' रणवीरचा 'विचित्र' लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा...

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रणवीर सिंग आणि त्याचे आचरट चाळे आपल्याला काही नवीन नाही, आज रणवीर एक उत्तम अभिनेता जरी असला तरी तो चर्चेत राहतो ते केवळ त्याच्या अतरंगी स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे.

खुद्द करण जोहरलाही लाजवेल असा अजब गजब रणवीरच्या ड्रेसिंगचे बरेच किस्से आपल्याला माहीत आहेत.

विचित्र शूज, भलेमोठे गॉगल, फटलेली पॅन्ट यासगळ्यापलीकडे जाऊन खुद्द स्वतःची बायको दीपिकासारखे कडपे घालून फोटोशूट करणाऱ्या रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं पण त्याची चर्चाही होतेच!

 

ranveer deepika inmarathu

 

सध्या रणवीर पुन्हा याच कारणामुळे चर्चेत आलाय, अमेरिकी अभिनेता जरेड लेटोसारखा लुक त्याने जसाच्या तसा कॉपी केला असून त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो टाकले आहेत.

हे फोटोशूट गूची ब्रॅंडसाठी जरी असलं तरी रणवीरच्या या लुक वरुन बरीच चर्चा होताना दिसत आहे. लांब सडक केस आणि विचित्र निळा ड्रेस आणि गॉगल घातलेला रणवीरचा फोटो बघून फक्त त्याचे चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटीजसुद्धा त्यावर व्यक्त झाले आहेत.

हे ही वाचा बीग स्क्रीनचा बाजीराव आपल्या ख-या आयुष्यात कसा आहे हे नक्की वाचा!

ranveer dress inmarathi

 

आलिया भट, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ यांनी रणवीरच्या या लुकचं खूप कौतुक केलं आहे, रणवीरच्या कित्येक फॅन्सनीसुद्धा याचं कौतुक केलं तर काहींनी विनोदी शैलीत रणवीरच्या या लूकची खिल्ली उडवली आहे.

यावरून सध्या सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल होत असून रणवीर आता ट्रॉलर्सच्याही रडारवर आला आहे, अशीच काही भन्नाट मीम्स आपण बघणार आहोत.

 

meme 1 inmarathi

 

रेल्वेमध्ये जनरल डब्यात आपली जागा अडवण्यासाठी लोकं असेच उभे असतात पण फक्त जरा वेगळ्या परिस्थितीत इतकाच काय तो फरक!

 

meme 2 inmarathi

 

ऑनलाइन कपडे खरेदी करणाऱ्या लोकांची अवस्थासुद्धा काहीशी अशीच होत असेल नाही का?

 

meme 3 inmarathi

 

रणवीरचे हे विचित्र लुक बघून दीपिका आणि सामान्य लोकांच्या मनात असेच काहीसे प्रश्न उपस्थित होत असतील.

 

meme 4 inmarathi

 

लोकल मधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या वेदना या फक्त रणवीरच समजू शकतो!

 

meme 5 inmarathi

 

काही महाभागांनी तर रणवीरच्या या लुकची तुलना येशू ख्रिस्ताशी केली आहे हे ही नसे थोडके!

 

meme 6 inmarathi

 

रणवीरचे हे आचरट चाळे पाहून कपाळाला हात मारून घेणाऱ्या दीपिकाच्या मनात वेलकमच्या नाना पाटेकरचे डायलॉगच येत असतील!

 

meme 7 inmarathi

हे ही वाचा “मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं होतं”: दीपिकाचा धक्कादायक गौप्यस्फोट

meme 8 inmarathi

 

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना हे सगळं नवीन नाही, पण जेव्हा जनमानसात स्वतःची अशी इमेज होते तेव्हा मात्र तुम्ही कोणतीही स्टाईल केली तरी लोकं तुम्हाला ट्रोलच करतात.

रणवीर किंवा इतर लोकांनी काय घालवं काय घालू नये हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पब्लिक फिगर मानल्या जाणाऱ्या लोकांकडून हे असले थिल्लर चाळे होणं अपेक्षित नाही, आणि त्यांनी जर तसं केलं तर लोकं त्यांची टर उडवणारच ना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?