' अंतराळवीरही कपडे धुणार! ‘नासा’ आणि ‘टाइड’चा अजब कारभार… भानगड जाणून घ्या – InMarathi

अंतराळवीरही कपडे धुणार! ‘नासा’ आणि ‘टाइड’चा अजब कारभार… भानगड जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अवकाश, अंतराळवीर, अंतराळ यात्रा या सगळ्याविषयी सामान्य माणसांना नेहमीच उत्सुकता असते. या उत्सुकतेत अगदी सामान्यपणे पडणारा प्रश्न म्हणजे, अवकाशात अनेक दिवस वास्तव्य करणारे हे अंतराळवीर तिथे नेमके जगतात कसे?

ते काय खातात, काय पितात, कसे राहतात, अंघोळ, प्रातर्विधी कसे करतात, हे आणि असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या सामन्यांना पडत असतात. याचबरोबरीने आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे अंतराळात भ्रमंती करणारी ही मंडळी कपडे कसे धूत असतील?

कपडे धुण्यासाठीचा टाइड साबण आणि अमेरिकेतील नासा यांनी या प्रश्नावर एक अप्रतिम तोडगा काढण्याचं काम सुरु केलं आहे. आज त्याबद्दलच काही खास माहिती जाणून घेऊयात.

 

tide and nasa collage inmarathi

 

अवकाशात कपडे धुतले जातात का?

कधी ना कधी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अंतराळवीरांचा आहार नेहमीपेक्षा वेगळा असतो, त्यांची झोपण्याची पद्धत निराळी असते, हे सगळंच आपण कुठे ना कुठे वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं. मात्र, अंतराळवीरांच्या कपड्यांचं काय केलं जातं, हे मात्र सहसा माहित नसतं.

===

हे ही वाचा – मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

===

अवकाशात कपडे धुतले जातात का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागेल. अंतराळवीर मोहिमेवर असल्यावर कधीही कपडे धुवत नाहीत. प्रत्येक कपडा हा अत्यंत जीर्ण होईपर्यंत सतत वापरला जातो. एकदा का कपडे वापरण्यालायक उरले नाहीत, की मग ते टाकून दिले जातात.

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. हे कपडे टाकून दिले जातात. मग आता तुम्ही म्हणाल, की नासा आणि टाइडचा संबंध काय? अंतराळवीर कपडे धुवतच नाहीत, तर हे दोघे नक्की करणार काय? मंडळी अवकाशातही कपडे धुतले जावेत यासाठीच हा सगळं खटाटोप सुरु आहे.

 

nasa and tide inmarathi

 

नासा अंतराळवीरांना अवकाशात धाडताना प्रतिवर्षासाठी जवळपास ७० किलो वजनाचे कपडे सोबत पाठवते. हाच त्रास वाचवण्यासाठी नासा नवी तरतूद करणार आहे.

कपडे धुण्याची आवश्यकता काय?

नासाच्या मोहिमा, म्हणजे काही छोटी-मोठी गोष्ट नसते. केवळ अंतराळात जाणं नाही, तर काही महिने, काही वर्षं तिथेच राहून नवनव्या गोष्टींविषयी संशोधन करण्याचं काम नासाचे शास्त्रज्ञ करत असतात.

नवनव्या मंगळ मोहिमा नासा सातत्याने आखत असतं. चांद्रमोहिमेत सर्वप्रथम आपल्या देशाचा झेंडा रोवणाऱ्या अमेरिकेला मंगळावर सुद्धा मोठं संशोधन करण्याची इच्छा नक्कीच आहे. अशा मोठ्या मोहिमांसाठी नासाने कंबर कसली असून, मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे.

 

mars inmarathi

 

अंतराळवीरांना अवकाशात कपडे धुता यावेत, यासाठी प्रयत्न करणं हा याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

टाइडच्या मदतीने नव्या साबणाची निर्मिती

या सगळ्याचा पर्याय म्हणून आता नासाने आता टाइडला हाताशी घेतलं आहे. जाहिरातीत पांढरेशुभ्र आणि चकाकणारे कपडे दाखवणारं टाइड आता, अंतराळवीरांचे कपडे लख्ख चमकवण्याचं काम पाहणार आहे.

 

tide white inmarathi

 

पाण्याशिवाय किंवा अतिशय कमी पाण्याचा वापर करून, कपडे धुता येतील अशी साबणाची पावडर तयार करण्याची जबाबदारी नासाने टाइडच्या खांद्यावर सोपवली आहे.

या वर्षअखेरीस अवकाशात एक अशी साबण पावडर पाठवण्यात येणार आहे, जी तिथे सुद्धा सहजरित्या वापरता येईल. एवढंच नाही, तर हा प्रयोग यशस्वी झाल्यास, पुढच्या वर्षी डाग काढू शकतील अशी पेन्स आणि वाईप्स सुद्धा तयार करणार असल्याचं टाइडने म्हटलं आहे.

या नव्या प्रयोगांचा आणि उत्पादनांचा वापर अवकाशात होईल, हे तर निश्चित, मात्र ही डिटर्जंट निर्मितीमधील येत्या काळातील क्रांती ठरल्यास आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही.

===

हे ही वाचा – नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?