' सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सैफ अली खानच्या तांडव या वेब सिरीजवरून, सोशल मीडियावर झालेलं तांडव आठवतंय? सैफ अलीची ती पहिली वेब सिरीज सेक्रेड गेम्स सुद्धा हिंदू संतांना खलनायकांच्या भूमिकेत दाखवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

नेटकाऱ्यांनी सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत, ती वेब सिरीज बंद करण्याची आणि बॉयकॉट करण्याची मागणी केली होती.

 

taandav inmarathi

हे ही वाचा ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

चित्रपट निर्माते मात्र या उदाहरणांवरून धडे घेताना दिसत नाहीयेत. सैफ अली खान हा पुन्हा एकदा, आपल्या एका OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामुळे नेटकाऱ्यांच्या रागाला पात्र ठरलाय. सगळी कडून तो सध्या प्रचंड ट्रोल होताना दिसतोय.

सैफचा आगामी चित्रपट “भूत पोलीस” एक हॉरर कॉमेडी असून, यात तो भूत पकडणाऱ्या भूत पोलीस विभूतीची भूमिका साकारतो आहे. सिनेमाच्या निर्मात्यांना सिनेमाचं पहिलं पोस्टर इंटरनेटवर वायरल होणं अपेक्षित होतं.

त्यासाठी, सैफ अली खानने आपली पत्नी करीना कपूर खान हिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आपल्या नवीन चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. पण उत्तम प्रसिद्धी मिळण्याऐवजी, भूत पोलीसवर अत्यंत कठोर शब्दात केल्या गेलेल्या टीकेचा पाऊस पडतो आहे.

या पोस्टरमध्ये, सैफ अली खान जरी एकदम कूल, डॅशिंग भूत पकडणारा दाखवला असला तरी बॅकग्राऊंडमध्ये अंगाला भस्म लावलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेले तर एक भगवे वस्त्र परिधान केलेले अघोरी साधू दाखवण्यात आले आहेत.

 

bhoot police inmarathi

 

यामुळे नेटकरी सध्या सैफ अली खान आणि भूत पोलिसच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर प्रचंड भडकले आहेत. या चित्रपटात, सैफ अली खान यांच्या बरोबर यामी गौतम, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिससुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा, भूत पकडायला निघालेल्या काही “घोस्ट हंटर्स” भोवती रेखाटण्यात आली असून, त्यात भूत पकडताना त्यांना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते हे कॉमेडी पद्धतीने दाखवण्यात येणार आहे.

दर वेळीच बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकांना हिंदू धर्माशी संबंधित, हिंदू संस्कृती, नीती मूल्ये आणि भारताचा अपमान करण्याचाच का हेतू असतो हा प्रश्न नेटकाऱ्यांनी आणि समस्त हिंदू जनतेनी चित्रपट निर्मात्यांना केला आहे.

दरवेळी हिंदू संस्कृती आणि हिंदुत्वच चेष्टेचा आणि गमतीचा विषय का बनते याचं उत्तर त्यांना हवं आहे.

नेहमी हिंदू साधू संतांना व हिंदू अस्मितेला खलनायकाच्या भूमिकेत दाखवणाऱ्या निर्मात्यांना एका तरी मुस्लिम संतावर, बाबा, पीर फकीर, मौलवी किंवा ख्रिस्ती पादरी ह्यांच्याबद्दल असला सिनेमा किंवा त्यांची चेष्टा करण्याचे आव्हान नेटकऱ्यांकडून देण्यात आले आहे.

 

muslim inmarathi

 

हिंदू सहिष्णू आहेत म्हणून आम्ही आत्तापर्यंत आमच्या संस्कृतीचा वारंवार होणारा अपमान सहन करत आलो आहोत, पण ह्यापुढे करणार नाही, हिंदू संस्कृतीशी संबंधित असलेले सिनेमे आम्ही कधीच पाहणार नाही बॉयकोट करू असा दम दिला जातो आहे.

तांडवसारख्या वेबसिरीज आणि तत्सम सिनेमामुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते. तरी अजूनही सिनेमा बनवताना, कोणत्याच समाजाच्या भावना दुखणार नाही ह्याचे भान का ठेवले जात नाहीये हा मोठा प्रश्न आहे.

भारतात, हिंदूंची संख्या जास्त असल्याने त्यांच्या धर्मावर कोणत्याही प्रकारची टीका त्यांनी सहन करून घ्यावी अशी अपेक्षा का ठेवली जाते आहे?

 

hindu people inmarathi

 

हिंदु देवी देवतांचे बीभत्स मिम्स बनवणे, त्यांना वाट्टेल ती नावे ठेवणे, हे प्रकार हल्ली वाढले आहेत आणि तांडव आणि भूत पोलीस अशा सिनेमा आणि वेबसिरीज मार्फत ह्या सगळ्या कृतींना आणखीन प्रोत्साहन मिळताना दिसून येत आहे.

ह्या सगळ्या धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

भारत हा आपल्या विविधतेत असलेल्या एकतेमुळे ओळखला जातो पण ह्याच एकतेला, सतत एखाद्या धर्माला टार्गेट करून केलेल्या कृतींमुळे तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

pk inmarathi

 

चित्रपट समाजावर प्रभाव पडतात. कलेचा हा प्रकार सरळ प्रेक्षकांच्या आणि नागरिकांच्या मनात विचारांना प्रेरणा देतो, एखाद्या विषयावर विचार करायला प्रवृत्त करतो, त्यामुळे आपण समाजाला काय देतो आहोत, ह्याचे भान समस्त फिल्म इंडस्ट्रीला असायला हवे.

जर कोणी आपल्या धर्मावर टीका टिप्पणी करत नसेल तर आपणही दुसऱ्या धर्माविषयी खबरदारी बाळगली पाहिजे हे साधं लॉजिक चित्रपट निर्मात्यांना कळलं तर हे वाद कायमचे थांबतील.

===

हे ही वाचा दीपिका-करीना सीतामाई साकारणार; मग रामायण सात्विक वाटणार का? परखड मत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?