' “मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! – InMarathi

“मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवूडकर आणि त्यांची प्रेमप्रकरणं हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कधी एकीच्या हातात हात घालून फिरणारा हिरो दुस-याच दिवशी भलत्याच हिरॉइनसोबत दिसला तर नवल वाटू नये, ‘होत्याचं नव्हतं होणं’ ही उक्ती जणूकाही त्यांनाच पाहून शोधली गेली.

बॉलिवूडच्या जोड्या कधी एकमेकांच्या प्रेमात आकंंठ बुडालेल्या दिसतात, तर कधी मिडीयासमोर थेट एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. या भांडणांमध्ये एक कॉमन मुद्दा म्हणजे आपल्या जोडीदारावर घेतला जाणारा संशय!

 

salman aishwarya inmarathi

 

आपली प्रेयसी किंवा प्रियकर दुस-या हिरोइनसोबत सिनेमा करतोय म्हटल्यावर त्यांचे जोडीदार सावध होतात आणि जेम्स बॉण्डप्रमाणे जोडीदाराचा पिच्छा पुरवतात, आपला जोडीदार कुणासोबत आहे? काय करतोय? भलतेसलते काही करत नाही ना? अशा वेगवेगळ्या शंका घेत बॉलिवूडचे संशयी लव्हबर्ड्ची शोधमोहिम सुरु असते. त्यात इंटिमेट सीनचं शुटिंग असलं तर मग जोडीदाराचा पारा चढलाच म्हणून समजा.

मग या शंकांचं निरसन झालं नाही तर भांडणांची सुरुवात होते, हळूहळू त्याचे वादात रुपांतर होत अखेरिस नात्याचा शेवट ठरलेला असतो. मात्र नेमका हाच समज मोडीत काढणारं विधान एका अभिनेत्रीने केलं आहे.

“इंटिमेट सीन ही त्या कथेची गरज असेल तर मग ते नाकारता येत नाहीत, मात्र असले सीन देण्यापुर्वी किंवा देताना मी माझ्या जोडीदाराला विचारत नाही किंवा त्याची परवानगीही घेत नाही” असं बेधडक विधान केलंय बॉलिवूडच्या एका बोल्ड अभिनेत्रीने.

 

love inmarathi

हे ही वाचा – सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

सशक्त अभिनय आणि बिन्धास्त वृत्ती यांच्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने हे विधान केलं आहे.

बॅडमिंटन प्लेअर मॅथिस बो याच्याशी असलेल्या नात्याचा खुलासा तापसीने काही काळापुर्वी केला होता. त्यानंतर या दोघांच्या फोटोजने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. लॉकडाऊनमध्ये कलाकारांमध्ये मालदीवजचे पेव फुटले असताना तापसी आणि मॅथिस या जोडीनेही मालदिव व्हेकशन एन्जॉय केली.

 

tapsee pannu inmarathi

 

मात्र आता या नात्याबद्दल तापसीने एक अजब खुलासा केला आहे. “मी एक अभिनेत्री असल्याने सर्व प्रकारच्या भुमिका कराव्या लागतात. यामध्ये कथेची गरज म्हणून इंटिमेट सीन्सही केले जातात. भूमिकेला न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे सीन्स यात काहीही गैर नाही. मात्र असे सीन करण्यापुर्वी मी माझ्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला सांगतही नाही”.

हे वाक्य वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, अनेकांच्या मनात भलत्यासलत्या शंका निर्माण झाल्या असतील मात्र तापसीबाबत कोणतंंही मत बनवण्यापुर्वी आधी त्यामागचं कारण वाचा.

 

kissing inmarathi

 

एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तापसीने याबाबतचा खुलासा केला. “असल्या सीनमुळे जोडीदार नाराज होण्याची मला भिती नाही. मी एक अभिनेत्री असल्याचं त्याने मान्य केल्याने त्याला माझ्या भुमिकेबद्दल आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही. मी त्याच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाही त्यामुळे त्यानेही माझ्या भुमिकांबाबत बोलणे योग्य नाही. आमच्या नात्यात पारदर्शकता असल्याने असा संशय घेण्याची गरज पडत नाही”.

जोडीदारावर असलेल्या विश्वासामुळे तापसीने हे धाडसी विधान केलं आहे. मात्र याचवेळी सिनेमात दिल्या जाणा-या इंटिमेट सीन्सबद्दल तिने आणखी एक किस्सा सांगितला आहे.

ते माझ्यासोबत इंटिमेट सीन करायला घाबरतात

तापसी पन्नू, विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या भुमिका असलेल्या हसीना दिलरुबा या सिनेमाचं शुटिंग नुकतंच पुर्ण झालं. याच सिनेमात तापसी आणि विक्रांत यांच्यात काही इंटिमेट सीन शुट करण्यात आले. याबाबत तापसीने एक विनोदी किस्सा सांगतला.

विक्रांत आणि हर्षवर्धन हे दोघेही माझ्यासोबत इंटिमेट सीन करायला घाबरत असल्याचे तिने स्पष्ट केलं. खरंतर सीन समजून घेतल्यानंतर तो करण्यासाठी मी तयार होते, मात्र विक्रांत चांगलाच घाबरला होता. हर्षवर्धनची तीच गत होती. माझ्याबरोबर सीन करायला हे नक्की का घाबरत होते? हे कळत नव्हतं.

 

tapasee 1 inmarathi

हे ही वाचा – संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…

कदाचित माझं व्यक्तीमत्व, स्वभाव किंवा यापुर्वी केलेले रोल्स यांमुळे या दोघांच्या मनात माझ्याविषयी भिती असेल असेही तिने सांगितले.

याबाबत खुलासा करताना अभिनेता विक्रांतने आणखी एक मुद्दा मांडला. ज्याप्रमाणे तापसी आपल्या जोडीदाराला इंटिमेट सीनबाबत सांगत नाही, मात्र मला माझ्या गर्लफ्रेंन्डला याबाबत सगळी मााहिती द्यावी लागत असल्याचे त्याने सांगितले.

“अनेकदा माझी प्रेयसी शुटिंगच्या सेटवर हजर असते. काही वेळा ती स्क्रीप्ट वाचते, तिला खटकणारे इंटिमेट सीन काढून टाकण्याबाबत मागणीही करते. मात्र तिच्याशी चर्चा करत एकदा तिला यामागचे कारण समजावले की ती शांत होते “. माझ्यासाठी तिच्या तक्रारीपेक्षा माझी भुमिका चांगली होणं गरजेचं असल्याचा टोलाही विक्रांतने लगावला.

केवळ या दोन जोड्याच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कपल्समध्ये इंटिमेट सीनवरून वाद पेटतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?