' १३० किलोंचं बेढब शरीर ते सुपरमॉडेल, वाचा अचाट करणारा प्रेरणादायी प्रवास!

१३० किलोंचं बेढब शरीर ते सुपरमॉडेल, वाचा अचाट करणारा प्रेरणादायी प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – आनंद अरुण लेले

===

गेल्या शनिवार-रविवारी इंडियन आयडॉल या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील बिकट परिस्थितीशी खचून न जाता ज्यांनी हार नाही मानली व ती परिस्थितीच पूर्ण बदलली अशा काही विशेष तसेच नावाजलेल्या लोकांना बोलावून त्यांचा गौरव केला.

खरं तर खूप आठवडे आधीच मी इंडियन आयडॉल बघणं सोडून दिलं आहे पण या कार्यक्रमाचा प्रोमो मी पाहिला असल्याने फक्त हा एपिसोड कुठल्याही गाण्यावर उठून उभे राहत मौसम बदल दिया अशी दाद देणाऱ्या व मिळवणाऱ्या गायक/परीक्षक/सेलिब्रिटी यासाठी नव्हे तर खास या निमंत्रित व्यक्ती जे एकेकाळी आपल्यासारखेच सामान्य आयुष्य जगत होती पण त्यांचा जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे त्यांनी त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने असामान्य बनवले अशा गुणवंत व्यक्तींसाठी हा कार्यक्रम पूर्ण पाहिला.

 

indian idol inmarathi

 

 

त्यातच एक निमंत्रित व्यक्ती होते ते म्हणजे मॉडेल दिनेश मोहनजी. आपल्या मुलाच्या दुःखद निधनाने खचून गेलेली ही व्यक्ती.

आपल्या वयाचा जो उर्जित काळ असतो त्या काळातच यांना जगणे नकोसे वाटू लागले. वयाच्या ४४ व्या वर्षीच सगळ्या आशा सोडून दिल्या आणि फक्त विचार करून निराश होणं, खाणं आणि झोपणं यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढू लागला आणि त्यात अनेक व्याधी जडल्या.

लठ्ठपणा इतका प्रमाणाबाहेर वाढत गेला की सतत वाढत्या वजनाने १३० किलोचा आकडा गाठला. ४ ते ५ वर्ष यांना अति लठ्ठपणामुळे नीट चालताही येत नव्हतं तसेच त्यानंतर पुढचे एक वर्ष तर ते पूर्णतः अंथरुणाला खिळूनच होते आणि आता आपण आता कधीच चालू शकणार नाही ह्या भावनेने अजूनच डिप्रेशन मध्ये जात होते.

पण एके दिवशी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने त्यांचा खरपूस समाचार घेतला आणि हीच घटना कदाचित त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली असावी व त्यानंतर असे खितपत पडून राहून आयुष्य कंठायचे नाही तर प्रयत्न करायचे, लढायचे असा निश्चय करून त्यांनी आपले जीवन बदलायचे ठरवले.

 

dinesh inmarathi

हे ही वाचा – या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हीही `fat to fit’ हा प्रवास यशस्वीपणे पुर्ण करु शकाल

हा प्रवास मुळीच सोप्पा नव्हता, उठून चालण्याचा प्रयत्न करत असताना ते असंख्य वेळा पडले. स्वतःचे वजन कमी करण्यासाठी डायटीशियन कडून संतुलित आहार, फिटनेस व्यायाम, तसेच सायक्रेटीस्टच्या मदतीने अफाट मेहनत, परिश्रम करून स्वतःचे वजन नियंत्रणात आणले.

कदाचित नुसतं ऐकून आपला विश्वास बसणार नाही तर या माणसाने आपले ५६ किलो वजन केवळ काही महिन्यातच कमी केले. ४५ व्या वर्षी आयुष्याच्या उमेदीच्या काळात निराशेच्या खोल गर्तेत गेलेला माणूस ५७ व्या वर्षी फिटनेसचे सर्वोत्तम उदाहरण बनला.

एक नाही दोन नाही तर तब्बल १२ वर्षांची तपश्चर्या म्हणजे जवळजवळ एक तप साधनाच या व्यक्तीने केली.

ज्या काळात लोक रिटायर होऊन आयुष्याचे सेकंड इनिंग मजेत आरामात जगायची स्वप्ने बघत असतात तेव्हा वयाच्या ५७ व्या वर्षी या माणसाचे करियर खऱ्या अर्थाने सुरू झाले. त्यांचा फिटनेस आणि स्मार्ट लूक बघून त्यांच्या एका मित्राने “तू मॉडेलिंग क्षेत्रात जा” असे त्यांना सांगितले. पण तिथे सगळे नवतरुण असतात. माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिकडे कोण स्वीकारणार असे ते म्हणाले पण तरीसुद्धा एकदा प्रयत्न करून बघू असे म्हणत त्यांनी ऑडिशन दिली आणि तिथे सुद्धा सर्व नवतरुणांना मात देत ६० वर्षांच्या या तरुणाची निवड झाली.

 

dinesh mohan inmarathi

 

आपल्या डोळ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी परिस्थितीशी खचून न जाता त्यावर मात केली. एक व्यक्ती जी स्वतःच्या रिटायरमेंट नंतर वयाच्या ६५ व्या वर्षी स्वतःचे आयुष्य संपवायला निघाली होती ती व्यक्ती एक वेगळा व्यवसाय सुरू करून वयाच्या ८१ व्या वर्षी KFC या जगातल्या नामवंत ब्रँडची मालक तसेच कोट्याधीश बनते.

वजन कमी करण्याच्या बाबतीत तर आपल्या डोळ्यासमोर कायम मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचेच उदाहरण कायम प्रस्तुत केले जाते. ते सुद्धा कौतुकास्पद नक्कीच आहे. पण त्याच्याकडे सर्व सुखसोयी तसेच सुविधा होत्या तसेच दिनेश मोहनजी यांच्या तुलनेत तो वयाने नक्कीच तरुण आहे. पण दिनेश मोहनजी यांचं transformation हे खऱ्या अर्थाने आजच्या तरुणांना लाजवणारं आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करत असतानाच दिनेश मोहनजी यांना भारत या चित्रपटाची तसेच साऊथ मधील दोन चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो हे दिनेशजी यांनी सोदाहरण प्रस्तुत केलं आहे.

 

fit to fat inmarathi

 

वजन कमी करून फिटनेस tranformation आणणारी अनेक उत्पादने आणि त्यांच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहत असतो. “पहले मे बहोत मोटा था” अशा उत्पादनांच्या जाहिराती बघून आपले कान विटले असतील. पण जर अशी अपवादात्मक उदाहरणे सेट करायची असतील आणि यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही हेच शाश्वत सत्य..

इंडियन आयडॉल मध्ये त्यांच्या कर्तृत्वाबद्दल विचारले असताना ते एक वाक्य बोलले जे अगदी ठळकपणे लक्षात राहिलं “जो आदमी एक वक्त एक कदम भी चल नही सकता था, आज चलना ही उसका प्रोफेशन बन गया हे”

स्वतः मध्ये इतके बदल घडवून समाजात transformation घडवून आणणाऱ्या दिनेश मोहनजींना सलाम…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?