' अमरनाथ यात्रेला बंदी पण जगन्नाथ-पुरी यात्रेला परवानगी कशी काय? वाचा – InMarathi

अमरनाथ यात्रेला बंदी पण जगन्नाथ-पुरी यात्रेला परवानगी कशी काय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे अनेक तीर्थस्थानं, देवस्थानं विशेषतः मंदिरं बंद करण्यात आली. अशातच अनेक मोठ्या यंत्रांच्या वेळा नेमका लॉकडाऊन सुरु असताना आल्या. आणि हे सगळं नागरिकांच्या हितासाठीच होतं. कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून ही पाऊलं, सुरक्षेच्या अनुषंगाने उचलली गेली.

 

haridwar kumbhmela inmarathi

 

कुंभमेळा मधून बंद करण्यात आला, अमरनाथ यात्रा जी शिव भक्तांसाठी सगळ्यात मोठी यात्रा मानली जाते तिला सुद्धा परवानगी दिल्या गेली नाही, पंढरीच्या वारीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी सहभागी होण्यावर बंदी घातली गेली, असे अनेक धार्मिक कार्यक्रम गेल्या वर्षापासून आपल्याला रद्द होताना दिसत आहेत. पण ओडिशाच्या रथयात्रेला मात्र परवानगी देण्यात आली आहे. पण जगन्नाथ रथयात्रा इतकी महत्वाची का असते, तिथल्या लोकांच्या श्रद्धेसमोर नियम का शिथिल करण्यात आले ते जाणून घेऊया.

 

puri 2 inmarathi

हे ही वाचा – हवामान खातंही अचंबित…!! मंदिर अचूकरित्या वर्तवते पावसाचा अंदाज…

जगन्नाथ –

भगवान श्रीकृष्णाचं एक नाव. भगवान जगन्नाथ, आपले ज्येष्ठ बंधू बालभद्र म्हणजेच बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत राथवरून नगरीचा फेरफटका मारण्यास गेले होते. तेव्हा पासून रथ यात्रेला सुरुवात झाली.

कलयुगच्या प्रारंभीक काळात मालव देशात राजा इंद्रद्युमचं शासन होतं. ते भगवान जगन्नाथांचे भक्त होते. एके दिवाशु इंद्रद्युम भगवान जागन्नाथाच्या दर्शनास नीलांचल पर्वतावर गेले, तेव्हा त्यांना तिथे देवाच्या प्रतिमा कुठेच दर्शनास पडल्या नाहीत.

निराश होऊन राजा पुन्हा आपल्या महालात जाऊ लागले तेव्हा एक आकाशवाणी झाली की भगवान पुन्हा पृथ्वीवर अवतारातील. ही  आकाशवाणी ऐकून राजा इंद्रद्युम अत्यंत आनंदी झाले व देवांनी पुरथ्वीवर अवतारण्याची वाट पाहू लागले.

 

shree krishna flute inmarathi

 

एकदा समुद्राजवळ फेरफटका मारत असताना, राजाला 3 लाकडाचे तुकडे पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांना आकाशवाणीचे स्मरण झाले, व त्यांना वाटले, हीच देवाची इच्छा आहे. लाकडापासून मूर्ती बनवण्यापासून मूर्ती बनवण्यासाठी राजानी विश्वकर्मा यांना पाचारण केलं.

विश्वकर्मा प्रकट झाले आणि मूर्ती बनवण्यास आपला होकार आहे असे काळवले. पण त्यांनी एक अट घातली, की मी जेव्हा मूर्तींची निर्मिती करत असेन तेव्हा या स्थानाजवळ कोणीही येऊ नये. मी एकांतात मूर्ती घडावण्याचे काम करेन.

राजा तयार झाला व मूर्ती घडवण्याचे काम सुरु झाले. यानंतर राजा एकदा, ही अट विसरून चुकून त्या ठिकाणाजवळ आला. हे ध्यानात येताच, विश्वकर्मा अर्धवट काम सोडून अंतर्धान पावले.

राजाने देवाला क्षमा मागितली, आणि देवानी राजाला अशाच अर्धवट मूर्ती स्थापन करण्याची आज्ञा दिली. पण स्थापना करण्यापूर्वी देवाने राजाला सांगितलं की, मी दरवर्षी माझ्या ह्या जन्मस्थानी येईन. त्यामुळे राजन, तशी सोय करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. असे म्हणतात तेव्हापासून, भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम ह्यांना रथावर बसवून स्वतः राजा त्यांना गावातून फिरवून गुण्डिचा येथे, म्हणजे त्यांच्या मूर्ती जिथे घडवल्या तिथे त्यांना नेण्यात येते. भगवान जगन्नाथ तिथे काही दिवस विश्राम करताय व पुन्हा त्यांना मंदिरात आणण्यात येते.

 

puri inmarathi

 

रथ यात्रेबद्दल दुसरी कथा अशी की, एकदा सुभद्राने भगवान जगन्नाथ आणि बलराम यांच्याजवळ एकदा गावातून आपल्याला फिरवून आणण्याचा हट्ट धरला. तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी, भगवान जगन्नाथ आणि बलराम यांनी तिला रथ यात्रेवर न्यायचे ठरवले. यासाठी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा हे तिघे वेगवेगळे आपआपल्या रथावर आरूढ होऊन यात्रेवर निघाले.

पूर्ण पुरी ग्राम फिरून, ते यात्रा करून गुण्डिचा इथे विश्रामास थांबले. आणि तिथेच त्यांनी तीन दिवसांसाठी विश्राम करण्याचे ठरवले. विश्राम करून, ते पुन्हा आपल्या मंदिरी म्हणजेच, पुरीच्या मंदिरात परतले.

तेव्हा पासून, जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा अखंड सुरु आहे. दरवर्षी, आषाढ़ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला ही  रथ यात्रा काढली जाते. हजारो भाविक, स्वतः जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ ओढून गावातून मिरवणूक काढून, गुण्डिचा पर्यंत नेतात.

तिथे तीन दिवस विश्राम केला जातो व वरात हे अवाढव्य रथ ओढून जगन्नाथ पुरीला आणले जातात. व देवांच्या मूर्तींची मंदिरात पून्हा स्थापना केली जाते. पुरीच्या राजाचे वंशज स्वतः रथ झाडून स्वच्छ करतात आणि सगळी तयारी करतात.

 

puri 1 inmarathi

हे ही वाचा – संत नामदेवांना या देवळात मनाई केली म्हणून मंदिराने चक्क दिशाच बदलली…!!

पुरीच्या जगन्नाथाची अनेक भाविकांना प्रचिती आलेली आहे. त्यामुळे ते एक जागृत देवस्थान आहे असं म्हटलं जातं. रथ यात्रेत सहभागी होऊन, रथ ओढणाऱ्या व्यक्तीला ५०० यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं असंही म्हणतात. याशिवाय, अनेक वर्षांपासून ही यात्रा अखंड पणे सुरु असल्याने, कोणतीच महामारी किंवा काहीही या यात्रेत बाधा आणू शकत नाही, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे.

त्यामुळे यात्रेत खंड पडायला नको, म्हणून कोरोना महामारीत ही या जगन्नाथ पुरीच्या रथ यात्रेला, संमती देण्यात आली आहे. पण, यात्रेत किती भाविक सहभागी होतील याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ५०० भाविक यंदा ह्या यात्रेत सहभागी होणार असून, सगळ्यांच्या कोरोना चाचण्या करून रिपोर्ट्स तपासून त्यांना सहभागी होण्यास परवानागी देण्यात येईल.

देव पाठीशी असला की सगळं शक्य होतं. आणि आपल्या लाडक्या देवाचं कोणतं कार्य असलं की आपली इच्छा शक्ती बळावते. तसंच काहीसं सध्या पुरीच्या नागरिकांचं झालेलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?