' केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा – InMarathi

केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०१४ साली देशात एकच चर्चा होती ती म्हणजे ‘अब की बार मोदी सरकार’, २०१९ साली विरोधकांनी कडाडून विरोध करून सुद्धा भारतीयांनी नरेंद्र मोदी यांनाच निवडून दिले, तेव्हाची हाक होती ‘फिर एक बार मोदी सरकार’.

२०२४ सालच्या निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शरद पवार यांची रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी झालेली बैठक यावरून अनेक उलट सुलट चर्चा सुरु आहेत. बहुदा आता शरद पवार सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीत उतरणार असं अनेकांचं मत आहे.

नोटबंदी, जीएसटीचे नियम, कोरोनाचे वाढते प्रमाण, लशीकरणातील गोंधळ या कारणांमुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जनमानसात चीड निर्माण झाली आहे. एकूणच आज सोशल मीडियावर त्यांना कायमच ट्रोल केले जात आहे.

आज नरेंद्र मोदींचे जसे कट्टर समर्थक आहेत जे कायम नरेंद्र मोदींच्या योजनांचे त्यांच्या कामाचे कौतूक करतात मात्र तितकाच त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्यावर तुटून पडत आहे.

पत्रकार असो विरोधक असो किंवा सिनेअभिनेते असो सर्वच क्षेत्रातील लोक आज नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे. आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेला अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा एका वक्त्यव्यमुळे चर्चेत आला आहे. बघुयात काय म्हणतोय,

 

kamal r khan inmarathi

हे ही वाचा – गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्रांमार्फत नरेंद्र मोदींवर आरोप केले होते

कमाल असं म्हणतो की, माझी भविष्यवाणी सांगतेय की २०२४ साली नरेंद्र मोदी हे क्लीन बोल्ड होतील, २०२४ च्या निवडणुकांच्या तयारीला सुद्धा नरेंद्र मोदी अजून लागले नाहीत त्याआधीच त्याने आपले मत सांगून टाकले.

सलमान खान असो किंवा अन्य कोणताही सेलिब्रिटी, चित्रपटांचे समीक्षण असो, कमल आर खान कायमच आपल्या एका विशिष्ट शैलीमध्ये त्यांचा समाचार घेतो. चित्रपट उत्तम असूनसुद्धा कधी कधी तो त्याला वाईट सिनेमा म्हणून घोषित करतो.

कमालच्या अशा वक्तव्यांचा नेटकरी सुद्धा खरपूस समाचार घेत असतात, काहीजण विनोदी म्हणून त्याच्याकडे बघतात आणि त्याला दुर्लक्षित करतात.

 

kamal r khan 1 inmarathi

 

नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक अशा वक्तव्यांना चांगलेच सडेतोड उत्तर देतात तसेच मोदींच्या कार्याचा देखील उल्लेख करतात.

 

kamal r khan 2 inmarathi

हे ही वाचा – सत्तरीतही फिट असणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य तुम्ही वाचलंच पाहिजे

नरेंद्र मोदींच्या विरोधात कोण ही बोलले तर त्यावर त्यांचे विरोधक लगेचच त्यावर आपली सहमती दर्शवतात. कमाल आर खान ला बाकी कितीही लोक बोलतील पण या वक्त्याववरून पाठिंबा देत आहेत.

कमल आर खान सारखे अभिनेते एक ही चित्रपट हिट न देता केवळ बेताल वक्तव्यांमुळेच चर्चेत असतात. देशात आज वातावरण एकूणच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झालेले आहे. मात्र असे असून सुद्धा विरोधकांना आज पर्यंत  त्यांना टक्कर देऊ शकेल, असा प्रतिस्पर्धी उभा करता आला नाही.

२०२४ उजाडेल तेव्हाच्या एकूण राजकीय परिस्थितीवर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची भविष्यवाणी कितपत खरी ठरेल हे त्यावेळीच कळेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?