' पारंपरिक चुलीवरच जेवण बनवून हे शेतकरी हिट ठरले यूट्यूबवर!! वाचा – InMarathi

पारंपरिक चुलीवरच जेवण बनवून हे शेतकरी हिट ठरले यूट्यूबवर!! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज कोणतीही गृहिणी असो, पार्ट टाईम जॉब करणारे लोक असो, आपापल्या छंदातून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहचवत असतात.

आज शहरात एकटी राहणारी माणसं, गृहिणी, नवनव्या रेसिप्स करून बघणारे असे सर्वच जण मधुरा रेसिपी वरील व्हिडिओ बघून नवनव्या डिशेस बनवत असतात.

 

prajakta koli inmarathi

हे ही वाचा – शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…!

आज शेतकरी सुद्धा तंत्रज्ञानाची कास धरून स्मार्ट शेती करत आहेतच त्याच बरोबरीने तामिळनाडू मधील हे शेतकरी आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे विडिओ बनवून युट्युबवर टाकून लाखो रुपये कमवत आहे वाचा

कोण आहेत ते शेतकरी?

बळी राजा म्हंटल की आपल्यासमोर चित्र उभं राहते ते एक माणूस आपल्या बैलांसोबत शेत नांगरतो आहे, अगदी अनेक ठिकाणी आपण हे चित्र बघतो मात्र आजचे शेतकरी हे स्मार्ट झाले आहेत. आज अनेक शेतकरी ट्रॅक्टर वापरतात, हजारो एकरांवर घर बसल्या लक्ष ठेवतात.

हे शेतकरी तामिळनाडू मधील पुडुकोट्टाई जिल्ह्यातील चिन्ना वीरमंगलम गावातले आहेत, सहा शेतकरी मिळून हे चॅनेल चालवतात. त्यांच्यातील पेरियातम्बी नावाचे  शेतकरी हे सर्वात जेष्ठ आहेत. तामिळनाडूचे पारंपरिक जेवण बनवणायचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने ते इतरांना मागर्दर्शन करतात.

 

farmer inmarathi

 

चुलीवरचे जेवण मिळेल अशा पाट्या आपल्याकडे हायवेला दिसतात. हे शेतकरी सुद्धा पारंपरिक तामिळ जेवण कोणत्याही किचन गॅस वर न करता थेट चुलीवर करतात. तामिळ शेतकरी असल्याने साहजिकच ते पदार्थ बनवताना त्याची पाककृती हे तामिळ भाषेत सांगतात, खाद्यसंस्कृतीला खरं तर भाषेची अडचण नसतेच त्यामुळे आपण ते व्हिडीओ पाहून तो पदार्थ बनवू शकतो.

चॅनेलची सुरवातआणि लोकप्रियता:

व्हिलेज पाककला या नावाने त्यांनी आपल्या चॅनेलचा श्रीगणेशा केला. पेरियातम्बी सांगतात वर्षातले, ६ महिने प्रचंड काम असते तर काही महिने कमी काम असते त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आमही २०१८ साली हे चॅनेल सुरु केले. आमच्या मातृभाषेतील व्हिडिओ फार कमी आहेत म्हणून आम्ही आमच्या मातृभाषेची निवड केली. आज जगभरात आमचे व्हिडिओ पहिले जातात.

 

farmner 2 inmarathi

 

राहुल गांधींनी घेतली दखल 

एका गावातील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या चॅनेलची दाखल चक्क एका पक्षाच्या नेत्याने घ्यावी ही  नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, त्या नेत्याचा या मागे उद्देश काय आहे हे आपण जाणून असतोच. नुकत्याच तामिळनाडू मध्ये निवडणूक होऊन गेल्या. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी तामिळनाडू मध्ये गेले असताना त्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

 

हे ही वाचा – राहुल गांधी हिंदूच…पण…

समाजउपयोगी काम:

समाजाची काम व्हावीत म्हणून आपला समाज लोकप्रतिनिधींना निवडून देतात मात्र जिंकून आल्यावर किती जनहिताची कामे होतात हे फक्त त्या समाजाला माहिती असते. हे शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या चॅनेलच्या उत्पन्नांतून समाजासाठी कामे करत आहेत, अनेक गोरगरीब लोकांची ते पोट भरत आहेत.

 

youtube inmarathi

 

नुकतंच यूट्यूब कडून त्यांना डायमंड बटन मिळाले आहे. हे बटन तेव्हाच मिळते जेव्हा आपल्या चॅनेलला करोडोच्यावर लोक फॉलो करतात.तसेच हे बटन मिळाल्याने आपली कमाई सुद्धा वाढते.

आज घरबसल्या अनेक लोक फेम्स होतातं दिसून येतात, अगदी शहरातल्या लोकांपासून खेड्यापाड्यातील लोक आपापल्या कौशल्याने आज सोशल मीडियात चांगलेच हिट ठरत आहेत. यातून कमाई देखील उत्तम असल्याने आज अनेक लोक या माध्यमाला आपले करियरच बनवून टाकत आहेत.

अन्नदाता सुखी भव असं आपण घास घेताना म्हणतो ते अगदी योग्य आहे. शेतकरी राजा जगला तरच आपण जगू शकतो ही भावना प्रत्येकाच्या मनात आलीच पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?