' भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत, नक्षलवादी, असे आरोप स्टॅन स्वामींवर नक्की कशामुळे? वाचा

भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत, नक्षलवादी, असे आरोप स्टॅन स्वामींवर नक्की कशामुळे? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कालचा दिवस गाजला तो भाजप नेत्यांच्या निलंबनामुळे, सर्व न्यूज चॅनेलवर घडलेल्या सर्व प्रकारचे विश्लेषण करण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी या गोष्टींचा चांगलाच समाचार घेतला. घडलेल्या प्रकारावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकरण सुरूच आहे.

दुसरी महत्वाची घटना घडली ती म्हणजे फा. स्टॅन स्वामी यांच्या झालेल्या निधनाने पुन्हा एकदा समाजमाध्यमात खळबळ उडालेली आहे. वांद्रे येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

 

mla inmarathi

 

माझा मृत्यू झाला तरी तो जेलमध्येच होऊ दे कोणत्याही रुग्णलयात नको, असे स्टॅन स्वामी जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी आपले असे वक्तव्य केले होते. समाजातील शोषित पीडितांच्या लढ्यासाठी अग्रेसर असणारे, डाव्या विचारसरणींचा प्रभाव असलेले स्वामी कायमच चर्चेत होते. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचा प्रवास..

कोण होते स्टॅन स्वामी?

स्टॅन स्वामींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. जन्मभूमी जरी तामिळनाडू असली तरी त्यांची कर्मभूमी ही झारखंड होती. छत्तीसगड झारखंड ही राज्य प्रामुख्याने आदिवासी जमात असलेली आहेत. तिकडच्या आदिवाशांचे प्रश्न, त्यांचे हक्क मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

 

stan inmarathi 2

 

मुळात शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या या मुलाचा सामाजिक कार्यात संबंध आला तो शिक्षणामुळे, केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक कार्यात करता यावा यासाठी त्यांनी सोशोलॉजी या विषयात पदवी घेतली.

स्वामींची सामाजिक कार्याची सुरवात ही भारतातून नव्हे तर फिलिपाइन्समध्ये शिकत असतानाच झाली. फिलिपाइन्समध्ये शिकत असताना तिकडे वाढलेला भ्रष्टाचार, क्रूर राष्ट्राध्यक्ष यांच्या विरोधात लोकांनी जनआंदोलन केले होते.

स्वदेस चित्रपटात शाहरुख खानला सतत वाटत राहत की आपल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, त्याचप्रमाणे स्वामी भारतात आल्यावर दुर्बल घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे ठरवले.

झारखंड लढ्यापासूनच NIA च्या रडारवर?

बंगळूरमध्ये काही महिने काम केल्यानंतर ते झारखंडमध्ये येऊन तिथल्या आदिवासांच्या प्रश्नांनासाठी संघर्ष करायला सुरवात केली. झारखंडमध्ये असताना जनविकास आंदोलन या संघटनेची स्थापना केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले. ही संघटना प्रामुख्याने दलित आणि आदिवासींच्या हक्कसाठी कार्यरत होती.

 

stan inmarathi 3

हे ही वाचा – वडील मुलाला ‘नंबर वन हिरो’ करण्याचे स्वप्न बघत होते, मुलगा मात्र “पुन्हा” फ्लॉप!

आदिवासींसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली. त्यातल्याच एका आंदोलनात त्यांनी सरकार विरोधी वक्तव्य केल्याने त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करून त्यांच्यावर राज द्रोहाचा आरोप केला.

भीम कोरेगाव कनेक्शन:

अलिकडेच पुण्यात एल्गार परिषद होऊन गेली होती, त्यात शेरजील उस्मानी या तरुणाने हिंदुविरोधी वक्तव्य केल्याने त्याला अटक व्हावी, अशी मागणी होत होती. अशीच एक एल्गार परिषद २०१८ साली देखील झाली होती ज्यात स्टॅन स्वामी उपस्थित होते.

त्या परिषदेमध्ये स्वामी यांनी प्रक्षोभक भाषण केले त्यामुळे भीमा कोरेगाव दंगल उसळली, असा आरोप त्यांच्यावर केला होता. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेक लोकांची धरपकड करणं चालू होते.

 

bhima-koregaon-inmarathi

 

शहरी नक्षलवाद ही लोक पसरवत आहेत या आरोपाखाली अनेकांना अटक झाली. स्वामींनवर झालेलं आरोप त्यांनी फेटाळले होते. त्यांचं म्हणणं असं होत कि त्यांचं नाव देखील नक्षलवाद्यांशी जोडले जात आहे तसेच खोटे पुरावे गोळा करून मला या प्रकरणात गोवत आहेत.

भीमाकोरेगाव प्रकरणी त्यांना अटक झाली. झारखंड प्रकरणामुळे NIA च्या अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केली. मागच्या ऑक्टोबरमध्ये त्यांना अटक करण्यात आली.

जेलमध्ये त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती, पार्किन्सन सारखा दुर्धर आजराने ते ग्रस्त होते. त्यांच्या वकिलाने बेलसाठी अर्ज ही केलं होते मात्र ते फेटाळले गेले होते. मे महिन्यात हाय कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना १५ दिवसांसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र प्रकृती खूपच खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.

स्वामी यांच्या सुटकेसाठी त्यांचे समर्थक कायमच आंदोलन करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उभे राहत आहे. त्यांचे समर्थक आता ‘सरकारला प्रश्न विचारत आहेत. सरकारनेच त्यांचा बळी घेतला आहे’, असा थेट ते आरोपच करत आहेत.

 

nikhil wa inmarathi

 

मागच्या वर्षी झालेल्या पालघर साधू हत्याकांड घडले होते. त्यावरून सुद्धा हिंदू सुरक्षा हा मुद्दा चांगलाच गाजला होता. पोलिसांनी १०० वर लोकांना अटक केली होती. मात्र त्यातील अनेक आरोपी हे अल्पवयीन असल्या कारणाने त्यांना सोडण्यात आले होते. आज स्वामींच्या बाजूने बोलणारे अनेकजण साधूंच्या झालेलीच हत्याप्रकरणी मात्र मूग गिळून गप्प असतात.

 

stan inmarathi 1

हे ही वाचा – काँग्रेसला प्रणवदा केंद्रात हवे होते पण ते या व्यक्तीच्या हट्टामुळे शक्य झाले नाही…

स्टॅन स्वामी यांचा मृत्यू सरकारने केला, की दुर्धर आजाराने झाला हा प्रश्न उपस्थितीत राहतोच, कोर्टाने वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मागवले आहेतच. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे त्यांचे सर्मथक कसे घेतील हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?