' "लोकं माझ्यावर जळतात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे" हर्षवर्धनचा गौप्यस्फोट!

“लोकं माझ्यावर जळतात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे” हर्षवर्धनचा गौप्यस्फोट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवूड आणि नेपोटीजम ही गोष्ट आता तर कुणासाठीच नवीन नाहीये, नेपोटीजममुळे कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये नवीन कलाकारांवर अन्याय होतो हे आपण सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आपण पाहिलंच असेल.

सुशांतच्या रहस्यमय मृत्यूनंतरतर लोकांनी अक्षरशः सोशल मीडियावर बयकोत स्टार किड्स हे कॅम्पेनच सुरू केलं, ज्याचा फटका मोठमोठ्या सिनेमांना बसला.

 

boycott starkids inmarathi

हे ही वाचा ‘नेपोटीझम’मुळे ट्रोल होणाऱ्या या ‘स्टारकीड’ ने ट्विटरला राम राम ठोकून स्वतःचं हसं करून घेतलंय!

नेपोटीजम फक्त बॉलिवूडमध्येच आहे असं नाही, इतरही सगळ्याच क्षेत्रात नेपोटीजम किंवा फेवरेटीजम आपल्याला बघायला मिळतंच. कोणताही बाप आपल्या मुलाला पुढे कसं आणता येईल हाच विचार करतो आणि हाच निसर्गाचा नियम आहे.

आता पुन्हा एकदा हाच विषय चर्चेत आलाय तो अभिनेता हर्षवर्धन कपूर याच्यामुळे. राकेश ओमप्रकाश मेहरा या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सिनेमातून त्यांनी २ नवीन चेहऱ्यांना लोकांसमोर आणलं, चित्रपट सपशेल आपटला. पण यातल्या हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर यांची चर्चा बरीच झाली.

सयामी खेर ही प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी आजमी यांची पुतणी, हर्षवर्धन कपूर हा अनिल कपूरचा मुलगा. मिर्झया तर बॉक्स ऑफिसवर आपटला पण इतर अभिनेत्यांच्या बाबतीत होतं तसं हर्षवर्धन कपूरच्या बाबतीत काहीच झालं नाही.

 

harshvardhan inmarathi

 

नवीन अभिनेत्याचा पहिला फ्लॉप सिनेमासुद्धा त्याच्या करियरचे तीन तेरा वाजवू शकतो, पण स्टारकीडच्या बाबतीत असं होत नाही. स्टारकीडचे कितीही सिनेमे फ्लॉप झाले तरी त्यांना पुढचा चान्स मिळतोच.

एक फ्लॉप दिल्याने हर्षवर्धनच्या आयुष्यात असा फारसा काहीच फरक पडला नाही, अनुराग कश्यपच्या भावेश जोशी सिनेमातून पुन्हा त्याला संधी मिळाली नुकताच सत्यजित रे यांच्या लघुकथांवर आधारित असलेल्या नेटफ्लिक्सच्या एका सिरिजमध्येसुद्धा त्याला काम मिळालं.

सांगण्याचा मतितार्थ इतकाच की लोकांना पसंत नसूनही हर्षवर्धनच्या फिल्मी करियरला कुठेच ब्रेक लागला नाही. एवढं होऊनही हर्षवर्धन कपूर याने नुकत्याच एका मुलाखतीत एक असं स्टेटमेंट केलं जे ऐकून कित्येकांच्या भुवया उंचावतील.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे “बरीचशी लोकं माझ्यावर खार खातात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे. मी वेगळे सिनेमे करतो, हटके सिनेमे करायचा प्रयत्न करतो तरीही माझ्या या निर्णयांकडे न बघता लोकं सरसकट माझ्याबद्दल मत बनवतात, मी कितीही चांगलं काम केलं तरी माझ्यावर अनिल कपूरचा मुलगा असल्याचा शिक्का बसलाय त्यामुळेच लोकं माझा रागराग करत असावे!”

 

harshvardhan and anil kapoor inmarathi

 

असं हर्षवर्धनने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे. ऑलिंपिकपटू अभिनव बिंद्राच्या आयुष्यावर बनणाऱ्या सिनेमात हर्षवर्धन आपल्या वडिलांसोबत काम करणार असून सध्या त्यामुळेच तो पुन्हा चर्चेत आला आहे.

हे ही वाचा बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

खरंतर त्याने हे जे स्टेटमेंट केलं आहे ते बरंचसं खरंच आहे, कारण ३ सिनेमे करूनही हर्षवर्धन आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडण्यात अयशस्वी ठरला आहे. तरीही त्याला सतत नवनवीन प्रोजेक्ट मिळतायत ते केवळ अनिल कपूरच्या नावामुळे हे त्याने मान्य करायलाच हवं.

आज कित्येक वर्षे स्ट्रगल करणाऱ्या लोकांना जी संधी १५ ते २० वर्षांनी मिळते ती संधी या स्टारकीडना वयाच्या खूप आधीच्या टप्यातच मिळते. त्या संधीचं त्यांनी सोनं नाही केलं तरी त्यांच्या आयुष्यात फारसा काहीच फरक पडत नाही.

त्यामुळे हर्षवर्धनने केलेल्या या वक्तव्यात चूक काहीच नाही. त्याला जर अनिल कपूरचा मुलगा म्हणून ओळख नको असेल तर त्याने काहीतरी तसं करून दाखवावं ज्याने प्रेक्षक त्याची दखल घेतली.

रणबीर कपूरही नेपोटीजमच प्रॉडक्ट आहे, पण आज प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं आहे, त्याच्या कामाला पसंती दिली आहे, कपूर खानदानाचं नाव मागे लागूनही आज रणबीरने स्वतःची अशी एक इमेज तयार केली आहे.

 

ranbir kapoor inmarathi

 

हीच गोष्ट जर हर्षवर्धनला जमणार असेल तर त्याने नक्कीच तसे प्रयत्न करावेत लोकं नक्कीच त्यालाही तितकाच प्रतिसाद देतील, नेपोटीजम हे वास्तव जरी असलं तरी प्रेक्षकांना कलाकारांची उत्तम कामंच बघायला आवडतं.

त्यामुळे केवळ “मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं ज्यामुळे लोकं त्याला लक्षात ठेवतील एवढीच माफक अपेक्षा असते प्रेक्षकांची, ती जर पूर्ण केली तर नक्कीच लोकं त्याचं स्वागत करतील!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?