' ‘बुद्धिस्ट टेरर’ म्हणून ओळखला जाणारा म्यानमारचा भिक्खू म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ! – InMarathi

‘बुद्धिस्ट टेरर’ म्हणून ओळखला जाणारा म्यानमारचा भिक्खू म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

धर्म, जात या गोष्टी व्यक्तिगत आहेत. जन्माला येतांना कोणत्या धर्मात जन्माला यावं हा पर्याय कोणत्याही व्यक्तीकडे नसतो. पण, कोणत्यातरी धर्मातच जन्म घेतो हे ही अढळ सत्य आहे.

धर्म ही लोकांमधील समान बाब डोळ्यासमोर ठेवून कित्येक राजकीय नेते धार्मिक ध्रुवीकरण करतांना आपण बघतो. त्यातील काही लोक यशस्वी होतात.

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात ही उदाहरणं कमी बघायला मिळतात. पण, जागतिक राजकारणाची जर माहिती घेतली तर लक्षात येतं की, धर्माधिष्ठित देशांचं राजकीय धोरण, लोकांची विचारधारा ही केवळ धर्म या गोष्टी भोवतीच फिरत असतात.

‘म्यानमार’ या देशाबद्दल आणि ‘अशीन विराथू’ या लोकप्रिय नेत्याबद्दल आम्ही या लेखात माहिती देत आहोत. जानेवारी १९४८ रोजी स्थापन झालेला म्यानमार हा देश अजूनही रोहिंगे मुसलमान आणि बौद्ध धर्मीय यांच्यातील संघर्ष रोखण्यास असमर्थ ठरला आहे.

 

wirahu inmarathi

 

धर्माच्या पुढे लोकांची विचारशक्ती न नेऊ शकलेला हा देश अर्थ, पर्यटन या सर्वच क्षेत्रात कित्येक वर्षांपासून पिछेहाट करताना जग बघत आहे.

‘अशीन विराथू’ हे एक बौद्ध भिखू आहेत. म्यानमारमध्ये बहुतांश असलेल्या बौद्ध धर्माचं तिथे वर्चस्व टिकून रहावं, रोहिंगे मुसलमान लोकांनी शांतीप्रिय असलेल्या बौद्ध धर्मीयांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार करू नये यासाठी ‘अशीन विराथू’ हा एकच बुलंद आवाज पूर्ण म्यानमार मध्ये कित्येक वर्षापासून घुमत आहे.

हे ही वाचा म्यानमारमध्ये लष्करी राजवट: रोहिंग्यांपासून देशाला ‘शुद्ध’ करणाऱ्याच्या हातात सत्ता!

म्यानमारमध्ये रोहिंगे मुसलमानांचं प्रमाण ६ करोड लोकसंख्येच्या ५% इतकं आहे. पण, त्यांच्यापैकी बरीच जनता ही बेरोजगार असल्याने त्यांचा नेहमीच चोरी, दंगल आणि बलात्कार सारख्या दुष्कृत्यांमध्ये समावेश असल्याचं मागील काही वर्षात समोर आलं आहे.

गुन्हेगाराला कोणता धर्म नसतो. पण, इथे त्या गुन्ह्यांचं प्रतिनिधित्व रोहिंगे मुस्लिम लोक करत असल्याने म्यानमारच्या बौद्ध धर्मीयांमध्ये त्या धर्माबद्दलच इतका द्वेष पसरला आहे की, तिथल्या सध्याच्या सरकारने कतार देशाच्या एका टेलिफोन कंपनीला ते एक मुस्लिम राष्ट्र असल्याने आपल्या देशात येऊ दिलं नाही.

‘अशीन विराथू’ यांनी केलेलं धार्मिक ध्रुवीकरण हे देशहितासाठी आहे आणि अन्याय रोखण्यासाठी हे ते वारंवार आपल्या भाषणातून सांगत असतात.

अशीन विराथू यांना टाईम्स मासिकाने ‘बुद्धिस्ट आतंकवादी’ ही उपाधी दिली होती. पण, हे त्या देशातील लोकांना अजिबात मान्य नव्हतं.

 

buddhist terror inmarathi

 

वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडून संन्यास घेतलेल्या अशीन विराथूला म्यानमार या देशाने ‘गौतम बुद्धांचा पुत्र’ म्हणून मान्य केलं आणि युनायटेड नेशन्सला लिहिलेल्या पत्रातसुद्धा नमूद केलं आहे.

म्यानमारचे राष्ट्रपती थेन सीन यांनी वेळोवेळी ‘अशीन विराथू’ यांना एक ‘दयाळू व्यक्तिमत्व’ म्हणून घोषित केलं आहे. जगप्रसिद्ध टाईम्स मासिकाच्या त्या आवृत्तीवर संपूर्ण म्यानमारने बहिष्कार टाकला होता.

अशीन विराथू हे म्यानमारच्या मुस्लिम लोकांविरुद्ध इतरांना केवळ जागरूक करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा किंवा इस्लाम धर्माचा विरोध करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाहीये असं म्यानमारचे राष्ट्रपती आणि लोक सोशल मीडियावर नेहमीच सांगत असतात.

जागतिक पातळीवर अशीन यांचं नाव त्यावेळेस चर्चेत आलं जेव्हा काही वर्षांपूर्वी फेसबुकने त्यांच्या पेज वर त्यांना सूचना देऊन बंदी घातली होती.

रोहिंगे मुस्लिम लोकांविरुद्ध बौद्ध धर्मीय लोकांना आणि भिख्खू यांना संघटित करून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम अशीन विराथू हे मागच्या ३० वर्षांपासून करत आहेत.

 

rohingya inmarathi

हे ही वाचा बौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही! भिक्षु होण्यासाठी काय करावं लागतं?

अहिंसा, क्षमा, शांती हे प्रमुख स्तंभ असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी अशीन हे “अहिंसा म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. अहिंसा म्हणजे कोणावरही अन्याय होऊ न देणे. तुम्ही अहिंसावादी असायला हवं. पण, याचा अर्थ तुम्ही वेड्या कुत्र्याच्या बाजूला झोपणं नव्हे” असं नेहमीच आपल्या भाषणात सांगत असतात.

“मुस्लिम लोक हे आज म्यानमारमध्ये अल्पसंख्यांक असले तरीही आम्हाला त्यांचा तितकाच त्रास होतो. कारण, ते आफ्रिकेच्या पशूंसारखे आहेत जे की स्वतःची संख्या झपाट्याने वाढवतात आणि इतरांवर दबाव टाकत असतात” असं अशीन विराथू आपल्या मुलाखतीतून जाहीरपणे बोलत असतात.

अशीन यांना सर्वच माध्यमांवर जबरदस्त फॉलोवर्स आहेत. मध्यंतरी, भारतात ‘पालघर’ मध्ये साधूंवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी ट्विटरवर बरेच हॅशटॅग सुरू होते.

 

palghar mob lynching inmarathi

 

त्यामध्ये काही लोकांनी असे पण ट्विट केले होते की, “भारतात होणाऱ्या धार्मिक अत्याचार रोखायचे असतील तर इथेपण एक तरी अशीन विराथू हे तयार व्हायला पाहिजेत.” हे वाक्यच अशीन यांची जगभरात असलेली ओळख आणि लोकप्रियता सांगणारं आहे.

म्यानमारच्या राजकीय नेत्या अँग सॅन सूची यांच्या अटकेनंतर ‘अशीन विराथू’ यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या ‘पेट्रीऑटिक असोसिएशन ऑफ म्यानमार’ आणि ‘९६९ मूव्हमेंट’ची सुरुवात करण्यात आली.

श्रीलंकामध्ये १९१५ मध्ये तामिळ लोकांविरुद्ध असाच संघर्ष झाला होता आणि त्यातून श्रीलंकाच्या स्थानिक नागरिकांनी आपल्या मातृभूमीवर आपला पहिला हक्क असल्याचं दाखवून दिलं होतं.

“आम्ही फक्त रोहिंगे मुस्लिम लोकांचाच विरोध करत नाही आहोत तर कोणत्याही परकीय देशातील लोकांचा आमच्या भूमीवरील अधिकार बजावण्यास आमचा विरोध आहे.

अँग सॅन सूची या जरी बांगलादेशच्या लोकांना आपला मतदार संघ वाढवण्यासाठी म्यानमार मध्ये निमंत्रण देत असल्या तरीही आम्ही त्यांना आमच्या देशात कधीच पाऊल ठेवू देणार नाही.” असं खुलं आवाहन ‘अशीन विराथू’ हे म्यानमारच्या सरकारला नेहमीच देत असतात.

अशीन हे चेहऱ्यावरून जरी खूप शांत दिसत असले तरीही त्यांच्यात एक कमालीची आक्रमकता आहे. नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. अध्यात्मिक लोकांना सुद्धा देशाच्या राजकारणात समान संधी मिळाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असणार आहेत.

 

ashin wirathu inmarathi

 

अशीन विराथू यांच्या अश्याच एका भडक भाषणामुळे २०१२ मध्ये म्यानमार हे पेटलं होतं आणि मेक्तीला या शहरात झालेल्या दंगलीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला होता. अशीन यांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेला फक्त या घटनेने गालबोट लागलं होतं.

बौद्ध तरुणीवर रोहिंगे मुस्लिम तरुणाने केलेल्या बलात्काराची जबाबदारी घेऊन अँग सॅन सूची यांनी आपला राजीनामा द्यावा आणि नोबेल पुरस्कारसुद्धा परत करावा या ‘अशीन विराथू’ यांच्या मागणीला फक्त म्यानमार नाही तर जगभरातील बौद्ध लोकांनी पाठींबा दिला होता.

सरकार आणि मुस्लिम धर्मीयांविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे २००३ मध्ये अशीन विराथू यांना २५ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, म्यानमारच्या सरकारवर सर्व स्तरातून या निर्णयामुळे दबाव आणला गेला आणि शेवटी ही शिक्षा ८ वर्ष इतकीच ठेवण्यात आली.

२०११ मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर अशीन यांनी आपल्या संघटन कौशल्याने पुन्हा ‘मा बा था’ या त्यांच्या मोहिमेला पुनरुज्जीवन दिलं आणि आपला धोपट मार्ग त्यांनी आजही सोडलेला नाहीये.

 

ashin inmarathi

 

‘अशीन विराथू’ हे हिरो की व्हिलन यामध्ये मतमतांतरे असू शकतात. पण, एक गोष्ट त्यांच्या आयुष्यातून कळते की, सुस्त यंत्रणेला हलवण्यासाठी अश्याच व्यक्तींची आवश्यकता असते.

===

हे ही वाचा तिबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?