' 'विवाहानंतरच मातृत्व' : या सामाजिक बंधनाला झुगारणाऱ्या ७ 'खऱ्या बोल्ड' अभिनेत्री!

‘विवाहानंतरच मातृत्व’ : या सामाजिक बंधनाला झुगारणाऱ्या ७ ‘खऱ्या बोल्ड’ अभिनेत्री!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड आणि प्रेम किंवा रिलेशनशीप हे कनेक्शन आपल्याला नवीन नाही. बॉलिवूडच्या कित्येक जोड्या लोकप्रिय झाल्या, कित्येकांची लग्नंदेखील झाली तर काहींची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, याचं ताजं उदाहरण म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानू!

नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं त्यानंतर सायरा बानू आणि दिलीप कुमार यांच्या नात्याची चर्चा बरीच व्हायला लागली. आपल्या वयाच्या अर्ध्यापेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न करून दिलीप कुमार यांनी सायराजींसोबत एकानिष्ठेने संसार केला त्याचं कौतुक सगळीकडून होताना दिसत आहे.

 

dilip kumar saira banu inmarathi

 

बॉलिवूडमध्ये अशा कित्येक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी पूर्ण झाली तर काहींच्या लव्हस्टोरीचा मध्येच दी एंड झाला, तर काही कलाकार ‘एकला चलो रे’ म्हणत आयुष्यात पुढे जात राहिले.

माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो हे सत्य जरी असलं तरी संपूर्ण आयुष्य एकट्याने काढणं ही काही खाऊची गोष्ट नाही आणि त्यातून जर एखादी स्त्री तिच्या आयुष्यात एकटीच असेल तर या समाजात तिचं जगणं आणखीनच मुश्किल होतं!

कित्येक कलाकारांना आयुष्याच्या उत्तरार्धात आलेला एकटेपणा खायला उठला होता. सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्तची अवस्थासुद्धा अशीच काहीशी झाली होती, नंतर एकलकोंडा झाल्याने दारूची सवय लागली आणि त्याच दारुने त्यांचा घात केला.

हे ही वाचा एकेकाळी श्रीमंतीच्या शिखरावरील या सेलिब्रिटीजचं पुढे जे झालं ते जीवनाचा मोठा धडा शिकवून जातं!

gurudutt parveen babi inmarathi

 

परवीन बाबी सारख्या मोठ्या स्टारच्या बाबतीतही असंच घडलं, एकंदरच करियरची दुरावस्था आणि डिप्रेशन यात ती एकटीच इतकी गुरफटली की त्यानेच तिचा जीव घेतला.

पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी समाजाची कित्येक बंधनं झुगारून एकटीने जीवन जगत यश मिळवलं आणि आज याच अभिनेत्री ह्या सिंगल मदर म्हणून अभिमानाने समाजात वावरत आहेत, आज त्यांच्याचविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

 

१. सुश्मिता सेन :

 

sushmita sen inmarathi

 

एकेकाळची मिस युनिव्हर्स ते बॉलिवूडची दिलबर गर्ल सुश्मिता सेनचा चाहतावर्ग आजही तरुण अॅक्ट्रेसना लाजवणाराच आहे. वयाची ४० पार करूनही आजही सुश्मिता तिचं स्टारडम टिकवून आहे.

नुकतीच हॉटस्टारच्या आर्या या वेबसिरिजमधून कमबॅक करत तिने पुन्हा हे सिद्ध केलंय की तिच्यासारखी अभिनेत्री पुन्हा होणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षीच सुश्मिताने एका मुलीला दत्तक घेऊन मातृत्व स्वीकारलं.

तिच्या या निर्णयावरुन बऱ्याच स्तरातून तिच्यावर टीकाही झाली पण आज सिंगल मदर म्हणून ती तिचे कर्तव्य चोख बजावत आहे, लग्न न करताही तिने तिच्या मुलांचा योग्य सांभाळ केलेला दिसून येतो.

२. सुहासिनी मुळे :

 

suhasini muley inmarathi

 

“वेळेतच लग्न व्हायला हवं नाहीतर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते” हे चूक आहे हे आपल्याला सुहासिनी मुळे यांच्यासारख्या सीनियर अभिनेत्रीकडे बघून समजतं.

हिंदी सिनेमात जरी दुय्यम भूमिका केल्या असल्या तरी यांच्या भूमिकांशीवाय कोणताही सिनेमा अपूर्णच राहिला असता.

भर चाळीशीत लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं आणि त्यांनंतर बराच काळ सिंगल राहून ६० व्या वर्षी लग्न करणाऱ्या सुहासिनी मुळे यांच्याकडे बघितल्यावर हे नक्कीच समजतं की प्रेमाला कसलीच मर्यादा नसते.

सुहासिनी यांचं हे मोठं पाऊल म्हणजे समाजातल्या कित्येक जुनाट रूढी परांपरांवर एक जोरदार चपराकच आहे!

३. नीना गुप्ता :

 

neena gupta daughter inmarathi

 

सध्या स्वतःचं आत्मचरित्र लिहून प्रकाशित करणाऱ्या नीना गुप्ता या चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच घटनांविषयी विस्तृतपणे मांडले आहे.

त्यापैकीच सर्वात चर्चिला गेलेला भाग म्हणजे विवियन रिचर्डसोबत नीना यांचं नातं. त्या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा होती, यावरून बराच वादंगदेखील झाला, या दोघांची मुलगी ‘मसाबा गुप्ता’ ही आजही तिच्या आईचं आडनाव लावते.

हे ही वाचा ‘चोली के पीछे’चं शूटिंग, डायरेक्टरची लज्जास्पद मागणी: नीना गुप्तांनी सांगितली आठवण

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि नीना गुप्ता यांच्या अफेअरची तेव्हा खूपच चर्चा झाली, मसाबा हिला आई बाबा दोघांचंही प्रेम मिळालं असलं तरी तिच्या जडणघडणीत नीना गुप्ता यांचा सर्वात जास्त सहभाग होता.

त्यामुळे लग्न न करताही आपल्या मुलाचं संगोपन कीती छान करता येतं याचं आणखीन एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीना गुप्ता!

४. रविना टंडन :

 

raveena tandon inmarathi

 

अक्षय कुमार सोबत “टीप टीप बरसा पानी” आणि “तू चीज बडी मस्त मस्त” म्हणत बॉलिवूडमध्ये एंट्री घेत कित्येक तरुणांची झोप उडवणाऱ्या रविनाचा तो बोल्ड अंदाज आजही कुणीच विसरू शकलेलं नाही.

बॉलिवूडमध्ये बहुतेक प्रत्येक स्टार्सशी तिचं नाव जोडलं गेलं पण अखेरीस ती २००४ मध्ये विवाहबंधनात अडकली. पण तुम्हाला माहितीये का वयाच्या २४ व्या वर्षीच तिने २ मुलींना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली होती.

याबद्दल मीडियाने एकदा तिला प्रश्न केला होता की लग्नाआधीच जर तुझ्याकडे मूल असेल तर तुझ्याशी कुणी लग्न का करेल? त्यावर तिने अगदी बिनधास्तपणे उत्तर दिलं की “ज्याला करायचं असेल तो करेल नाहीतर निघून जाईल!”

५. कोंकणा सेन शर्मा :

 

konkana sen sharma inmarathi

 

अगदी सर्वसामान्य चेहरेपट्टी असूनही केवळ अभिनयाच्या जोरावर इतकी मजल मारणाऱ्या कोंकणानेही असंच धाडसी पाऊल उचलून सगळ्यांना अचंबित केलं होतं.

मातृत्व दाखवण्यासाठी “बेबी बंपचे फोटो सोशलमीडियावर टाकलेच पाहिजेत” असे नाही असं मानणाऱ्या कोंकणाने आपल्या पतीपासून वेगळं होऊनही मुलाच्या संगोपनात खूप मोलाची भूमिका निभावली.

अभिनेता रणवीर शोरे याच्यापासून वेगळे झाल्यानंतर या दोघांनी एकत्र मिळून आपल्या मुलांची काळजी घेण्याचा घेतलेला निर्णय हा खूपच स्तुत्य आहे.

६. मोना सिंग :

 

mona singh inmarathi

 

फ्रोजन एगज् हा ट्रेंड सध्या बराच गाजतोय, आपल्या सोयीने आपण पालकत्व स्वीकारण्यासाठी विज्ञानाने केलेली ही प्रगती कौतुकास्पदच आहे. अभिनेत्री मोना सिंग हिने तिची एग्स फ्रीज करून ठेवली आहेत ही बातमी मध्ये बरीच व्हायरल झाली होती.

हे करताना तिने स्पष्टपणे सांगितलं की पार्टनर सोबत वेळ घालवण्यासाठी, आणि करियरवर फोकस करण्यासाठी तिने हे असं केलं असून तिला जेव्हा इच्छा होईल तेव्हा ती आई होण्याचा निर्णय घेऊ शकते.

७. करीना कपूर खान :

 

kareena kapoor inmararathi

 

हे नाव ऐकून बऱ्याच लोकांना धक्काच बसला असेल, पण तुम्हाला माहितीये का करीनाने असं ठरवलेलं की “मी कधीच विवाहित पुरुषाशी संबंध ठेवणार नाही!”

पण जेव्हा सैफसोबत लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला तेव्हा कित्येकांनी तिला सावध केलं की तो एक विवाहित पुरुष आहे त्याला मुलंसुद्धा आहेत त्यामुळे निर्णय घेताना विचार करून घे!

पण तरीही तिने हा धोका पत्करून सैफशी लग्न केलं आणि आज ती तिच्या मुलांचं आणि सैफच्या मुलाचंही संगोपन तितक्याच आस्थेने करते आहे.

===

हे ही वाचा प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?