' खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे! – InMarathi

खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लाल आणि निळ्या रंगाच मिश्रण असलेला खोडरबर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वापरला असेल.

आपल्याला वाटायचं, की या खोडरबरच्या सहाय्याने पेनाने लिहिलेलं देखील खोडता येतं, पण खरं सांगायचं तर हा आपला गैरसमज होता. काही जण अजूनही असं मानतात की या खोडरबरने पेनाची शाई खोडता येते.

मुळात त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा, कारण या या लाल-निळ्या खोडरबरच्या लाल भागावर पेन्सिलची आकृती दिसते, त्यामुळे त्याचा वापर पेन्सिलने लिहिलेलं खोडण्यासाठी होतो हे बरोबर.

 

eareser-marathipizza01

आणि या खोडरबरच्या निळ्या भागावार मात्र पेनासारखी आकुती दिसते त्यामुळे आपण असा समज करून घेतो की हा भाग पेनाने लिहिलेलं खोडण्यासाठी आहे की काय?

हा समज प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोच आणि त्या पायी पेनाची शाई खोडताना कागद मात्र फाटला जातो आणि आपल्या लक्षात येतं की आपला समज हा एक गैरसमज होता.

चला तर जाणून घेऊया या निळ्या भागाचा नेमका वापर काय?

 

eareser-marathipizza02

 

या निळ्या भागाचा वापर केवळ पेन्सिलच्या माध्यमातून कागदावर उमटलेले गडद लिखाण किंवा लिहिताना झालेली एखादी चूक/खुण खोडण्यासाठीच केला जातो. म्हणजे या खोडरबरचा वापर हा फक्त पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठीच होतो, पेनाचे नाही हे लक्षात घ्या.

मग तुम्ही म्हणाल दोन रंग देण्याचा काय फायदा? तर या दोन रंगातील फरक असा आहे की लाल भागाचा वापर हा पातळ कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो आणि निळ्या भागाचा वापर जाड कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो.

जर तुम्ही पातळ कागदावरील लिखाण खोडण्यासाठी निळ्या भागाचा वापर केला तर ज्या ठिकाणी तुम्ही खोडण्याचा प्रयत्न करत आहात तो कागदाचा भाग फाटू शकतो. विश्वास नसेल तर एकदा ट्राय करून बघा.

याच विरुद्ध जर तुम्ही एखाद्या जाड कागदावर/ आर्ट पेपरवर लाल भागाचा वापर खोडण्यासाठी केला तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जे लिखाण तुम्ही खोडू इच्छिता आहात ते सहसा मिटणार नाही. याच ऐवजी जर तुम्ही निळ्या भागाचा वापर केला तर मात्र ते लिखाण सहज खोडले जाईल.

eareser-marathipizza04

 

काय? मिळाली का नाही छान माहिती? आणि दूर झाला की नाही गैरसमज? मग आता हा लेख शक्य तितका शेअर करा इतरांचाही या लाल-निळ्या खोडरबरच्या बाबतीतला गैरसमज दूर करण्यास मदत करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?