' जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज नाकारला होता – InMarathi

जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज नाकारला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ऐंशी-नव्वदच्या दशकात सलमान खान ज्या चित्रपटात काम करायचा त्या चित्रपटातल्या गाण्यांचा मेल प्ले बॅक सिंगर हा कायम एकच असायचा. ते म्हणजे दक्षिणेतल्या चित्रपट आणि संगीत सृष्टी मधील सगळ्यात मोठं नाव- एस पी बालसुब्रमण्यम हे. म्हणजे त्यांच्या आवाजाशिवाय सलमान खानचे चित्रपट पूर्ण होत नसत.

उदाहरण घ्यायचं तर, मैने प्यार किया,साजन, लव्ह,पत्थर के फुल,हम आप के है कौन,अंदाज अपना अपना आणि बरेच. सलमान खानची ‘प्रेम’ ही प्रतिमा लोकांच्या लक्षात ठेवण्यात बालसुब्रमण्यम यांचा खूप मोठा हात आहे.

 

spb inmarathi

 

नुकतेच मागच्या वर्षी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. आज जरी ते नसेल तरी आवाजरूपी ते अजरामर झाले आहेत. प्रत्येक यशस्वी कलाकाराचा रस्ता हा काही सहज नसतो. अडथळे आणि अपयश पचवून ते त्या पदापर्यंत आलेले असतात.

बालसुब्रमण्यम पण त्याला अपवाद नव्हते. याच बालसुब्रमण्यम यांचा जादुई आवाज नाकारला होता तो तत्कालीन प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी.

आज याच घटनेबाबत आपण विस्ताराने पाहणार आहोत.

तर, १९८० साली के.बालचंदर यांनी कमल हसनच्याच ‘मारो चरित्र’ या चित्रपटाचे हिंदी रिमेक ‘एक दुजे के लिये’ करायचे ठरवले. कमल हसनचा चित्रपट असल्याने लीड म्हणून तोच राहणार होता.

 

spb 2 inmarathi

हे ही वाचा – हा गायक एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

हिंदी चित्रपट करायचा म्हणजे त्याला संगीत हे तगडा असला पाहिजे म्हणून बालचंदर यांनी तत्कालीन प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अप्रोच केलं आणि ते तयार सुद्धा झाले.

जसं राजेश खन्ना यांच्या चित्रपटात किशोर कुमार यांचा आवाज असायचा अगदी तसंच दक्षिणेत बहुतांश कमल हसनच्या चित्रपटात बालसुब्रमण्यम यांनी गाणी गायलेली होती.

 

laxmikant pyarelala inmarathi

 

आणि त्यावेळेस बालसुब्रमण्यम हे दक्षिण चित्रपट सृष्टीत तामिळ,तेलगू, कन्नड गाण्यांना आपला आवाज देऊन बरेच प्रसिद्ध झाले होते.

त्यामुळे बालचंदर यांनी कमल हसनला अभिनेता म्हणून साइन केल्यानंतर त्यांनी बालसुब्रमण्यम यांना आपला चित्रपटाच्या गाण्याला गायक म्हणून निवडले. पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा वेगळाच विचार चाललेला. त्यांनी एक दुजे के लियेच्या प्लेबॅकसाठी किशोर कुमार यांच्या मुलाची-अमित कुमारची निवड केली होती.

अमित कुमार त्यावेळेस लव्ह स्टोरी गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. बालचंदर यांनी बालसुब्रमण्यम यांचा आवाज एकदा ऐकून घ्यावा म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना विनंती केली.

 

amit kumar inmarathi

 

जेव्हा बालसुब्रमण्यम आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल समोरासमोर आले तेव्हा लक्ष्मीकांत आश्चर्यचकित झाले. कारण एसपीना धड हिंदीसुद्धा बोलता येत नव्हतं.

लक्ष्मीकांत यांनी एसपीना इंग्रजी मध्ये गाणं लिहून दिलं आणि त्यांना गायला सांगितले. त्यावेळी दिसून आलं की बालसुब्रमण्यम यांचा हिंदी उच्चार हा एकदम अशुद्ध आहे. आणि त्यांनी बालचंदर यांना बालसुब्रमण्यम यांना रिजेक्ट करत असल्याचे कळवले.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या या निर्णयामुळे बालसुब्रमण्यम यांचा हिरमोड झाला. बालचंदर आणि कमल हसन एसपीना चांगलं ओळखत असल्याने त्यांनी त्यांची मनधरणी केली.

बालसुब्रमण्यम यांनी साध्या जाण्यापासून शास्त्रीय संगीत पर्यँत सगळी गाणी गायली होती.शिवाय त्यांच्या नावावर राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जमा झाला होता.

 

k balchander inmarathi

 

बालचंदर यांनी बालसुब्रमण्यम यांना सांगितले की गाण्याचे बोल समजून घ्या,ज्यामुळे गाणं गाताना त्यांना सहजता होईल. बालचंदर यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांना गाण्याचे बोल समजावले आणि थेट मुंबईला रेकॉर्डिंगसाठी आणले.

बालसुब्रमण्यम यांच्यात झालेला बदल बघून लक्ष्मीकांत प्यारेलाल दोघे ही आश्चर्यचकित झाले.पण तरीही ते अमित कुमार यांच्यावरच अडून राहिले होते. शेवटी बालचंदर यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची समजूत काढताना म्हणाले,

जर चित्रपटात हिरो हा तामिळ आहे, तो तामिळ एकसेंटमध्ये बोलतो तर चित्रपटातली गाणीसुद्धा तशीच हवी. म्हणून गायक बालसुब्रमण्यम त्यास योग्य आहेत.

बालचंदर यांची ही दलिल दोघांना पटली आणि बालसुब्रमण्यम हे निवडले गेले. अपेक्षेप्रमाणे एक दुजे के लिये बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि विशेष म्हणजे त्याची गाणी ही सुपरहिट झाली.

 

spb 3 inmarathi

हे ही वाचा – तोंडातून रक्त आलं तरीही गाण्याचा ध्यास न सोडणारा कलासक्त गायक!

एस पी बालसुब्रमण्यम यांना एक दुजे के लिये साठी सर्वोत्तम पार्श्व गायक म्हणून त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

हा त्यांचा गायक म्हणून दुसरा राष्ट्रीय पुरस्कार होता. या आधी १९७९ मध्ये त्यांच्या संकरभरणम या तेलगू चित्रपटाच्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर मात्र बालसुब्रमण्यम यांनी मागे वळून पाहिले नाही.

१९८७ च्या मैने प्यार किया नंतर तर बालसुब्रमण्यम आणि सलमान खान हे एक समीकरणचं बनल. लता मंगेशकर सोबत त्यांचं ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणं तर एव्हरग्रीन झालं आहे.

तर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं का म्हणतात हे बालसुब्रमण्यम यांच्या या घटनेवरून आपल्याला नक्की कळलं असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?