' "एक 'किस'की किंमत तुम क्या जानो"... वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

“एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“जुम्मा चुम्मा दे दे” किंवा ‘अगं ये जवळ ये लाजू नको’ ही गाणी म्हटलं की आजही अनेकींच्या गालांवर लाजेची लाली चढते. प्रेमीयुगूल एकमेकांकडे प्रेमाने कटाक्ष टाकतात आणि आखों ही आखों मे लपंडावाचा खेळ सुरु होतो. हे झालं लव्हबर्ड्सच्या बाबतीत!

 

kiss inmarathi

 

‘मुन्नाभाईची जादु की झप्पी’ आजही आजमावून बघा, शब्दांविना केवळ एका स्पर्शातून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, टेन्शन हलकं होतं, आणि नात्यातील विश्वास अधिक वाढतो. तुम्हीही हा अनुभव कधीतरी घेतलाच असेल.

प्रेम व्यक्त करण्याच्या तऱ्हा असतात. मदत करून प्रेम व्यक्त करणे, समजून घेऊन प्रेम व्यक्त करणे, बोलण्यातून भावना व्यक्त करणे, आणि स्पर्शाने प्रेम व्यक्त करणे! यात स्पर्शाने व्यक्त केलेले प्रेम हे समोरच्यापर्यंत पटकन पोहोचते. कारण, आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला प्रेमाने स्पर्श केल्याने शरीरात वेगवेगळी हॉर्मोन्स निर्मिती होते.

 

couple-inmarathi

 

अभ्यासातून असं समोर आलं आहे की जोडीदाराच्या हलक्या स्पर्शाने सुद्धा जे हार्मोन्स निर्माण होतात त्यामुळे वेदनांची तीव्रता कमी होऊन त्रास कमी होतो. बोलण्यापेक्षा स्पर्शाने समोरच्याला भावना पटकन उमागतात.

इंग्लिश सिनेमांच्या फॅडमुळे किसींग हल्ली फार कॉमन झालं आहे. केवळ पतीपत्नी नव्हे तर तरुण वयातील प्रेमीयुगुलही हल्ली सर्रास किस करताना दिसतात.

 

kissing inmarathi

 

प्रेमाचा हा सुंदर अविष्कार असला तरी प्रत्येक गोष्टीला एक विरुद्ध बाजू सुद्धा असते हे विसरून चालणार नाही किसिंगला पण एक अशी बाजू आहे.

धक्का बसला ना? पण हे खरंय, तुमच्यामते अगदी सहज होणारी ही प्रक्रिया तुमच्या शरिरावर फार मोठे गंभीर परिणाम करू शकते.

हे ही वाचा – कडलिंग आवडतंय ? जाणून घ्या प्रेमाच्या या गोड मिठीचे फायदे!

किसिंगचा आपल्या आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम –

१. व्हायरस बॅक्टरीयाचा धोका 

मनुष्याचे शरीर हे लाखो करोडो प्रकारच्या जिवाणूंचे घर असते. त्यातल्या त्यात, आपल्या तोंडात सगळ्यात जास्त संख्येत हे जिवाणू वास्तव्य करत असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला लीप लॉक किस करतो तेव्हा त्यांच्या शरीरातील जिवाणू हे आपल्या शरीरात शिरतात.

 

kiss harmful inmarathi

 

समोरच्या व्यक्तीच्या रोग पसरवणारे जिवाणू असतील, जसे MONONUCLEOSIS AND MENINGITIS ज्यामुळे पचन आजार, मेंदू आणि पाठीच्या कण्याचे आजार उद्भवू शकतात. हे आजार जरी तात्पुरते असले तरी प्रचंड त्रास होऊ शकतो.

 

acidity inmarathi

 

त्यामुळे कोणताही मौखिक आजार असेल किंवा तसे कोणते लक्षण असेल तर किस करणं टाळा, आपल्या जोडीदाराला त्या आजाराबाबत सांगा आणि वेळ न दवडता डॉक्टरांकडून उपचार घ्या.

२) STI सेक्शुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन 

किसिंगमुळे अनेक लैंगिक विकारांची लागणही होऊ शकते. एचआयव्हीसारख्या सूक्ष्मजंतूंची देवाण घेवाण होऊ शकते. हे जंतू शरीरात शिरले कि नाही हे ओळखता येत नाही कारण ते “असिम्पटोमॅटिक” जंतू असतात. पण दीर्घकाळ शरीरात टिकून राहिल्याने काही दिवसांनी यांचा उद्रेक जाणवू शकतो.

 

kiss inmarathi

 

यासाठी सर्वप्रथम तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा. या जोडीदाराआधी तुमचे कोणाशी संबंध होते का? त्यामुळे तुम्हाला कोणते विकार झाले आहेत का? याबाबत खरी माहिती द्या, कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करताना सुरक्षा बाळगा.

३) तोंड येणे 

समोरच्या व्यक्तीच्या लाळेतून आपल्या शरीरात हार्प्स नामक सूक्ष्मजंतू शिरकाव करतो त्यामुळे आपले तोंड येऊ शकते. तोंडात फोड येणे, ओठांच्या आजूबाजूला पू असलेले फोड किंवा पुरळ येणे हे त्रास होऊ शकतात.

 

mouth ulcer inmarathi

 

आपल्या शरीरात हे सूक्ष्मजंतू असतील तर समोरच्या व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दोघांच्याही प्रकृतीला धोका असतो.

४) व्हायरसचा धोका

मागील वर्षी सोशल डिस्टन्सिंगचा नारा दिला गेला आणि अनेक कपल्सची गोची झाली. आपल्या जोडीदाराला भेटूनही किस न करता येणं अनेकांना परिक्षेपेक्षाही अवघड वाटत होतं.

मात्र काही अतिशुरवीरांनी मास्कचा अडथळा दूर करत आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातच त्यांची गोची झाली.

 

kissing 1 inmarathi

 

किसिंग हा व्हायरस पसरण्याचा सर्वात मोठा, प्रबळ स्त्रोत आहे असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. त्यामुळे सध्याच्या काळात अतिधाटाई नकोच. बाहेरून आलेल्या आपल्या जोडीदाराला थेट किस करणं महागात पडू शकतं.

५) दातांच्या समस्या

तुम्हाला ठाऊक आहे का दातांच्या समस्या जसे कीड लागणे, दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे हे सगळे संसर्गजन्य आहे.

होय, तुमच्या जोडीदाराला जर ह्यापैकी कोणताही त्रास असेल तर खबरदार! तुम्हाला सुद्धा तो त्रास होण्याची दाट शक्यता असते.

 

kiss infection inmarathi

 

ह्या व्यतिरिक्त तुमच्या जोडीदाराला कोणत्याही ओरल इन्फेक्शनने ग्रासलं असेल तर तुम्हाला सुद्धा ते इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते.

६) फूड ऍलर्जी 

तुम्हाला एखाद्या पदार्थाची, भाजीची ऍलर्जी असेल तर सहाजिकच तुम्ही ते पदार्थ खाणे टाळता, हो ना? पण तुमच्या जोडीदाराचे काय?

 

 

kiss 1 inmarathi

 

त्याला हे सगळे अन्नपदार्थ वर्ज नसतात. चुंबन घेण्याआधी जर तुमच्या जोडीदाराने एखादा तुम्हाला न चालणार पादार्थ खाल्ला असेल तर तुम्हाला त्याची ऍलर्जीक रिअॅक्शन असेल तर ते लगेच जाणवू शकते. त्याची तीव्रता सुद्धा कमी जास्त असू शकते.

७) ओठांवर परिणाम 

ओठांची त्वचा आपल्या शरीरातील इतर त्वचेपेक्षा फार नाजूक असते. ओठांवर ४ ते ६ लेअर्स असून इतर त्वचेवर १४ लेअर्स असतात. त्यामुळे ओठांची विशेष निगा राखण्याची गरज असते.

 

lips inmarathi

 

जेव्हा आपले ओठ अति प्रमाणात दुसऱ्यांच्या ओठांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची पहिली लेअर काहीशी नाजूक होते. ज्यामुळे ओठ रुक्ष होतात, भेगा पडतात, कोपऱ्यातून चीर गेल्यासारखी भेग पडते किंवा ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग कमी होऊन ते काळवंडतात.

हे ही वाचा – गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

८) आजार पसरतात 

एखाद्या व्यक्तीला कुठलाही संसर्गजन्य आजार झाला असेल आणि तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तर तुम्हालाही तो आजार होण्याची शक्यता असते.

काही संसर्गजन्य आजार असे असतात जे दिसून येत नाहीत. समोरच्या व्यक्तीला शरीरात थोडे बदल जाणवत असतात पण फार नाही, त्यामुळे त्याचे त्या अजारांकडे दुर्लक्ष होते. अशात तुम्ही त्या व्यक्तीच्या इतक्या जवळून संपर्कात आलात तर तुम्हालाही ते आजार होऊ शकतात.

 

couple inmarathi

 

किसिंगचे इतके दुष्परिणाम आपण पाहिले, पण ती तर एक सुखद अनुभूती असते हे नक्की! प्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात गोड पर्याय म्हणजे चुंबन घेणे असे मानले जाते. तर मग आता किस करणे सोडून द्यायचे का? तर नाही!

पण खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हे खाली दिलेले उपाय करू शकता.

१. कोणत्याही प्रकारच्या शाररिक संबंधात येण्या आधी मेडिकल टेस्ट करून घ्या. आपल्या जोडीदाराला प्रेमाने याचे महत्व पटवून द्या.
२. आपल्या मौखिक आरोग्याची सतत काळजी घ्या. किस करण्याआधी स्वतः आणि आपल्या जोडीदाराला सुद्धा तोंड स्वच्छ धुवून घ्यायला सांगा.
३. आपल्या दातांची तपासणी करत राहा. जेणेकरून कोणतेही इन्फेक्शन तुमच्या जोडीदाराला होणार नाही.
४. तुम्हाला कोणता आजार असेल, बरं वाटत नसेल तर जोडीदाराला ते स्पष्ट सांगा आणि कोणत्याही शारीरिक संबंधांपासून काही काळ लांब रहा.
५. तुमच्या जोडीदाराला कोणत्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते जाणून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या पदार्थांचे सेवन कराल तेव्हा कोणत्याही शारीरिक संपर्कात येण्याचे तुम्ही टाळू शकता.

काळजी घ्या, आणि आपले आनंदाचे सुखद क्षण अनुभवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?