' केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे! – InMarathi

केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राचा इतिहास हा खूप गौरवशाली आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ही सर्वांनाच प्रेरणादायी आहे. छत्रपती महाराजांची दूरदृष्टी, जितकी आक्रमकता, तितकाच संयम, प्रसंगावधान आणि नैतिकता ही संकटांना सामोरं कसं जावं हे शिकवणारी आहे.

कोणतंही युद्ध हे स्वतःच्या अहंकारासाठी न लढता जनकल्याणासाठी लढलं पाहिजे हे महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. युद्ध लढतांना ते कुठे सोडून द्यावं, तह करावा, युद्ध सुरू असतांना रसद, आर्थिक बाजू ही कशी नियंत्रणात राहील याकडे त्यांनी नेहमीच जातीने लक्ष दिलं, हा डोलारा संभाळण्यासाठी त्यांनी जागोजागी योग्य व्यक्तींची नेमणूक केली.

 

shivaji maharaj inmarathi

 

छत्रपती शिवाजी महाराजांची ही कार्यपद्धती, युद्धनीती पुढे पेशवाईमध्येसुद्धा आमलात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. पेशव्यांच्या कुशल युद्धनीतीच्या जोरावरच ‘दिल्लीचे ही तख्त राखीतो’ हे मराठी सैनिक, जनता अभिमानाने म्हणू लागली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा शरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही… हे मान्य करा!

नानासाहेब पेशवे राज्य कारभार सांभाळतांना त्यांनी राज्याची आर्थिक बाजू कशी सक्षम असेल याकडे नेहमीच लक्ष दिलं. युद्धजन्य परिस्थितीचा राज्य कारभारावर, राज्याच्या तिजोरीवर अतिभार पडू नये यासाठी पेशव्यांनी राज्यातील सावकारांकडून देखील प्रसंगी आर्थिक मदत घेतली.

मराठी सावकारांपैकी बारामतीचे ‘गणेश नाईक’ हे सावकार प्रत्येक लढाईमध्ये राज्याची मदत करण्यासाठी कायमच उत्सुक असत.

बाजीराव पेशवे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये राज्यकर्ता आणि सावकार या पलीकडे जाऊन नातेसंबंध प्रस्थापित झाले होते. ते ही इतकं जवळचं की, बाजीराव पेशव्यांची बहीण ही गणेश नाईक यांच्या कुटुंबात लग्न करून बारामतीकर झाली होती.

 

peshva-bajirao-inmarathi

 

शाहू महाराजांच्या कार्यकाळात सुद्धा गणेश नाईक हे नाव आर्थिक मदतीसाठी सर्वप्रथम घेतलं जायचं. शाहू महाराजांनी गणेश नाईक यांच्या अर्थसहाय्याची जाणीव ठेवली आणि गणेश नाईक यांना सावकारी करतांना कोणतीही अडचण येऊ नये हे बघितलं.

गणेश नाईक यांच्याच पिढीतील कृष्णा नाईक हे देखील मराठी साम्राज्याला देशभरात घडणाऱ्या प्रत्येक लढाईत तत्परतेने अर्थसहाय्य करायचे. हे सगळं त्या काळात कसं साध्य केलं जायचं? हा एक कुतूहलाचा विषय आहे.

कोणतंही युद्ध लढण्यासाठी रोख रक्कम ही महत्वाची असते. राज्यकर्त्याने त्याची तरतूद ही नेहमीच करून ठेवली पाहीजे हे त्या काळातील राज्यकर्त्यांनी आपल्या कारभारातून नेहमीच दाखवून दिलं.

कमी सैन्य, कमी शस्त्र हे एक वेळ युद्ध जिंकवू शकते. पण, कमी पैसे हे नेहमीच युद्धजन्य परिस्थितीत राज्याची डोकेदुखी बनू शकते हे पेशव्यांनी हेरलं होतं.

बारामती हे एक असं ठिकाण आहे ज्यावर लक्ष्मीचा नेहमीच आशीर्वाद आहे असं म्हणता येईल. पुण्यापासून केवळ १०० किलोमीटर अंतरावर असलेलं हे शहर त्या काळात आणि आजही राज्यकारभारात नेहमीच आपलं आर्थिक योगदान देत आलं आहे.

 

baramati inmarathi

 

बारामतीचे आर्थिक स्थैर्य आणि भरभराट होण्यामागे तिथल्या साखर कारखान्यांनी नेहमीच आपलं योगदान दिलं आहे. गणेश नाईक यांनी बारामतीच्या भूमीत राहून पूर्ण राज्यावरील, प्रसंगी देशावरील आर्थिक प्रश्नांसाठी अर्थसहाय्य केलं हे बारामत च्या भूमीची महती सांगण्यास पुरेसं आहे.

सातारा येथे कृष्णा नाईक यांनी बांधलेला ‘नाईक वाडा’, ‘निंबाळकर वाडा’ हे पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक सुबत्तेचं एक प्रतीक आहे असं म्हणता येईल.

आजच्या काळात जसे बिजनेस हाऊसमध्ये लग्न होतात आणि एकमेकांचा पाठींबा मिळवला जातो तसंच पेशवे काळातही घडलं होतं.

‘सावकारी’ हा मूळ व्यवसाय असलेल्या नाईक कुटूंबाचा राज्यावर असलेला आर्थिक दबदबा, लोकप्रियता आणि राज्याला त्यांची असणारी गरज हे डोळ्यासमोर ठेवूनच पेशव्यांनी नाईक घराण्यात विवाह प्रस्ताव पाठवला असं सांगितलं जातं.

 

peshwai inmarathi

 

राज्यकर्ते आणि अर्थतज्ञ एकत्र आल्यावर राज्याची भरभराट होणं हे क्रमप्राप्तच होतं आणि तसंच झालं.

“व्यवहारात नाती आणू नयेत” किंवा “नात्यात व्यवहार आणू नये” या सर्व म्हणी या काळानंतर आल्या असाव्यात. कारण, पेशवे आणि नाईक यांनी नातं आणि राज्यासाठीचे आर्थिक व्यवहार हे दोन्ही एकाच वेळी सकुशल सांभाळले.

बारामती हे शहर कविवर्य मोरोपंत यांचं देखील जन्मस्थान आहे. कृषिप्रधान असलेल्या या शहरात मागच्या काही वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रानेसुद्धा खूप प्रगती केली आहे.

रेल्वेच्या माध्यमातून पुणे शहराशी जोडल्याने दोन्ही शहरात मालवाहतूक सोपी झाली आहे. नीरा नदी, उजनी धरण असल्याने तिथे लोकांना शेती, वस्त्रोद्योग, नोकरीसाठी राहणं सुसह्य होत गेलं आणि बारामती हे आर्थिकरित्या स्वयंपूर्ण शहर म्हणून नावारूपास आलं.

बारामती शहराची प्रगती होण्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील भारदस्त नाव शरद पवार यांचं खूप योगदान आहे. आर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!

 

sharad pawar inmarathi

 

बारामतीच्या गणेश नाईक आणि कुटुंबीयांनी जसं राज्य कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी आपलं आर्थिक योगदान दिलं, त्या भूमीत अजून निष्ठावान आणि पैश्यांनी तसेच विचारांनी श्रीमंत पिढी तयार व्हावी अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा छत्रपती शिवाजी महाराज की बाजीराव पेशवे? बिनडोक तुलनेला दिलेली अप्रतिम उत्तरं

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?