' लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा – InMarathi

लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खलनायक जितक्या जास्त ताकदीचा, तितकी सिनेमामध्ये नायक आणि खलनायक यांची जुगलबंदी बघायला मजा येत असते. सध्या वास्तववादी सिनेमांचा ट्रेंड असल्याने आजच्या सिनेमात व्हीलन कमी बघायला मिळतात.

सध्याच्या सिनेमात हिरो भोवतालची परिस्थिती हीच एक व्हिलन असते. काही वर्षात आलेल्या सिनेमात तोलामोलाचा खलनायक सांगायचा तर ‘बाहुबली’मधील भल्लाल देव या पात्राचं उदाहरण देता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

९० च्या दशकात मात्र मोगॅम्बो त्या आधी गब्बर, कर्मामधील डॉक्टर डॅन, शानमधील शाकाल हे काही लक्षात राहणारे व्हीलन म्हणता येतील. या सर्वांमध्ये १९९० च्या प्रतिबंध सिनेमातील ‘स्पॉट नाना’ म्हणजेच रामी रेड्डी यांचं नाव घेतलं नाही तर ही यादी अपूर्ण राहील.

 

rami reddy inmarathi

 

दक्षिण भारतातील रामी रेड्डी यांनी बॉलीवूडमध्ये सुद्धा ‘वक्त हमारा है’ सारख्या सिनेमातून लोकांना भरपूर घाबरवलं आहे. सावळा रंग, टक्कल, चेहऱ्यावर कमीत कमी भाव, गळ्यात सोन्याची चेन आणि एकसुरी आवाज ही या व्हिलनची ओळख म्हणता येईल.

रामी रेड्डी यांचा चेहरा बघून प्रेक्षकच नाही तर सेटवरचे लोक सुद्धा घाबरायचे असं म्हटलं जातं. रोल ‘कर्नल चिकारा’चा असो वा ‘अण्णा’चं पात्र असो रामी रेड्डीने नेहमीच लोकांना प्रभावित केलं.

रामी रेड्डीने आपल्या करिअरची सुरुवात तेलगू सिनेमातून केली. रामी रेड्डी यांचा जन्म आंध्रप्रेदशच्या चित्तोर राज्यातील वाल्मिकीपुरम या गावात झाला होता. त्यांनी आपलं पत्रकारितेचं शिक्षण हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून पूर्ण केलं होतं.

सिनेमात काम करण्यापूर्वी रामी रेड्डी हे ‘कलम के सिपाही’ या वर्तमानपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करायचे. आपल्या करिअरमध्ये रामी रेड्डीने एकूण २५० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

 

rami reddy collage inmarathi

 

प्रतिबंध सिनेमातील ‘स्पॉट नाना’ या पात्राने बॉलीवूडमध्ये रामी रेड्डी यांची एक खास ओळख निर्माण करून दिली. तेलगू सिनेमा ‘अंकुशम’चा रिमेक असलेल्या या हिंदी सिनेमाने हिंदीमध्ये सुद्धा खूप चांगला व्यवसाय केला होता.

दिगदर्शक कोडी रामक्रिष्णा यांनी रामी रेड्डीसाठीच हे कायम पुढचं लक्ष्य ‘स्पॉट’ करणारं पात्र लिहिलं होतं. चिरंजीवी सारख्या सुपरस्टार समोर काम करतांना सुद्धा रामी रेड्डी यांचा ‘स्पॉट नाना’ हा कुठेही चिरंजीवीच्या स्टारडम समोर झाकोळला गेला नाही.

मोजकेच सिनेमा रिलीज होणाऱ्या त्या काळात या खलनायकाची लोकांमध्ये खूप भीती बसली होती. ‘प्रतिबंध’ सिनेमा बघितलेली कोणतीही व्यक्ती रामी रेड्डीचा चेहरा विसरूच शकत नाही.

 

pratibandh movie inmarathi

 

सुपरस्टार व्हिलन असं बिरुद मिळणाऱ्या रामी रेड्डी यांचं करिअर फुलत होतं. पण, त्यांना असलेल्या यकृताच्या आजारामुळे त्यांच्या करिअरला अचानक ब्रेक लागला.

आपल्या अभिनयाने कित्येक सिनेमावर आपली छाप सोडणाऱ्या रामी रेड्डी यांना प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या किडनीच्या आजारपणावर मात करता आली नाही.

ज्या बॉलीवूड आणि दक्षिण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये त्यांनी इतकं नाव कमावलं त्यांच्याकडे रामी रेड्डी यांनी शेवटच्या काळात पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ते कोणाच्याही संपर्कात न राहणं पसंत करू लागले. १४ एप्रिल २००१ रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी रामी रेड्डी यांचं सिकंदराबाद येथे किडनीच्या दीर्घ आजारपणामुळे निधन झालं.

ज्या शरीरयष्टीमुळे ते व्हीलन म्हणून शोभून दिसायचे तसे ते आता दिसत नव्हते. रामी रेड्डी यांनी काही वर्ष कामातून ब्रेक घेतला. पण, जेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते.

 

rami reddy inmarathi

 

रामी रेड्डी हे ‘वक्त हमारा है’ आणि ‘दिलवाले’मधील त्यांच्या कामामुळे कायम लक्षात राहतील. ‘दिलवाले’मध्ये तर रामी रेड्डी यांना एकही संवाद दिला नव्हता. तरीही ते अजय देवगण आणि सिनेमाच्या मधुर गाण्यांसमोर सिनेमात आपलं स्थान निर्माण करू शकले होते.

१९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘खुद्दार’मध्ये रामी रेड्डी यांनी हिंदी सिनेमात पहिल्यांदा आपला लूक बदलला आणि त्यांनी एका विकृत मनोवृत्तीच्या साधुचा वेश परिधान केला होता. हिंदीतील काही शब्दांचे वेगळे उच्चार हीच त्यांची ओळख ठरली आणि त्यामुळेच त्यांना काही हिंदी सिनेमे मिळाले सुद्धा नाहीत.

आपल्या करिअरमध्ये केवळ गँगस्टर, भ्रष्ट पोलीस अधिकारी असेच रोल करणारे रामी रेड्डी हे व्यक्तिगत आयुष्यात खूप शांत आणि समंजस होते असं त्यांच्यासोबत काम केलेले दिगदर्शक, कलाकार नेहमीच सांगतात. आपल्या या स्वभावाचं दर्शन त्यांनी ‘गुरुवरम’ या सिनेमात साई बाबांच्या भूमिकेत काम करतांना दाखवण्याचा प्रयत्न केला. हा सिनेमा रामी रेड्डी यांच्या निधनानंतर रिलीज झाला होता.

 

rami reddy sai baba inmarathi

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?