ्या अर्थाने अनेक तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या आविष्कारच आहे. आज दिवसागणिक तंत्रज्ञान बदलत आहे. आज आपण जितके प्रगत होत आहोत तितकेच निसर्गाची हानी देखील मोठ्या प्रमाणवर करत आहोत. आज वायू प्रदूषण एक गंभीरसमस्या होत चालली आहे.

वायू प्रदूषणावर अनेक उपाययोजना देखील जगभरात सुरु आहेत. पेट्रोल डिझेल मुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्याला पर्याय म्हणून आपण सध्या सीएनजी वापरत आहोत.

 

lng inmarathi

 

एलएनजी हा नवीन प्रकार म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस, हा एक नैसर्गिक वायू असून तो वजा २५९ अशांवर थंड केला जातो. ज्यामुळे तो स्पष्ट, रंगहीन आणि गंधहीन बनतो. प्रक्रियेदरम्यान हा वायू बॉयलिंग पॉईंटच्या खाली थंड होतो त्यामुळे त्यातील पाणी हायड्रो कार्बन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन ही संयुगे काढून टाकली जातात .

उर्वरित नॅचरल गॅसमध्ये मिथेन असतो ज्यामध्ये इतर हायड्रोकार्बन्सच्या शोध घेतला जातो. आजच्या घडीला रशिया देश सर्वात जास्त नॅचरल गॅस उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. तर कतार देश जगाला एलएनजी गॅसचा पुरवठा करत आहे.

 

lng 1 inmarathi

 

एलएनजी सीएनजीमध्ये फरक काय?

आपण प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे ते म्हणजे सीएनजी हा एक गॅस आहे तर एलएनजी हा द्रव आहे. या व्यतिरिक्त दोन्हीच्या तयार करण्याच्या प्रक्रिया खूप भिन्न आहेत.

दोन्ही गॅसच्या डेन्सिटीमध्ये फरक असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनात त्याचा उपयोग केला जातो, तसेच काही प्रयोगांमध्ये केला जातो. सीएनजीमध्ये मोठ्या प्रमाणावर पॉवर नसल्याने त्याचा वापर प्रामुख्याने छोट्या आणि मध्यमी आकाराच्या गाड्यांमध्ये केला जातो.

 

lng cng inmarathi

हे ही वाचा – वाढत्या पेट्रोल दरवाढीने सगळेच त्रस्त आहेत, मग ही गुडन्यूज तुमच्यासाठीच! वाचा

एलएनजीमध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जी असल्याने त्याचा वापर मोठमोठाले ट्रक्स, गाड्या यांमध्ये केला जातो. तसेच मध्यम आकाराच्या गाड्यांमध्ये देखील या गॅसचा वापर केला जाऊ शकतो.

किंमतीच्या बाबतीत मात्र एलएनजी हे सीएनजीपेक्षा जास्त आहे. कारण एलएनजी गॅसचा वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने ते सीएनजीपेक्षा थोडे महाग ठरत आहे.

एकीकडे आपल्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशात ५० ते ६० रुपयात पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे एकूणच आज देशात वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे लोक त्रस्त आहेत. आज देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे काम सरकार करत आहे.

आज पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून लोक सीएनजी गाड्या घेणं पसंत करत आहे. त्यातच हा सुद्धा एक नवा पर्याय आपल्यासमोर काही दिवसात येईलच त्यामुळे सीएनजीवर वाढणारा भार देखील कमी होऊ शकतो. या पर्यायामुळे वाढत्या प्रदूषणात देखील घट होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?