' अंत्यसंस्काराचे शास्त्र महत्वाचे की भावना? मंदिरा बेदीला नेटकरी करतायेत ट्रोल, वाचा!

अंत्यसंस्काराचे शास्त्र महत्वाचे की भावना? मंदिरा बेदीला नेटकरी करतायेत ट्रोल, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जन्म मृत्यू खरं तर कोणाच्याच हातात नसतं. जन्माला आलेला कोणताही जीव एकदा त्याने जन्म घेतला की एक दिवस त्याच्या मृत्यू होणार हे त्याला ही माहिती असत. फक्त तो मृत्यू कधी आपल्यासमोर येऊन ठेपेल हे मात्र माहिती नसत. काहींचं अकस्मात जाणं हे कित्येक दिवस आपल्याला पटत नाही.

गेल्या वर्षभरापासून आलेल्या साथीच्या रोगाने अनेक जीवांचा बळी घेतला आहे. तरुण मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत. बॉलीवूडने सुद्धा मागच्या वर्षांपासून सुशांतसिंग पासून ते अगदी इरफान ऋषी कपूर असो.

नुकतंच मंदिरा बेदीच्या पतीचं निधन झालं, शांती सिरीयलमुळे प्रकाश झोतात आलेली ही अभिनेत्री पतीच्या अंत्यसंस्कार विधीवरून चांगलीच ट्रोल झालेली आहे.

 

mandira inmarathi 2

हे ही वाचा – रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

नक्की का ट्रोल केले जात आहे?

मंदिरा बेदीच्या पतीच्या अंतिम संस्कराच्या वेळी तिने आपल्या पतीला खांदा दिला तसेच तिने हातात मडके ही धरले होते. या संबधितचे फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकऱ्यांच्या लगेचच त्यावर कमेंट्स येऊ लागल्या.

 

mandira inmarathi 1

 

मंदिराच्या कपड्यांपासून ते अंत्य संस्कारापर्यंत नेटकऱ्यांनी तिच्यावर अनेक कमेंट्स केल्या. तिला असंस्कारी म्हणून सुद्धा घोषित केले आहे. नेटकरी नेमकं काय म्हणालेत बघुयात.

 

mandira bedi inmarathi

 

हिंदू धर्मात अंतिम संस्कारांच्या वेळी स्त्रियांना मनाई असते, या मुद्द्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

 

mandira 4 inmarathi

 

काही जण तर थेट मीडियाला दोष आहेत, अंतिम संस्काराचे असे हे फोटो व्हायरल करणं चुकीचं आहे तर दुसरीकडे मंदिराच्या कपड्यांवर ही कमेंट करत आहे.

 

mandira 5 inmarathi

 

मंदिराला मुलगा असूनही त्याला या गोष्टींमध्ये का वेगळे ठेवले आहे, असा सवाल ही नेटकरी करताना दिसून येत आहे.

 

mandira 3 inmarathi

 

ज्या पद्धतीने तिला ट्रोल केले जात आहे त्याच पद्धतीने तिच्या बाजूने सुद्धा बॉलीवूड उभे राहत आहे. प्रसिद्ध निवेदिका मिनी माथूर तसेच गायिका सोना मोहपात्रा तिच्या बाजूने खंबीरपणे उभ्या आहेत. ट्विटरद्वारे त्यांनी हा पाठिंबा दर्शवला.

 

mandira bedi 2 inmarathi

हे ही वाचा – निखिल वागळें “…काशिनाथ…” चित्रपटावर केलेल्या टीकेमुळे झाले होते ट्रोल

घरातील व्यक्ती जाणे हेच खरेतर घरातल्या व्यक्तींसाठी अत्यंत दुःखदायक असत. हिंदू धर्मानुसार गेलेल्या व्यक्तीचे अंतिम विधीचे संस्कार हे खरं तर त्या व्यक्तीच्या मोठ्या मुलाने करायचे असतात, अथवा धाकट्या मुलाने, जर मुलगा नसल्यास त्या व्यक्तीच्या भावाने करायचे असतात.

धार्मिक मुद्यांच्या बाबतीत आजकाल आपण काळाप्रमाणे बदलत आहोत, त्याप्रमाणे आपण आपापल्या सोयीनुसार रीतिरिवाज पाळत असतो. त्यामुळे आजच्या काळानुसार प्रथा आणि परंपरा यामंध्ये बदल करताना भान ही ठेवणे गरजेचे आहे.

बॉलीवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्या असो किंवा कोणाचे अंतिम संस्कार विधी असो प्रत्येक गोष्टीला इव्हेंट देण्याची वृत्ती वाढली आहे. सेलिब्रेटींच्या पार्टीमधल्या कपड्यांची जशी चर्चा होते तशीच असा कार्यक्रमात घातलेल्या कपड्यांची ही चर्चा होते.

आज मंदिराला असंस्कारी ठरवणे हे कितपत योग्य आहे, हा तर खरा वादाचा मुद्दा बनून जातो. तिच्यावर आलेली ही वेळ बघता तिला अशा प्रक्रारे ट्रोल केले जाणं हे चुकीचं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?