' युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच – InMarathi

युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवूडच्या पहिल्यावहिल्या सुपरस्टारचा आज अखेर प्रवास थांबला, बॉलिवूडमधील एका युगाचा अंत झाला. ‘अलविदा दिलीपसाहेब’ म्हणताना केवळ ज्येष्ठांनाच नव्हे तर तरुणांचाही कंठ दाठला यातच त्यांची यशोगाथा सारं काही सांगून जाते.

ब्लॅक अण्ड व्हाईट चित्रपटांतून सुरू झालेली कारकीर्द त्यांच्या सशक्त अभिनयाने कधी रंगीत झाले हे प्रेक्षकांनाही कळलं नाही. देवदास, मुघल ए अझम, आदमी, शक्ती, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा, सौदागर…चित्रपट कोणताही असला तरी दिलीप साहेबांनी आपली प्रत्येक भुमिका जीवंत केली.

त्यांचं फिल्मी आयुष्य जितकं वैविध्यपूर्ण होतं, तितकचं खाजगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. तब्बल ९८ वर्षांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मनमुराद जगण्याचं कौशल्य त्यांनी अनेकांना शिकवलं.

चंदेरी दुनियेत रमणा-या दिलीप कुमारांचे काही बोलके फोटो आणि ट्रॅजडी किंग, सुपरस्टार अशी अनेक बिरुदं मिरवणा-या नायकाला आदरांजली…

माय लेक

 

dilip kumar inmarathi

 

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सुपरस्टार घरात आईचा लाडका लेक होता. मातोश्री ‘आएशा बेगम’ यांच्यासह मुहम्मद युसुफ खान अर्थात दिलीप कुमार यांचा हा दुर्मिळ फोटो!

 

ग्रेट भेट

 

dilip amitab inmarathi

 

 

बीग बी आणि दिलीप कुमार या समकालीन हिरोंंचा हा फोटो अभिनेत्यांमध्ये असलेली निखळ मैत्री दाखवतो. इर्षा, स्पर्धा यांचा शाप असलेल्या बॉलिवूडमध्ये मैत्री जपणाऱ्या कलाकारांची काही उदाहरणं हमखास सापडतात. दिलीप कुमार आणि अमिताब बच्चन ही त्यातील एक जोडी, अॅंग्री यंग मॅन आणि ट्रॅजिडी किंग एकमेकांना भेटले की चर्चा, गप्पा आणि कौतुक यांना बहर यायचा.

 

रोमॅन्सचा बादशहा

 

dilip romance inmarathi

 

ट्रॅजिडी किंग अशी ओळख जपणाऱ्या दिलीप कुमार यांच्या अभिनयाचं वैविध्य दाखवण्यासाठी हा फोटो पुरेसा आहे. हिरोला साजेसं व्यक्तीमत्व असलेल्या दिलीप साहेबांनी जितक्या ताकदीने ह्रदयस्पर्शी भुमिका वठवल्या तितक्याच उत्तमरितीने त्यांनी मोठ्या पडद्यावर रोमॅन्टिक हिरोही रंगवला. अनेक पिढ्यांतील तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेले दिलीप कुमार हे त्याचेच प्रतिक नव्हे का?

 

जोडी तुझी माझी

 

dilip saira inmarathi

 

कलाकारांच्या जोड्यांमध्ये असलेलं वयाचं अंतर हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. दिलीप कुमार आणि सायरा बानो हे त्यातलंच एक नाव. आपल्यापेक्षा तब्बल २२ वर्षांनी लहान असलेल्या सायराशी त्यांनी रेशीमबंध जोडले तेंव्हाचा हा क्षण. अखेरच्या श्वासापर्यंत न थकता पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी बॉलिवूडमधील लग्न टिकत नाहीत या आरोपांना कायमच छेद दिला.

हे ही वाचा – रस्त्यावर सँडविच विकून बनला बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग – वाचा थक्क करणारा प्रवास!

देखणी जोडी

 

madhubala inmarathi

 

मुघल ए आझम पाहताना आजही दिलीप आणि मधुबाला यांच्या देखण्या सौंदर्यावरून नजर हटत नाही, सौंंदर्याचं अलौकिक वरदान लाभलेल्या या जोडीने मोठा काळ गाजवला. शुटिंग दरम्यान मधुबालाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दिलीप कुमार यांबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या, अखेरिस आपल्या आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनीच याबाबतची कबुली दिली.

 

पहिला फोटो

 

dilip inmarathi

 

सॅंडविचच गाडी ते बॉलिवूड हा प्रवास दिलीप कुमार यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक खाचखळग्यातून मार्ग काढत अखेर ते चंदेरी दुनियेत पोहोचले आणि १९४४ साली ‘ज्वार भाटा’ या पहिल्या चित्रपटातून हा देखणा तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. पहिल्या चित्रपटातील हा पहिलावहिला फोटो.

 

क्रिकेट मॅच आणि ते दोघे

 

dilip raj inmarathi

 

 

सामाजिक भान राखत एका संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी दिलीप कुमार आणि राज कपूर यांनी जोडगोळीने एक क्रिकेटचा सामना खेळला होता. चित्रपटातून अभिनयाचे सामने जिंकणाऱ्या या दोघांनी क्रिकेटच्या मैदानावरही चौके ठोकले. त्यावेळचा एक दुर्मिळ क्षण.

 

इतिहास घडवताना…

 

mughal e azam inmarathi

 

 

बीग बजेट सिनेमा ही संकल्पनाही जेंव्हा अनेकांना ठाऊक नव्हती तेंव्हा तब्बल एक कोटींच बजेटसह मुघल ए अझम साकारत होता. चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो इतिहास घडण्याची साक्ष देतो.

 

नायक

 

kings inmarathi

 

आपआपल्या पिढीतील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले हे तीन शेहनाशहा… बॉलिवूडमधील तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा फोटो आजही अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे.

दिलीप कुमार यांची वयाशी झुंज अपयशी ठरली असली तरी ९८ वर्षांची मजल गाठण्याची त्यांची जिद्द विसरता येणार नाही. बॉलिवूडला अजरामर भुमिकांची देणगी देणा-या या कलाकाराला इनमराठीशी भावपूर्ण श्रद्धांजली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?