' अति हळवेपणामुळे ‘इमोशनल फूल’ व्हायचं नसेल तर वेळीच या ८ टिप्स वाचा – InMarathi

अति हळवेपणामुळे ‘इमोशनल फूल’ व्हायचं नसेल तर वेळीच या ८ टिप्स वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मशिन्स आणि तंत्रज्ञानाच्या ह्या युगात भावनांची आणि भावना प्रधान लोकांची किंमत, दिवसेंदिवस कमी होत चाललीये. सगळ्यांना फक्त आपला फायदा नुकसान इतकंच दिसत असतं. त्यात जर चुकून माकून तुम्ही ओव्हर सेन्सेटीव्ह असाल तर तुमची तर या वास्तववादी जगात फरपटच होत असेल! भावना प्रधान किंवा हृदयाचा ओलावा असणे चांगलेच आहे.

 

diya mirza emotional inmarathi

 

त्याने समाजात प्रेम, बांधिलकी, शांतता नांदतात. पण तुमच्या भावना सतत अनावर होत असतील, तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय, तुमच्याप्रति कोण्या व्यक्तीची वागणूक कशी आहे, याबद्दल तुम्हाला सतत वाईट वाटत असेल, आणि जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल वाईट वाटून तुमचा दिवस आणि कामासाठी वापरली जाणारी एनर्जी वाया जात असेल, तर तुम्हाला ह्यावर काही न काही उपाय करणे गरजेचे आहे ते ओळखा.

ह्या स्वभावला “ओव्हर सेन्सेटीव्ह” स्वभाव असं म्हणतात. यामुळे तुमची अनेकदा “इमोशनल फुल” म्हणून खिल्ली ही उडवली जात असेल पण यावरही उपाय आहेत. त्यामुळे चिंता न करता तुम्ही जर ओवर सेन्सेटीव्ह असाल आजचा लेख नक्की वाचा.

आपल्या भावना नियंत्रणात कशा ठेवायच्या, व्हरसेन्सेटीवीटी कशी कमी करायची याचे काही उपाय –

१) ट्रीगर्स ओळखा –

भावना अनावर होण्यामागे काही ना काही कारण असते. या कारणांना “ट्रीगर्स” म्हणतात. तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे, आठवणींमुळे, व्यक्तींमुळे, परिस्थितीमुळे त्रास होतो, ते ओळखा. आणि ह्या कारणांचं “ट्रीगर्स” व्हायचं काय कारण आहे ते ओळखा. एकदा कारण समजले की त्यावर उपाय करणे सोपे होते.

 

kareena inmarathi

 

२) भावनांना समजून घ्या –

आपण नेहमी दुसऱ्यांनी आपल्याला आपल्या भावनांना समजून घ्यावं हि अपेक्षा करतो. पण स्वतःच्या भावना आपल्याला स्वतःलाच उलगडतात का? तर ह्याचं उत्तर बहुतेक वेळा “नाही” हेच असतं. स्वतः च्या भावना ओळखा. तुम्हाला चांगलं आणि आनंदी वाटत असेल, तर ते का वाटतं? आणि तुम्हाला वाईट वाटत असेल, राग येत असेल, चुडचिड हिट असेल तर ते का वाटतं हे ओळखा.

 

emotionless people inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –चिंता करण्याचे ५ जबरदस्त फायदे जाणून घ्या!

बहुतेक वेळा एखाद्या कारणामुळे आपल्याला चिडचिड होत असते पण आत्मचिंतन कमी पडत असल्याने आपल्याला कारण कधीच माहित होत नाही, आपण व्याधी जिथे आहे तिथे सोडून इतर सागळ्याठिकाणी मलम लावून बघतो. आणि अशाने व्याधी दूर होत नाहीच, फक्त आपली चिडचिड होते आणि परिस्थिती आणखीन बिघडते.

३) स्वतःची मदत करायला शिका –

आपल्याला एखादा त्रास होतो आहे हे लक्षात येताच दुसऱ्यांकडून त्यासाठी काही मदत मिळेल ही अपेक्षा सोडून द्या. तुमचा त्रास किती आहे, काय आहे, कशामुळे आहे हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती असतं.

 

self inmarathi

 

दुसऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला जरी, तरी ती मदत नेहमीच योग्य असते असे नाही. उदा: तुमचं पोट दुखतंय, आणि तुम्ही नुसतेच रडताहात आणि घरातील माणसं तुमचे हात पाय दाबून देतायत, ताप आहे का ते तापासतायंत, अशाने आजार बरा होण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर चिडण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे खचून न जाता, कोणाकडून फार अपेक्षा न करता, स्वतःची मदत स्वतःच करायला शिका.

४) सुट्टी घ्या –

भावना अनावर होण्यामागे सततची दगदग हेही कारण असू शकतं. सतत व्यस्त आणि कामात असल्याने तुम्हाला स्वतःकडे वेळ द्यायला मिळतंच नाही. त्यामुळे तुमच्या मनाला काय हवंय, तुमच्या मेंदूला किती आराम हवाय, हे तुम्ही लक्षातच घेत नाही.

शरीर अनेक संकेत देतं, पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. आणि ह्या सगळ्याच्या ताण तुमच्या मनावर येऊ लागतो. कधी कधी, अतिताणामुळे सुद्धा भावना अनावर होऊन एखाद्याचं साधं बोलणं जिव्हारी लागणे, कोणी साधं रागावल्यास रडू येणे, तुमचं काम झालं नाही तरी रडू येणे, एखादी गोष्ट हरवली, खराब झाली किंवा तुटली तरी रडू येणे हे प्रकार घडू लागतात.

 

vacation inmarathi pariniti

 

कारण तुमचं मन ताण सहन करून करून नाजूक झालेलं असत. अशात त्याला थोड्या विरंगुळ्याची नितांत गरज असते. त्यामुळे तुम्हाला जर हा त्रास सतत जाणवत असेल तर एक मोठी सुट्टी घ्या. निसर्गाच्या सानिध्यात, आपल्या जवळच्या माणसांबरोबर वेळ घालवा. प्रत्येक रविवारी छोटी आणि अधून मधून मोठी सुट्टी घेण्याची सवय लावा. बरं वाटेल!

 

५) स्पष्ट नकार द्यायला शिका –

नकार दिल्याने माणूस शिष्ट,उद्धट, खडूस, ईगोसेन्ट्रीक वगैरे काहीच होत नाही. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार असेल, ज्या व्यक्तींना भेटून त्रास होणार असेल, परिस्थितींना तोंड देऊन त्रास होणार असेल, त्या वेळीच ओळखून लोकांना स्पष्ट नकार द्यायला शिका. सुरुवातीला कठीण जाईल पण तुमच्या मानसिक आरोग्यापेक्षा काहीच मोठं नाही. त्यामुळे स्वतःला महत्व द्यायला शिका आणि नकार द्या.

 

hrithik laksh inmarathi

 

६) हावभावांकडे लक्ष द्या –

तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही चेहरा हसरा ठेवला तर तुम्हाला राग कमी येतो व कपाळावर सतत आठ्या पडत राहिल्या तर तुम्ही आपोआप चिडचिड करू लागता? होय, एका संशोधनातून समोर आले आहे की तुमचे हावभाव जसे असतील तुमचा मेंदू तुमच्या मनात तशा भावना निर्माण करेल. त्यामुळे सतत प्रसन्न राहण्याचा, स्मित हास्य करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हे जाणून बुजून करावे लागेल पण हळू हळू सवय होईल.

 

alia happy inmarathi

 

७) लोकांकडे दुर्लक्ष करा –

तुमचा स्वभाव पाहून, त्यांच्या फायद्यासाठी लोक तुम्हाला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतात. तुम्ही अधिक हळवे आहेत, तुमच्या भावना लावकर अनावर होतात त्यामुळे एखादं वाक्य बोलून तुमचा अख्खा दिवस खराब करण्याचा त्यांचा हेतू साध्य होऊन, तुम्ही कामात कमी पडाल व ते यशस्वी होतील. त्यामुळे अशी माणसं वेळीच ओळखून त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष करायला शिका.

 

sreedevi inmarathi

 

८) दीर्घ श्वास घ्या –

दीर्घश्वास घेणे अत्यंत महत्वाचे आहे हे तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेलच. दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व नकारात्मकता कमी होते. त्यामुळे कोणतंही मत नोंदवण्याआधी दीर्घ श्वास घेऊन, शांत होऊन आपलं म्हणणं मांडा.

 

malaika arora khan inmarathi

===

हे ही वाचा – मुलींनो- लग्न करण्याआधी या “१२” महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या..!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?