' ....तर मिर्झापुरचा 'रॉबिन', सेक्रेड गेम्समध्ये 'कुक्कु'च्या भूमिकेत दिसला असता!

….तर मिर्झापुरचा ‘रॉबिन’, सेक्रेड गेम्समध्ये ‘कुक्कु’च्या भूमिकेत दिसला असता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वेबसिरीज हे माध्यम प्रतिभावान कलाकारांना प्रयोग करण्यासाठीचा मुक्त मंच आहे. मागच्या काही वर्षात ओटीटीच्या प्लेटफॉर्ममधून किती तरी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याचं आपण बघतच आहोत.

‘सॅक्रेड गेम्स’, ‘फॅमिली मॅन’, ‘मिर्झापुर’ आणि अश्या कित्येक सिरीज आहेत ज्यामधील पात्र, संवाद हे आता लोकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहेत. कोणता रोल, कोणता अभिनेता चांगला करतोय किंवा चांगला करू शकला असता हे आता आपल्या सर्वांनाच चांगलं कळतं.

 

webseries inmarathi

 

‘मिर्झापुर’ मधील ‘रॉबिन’ हे पात्र एव्हाना सर्वांना माहीत असेलच. प्रियांशु पैन्यूली या गुणी कलाकाराने हा रॉबिन इतका चांगला वठवला आहे की, आपण त्या रोल मध्ये दुसरी कोणत्या अभिनेत्याची कल्पनाच करू शकत नाही.

प्रियांशुने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना त्याच्या प्रत्येक रोल मधून नेहमीच प्रभावित केलं आहे. अभिनय करण्यात प्रियांशु हा उजवा आहेच, त्यासोबत योग्य रोल निवडण्यातसुद्धा त्याचा हातखंडा आहे.

‘भावेश जोशी – द सुपरहिरो’ पासून मुख्य भूमिकेने आपल्या बॉलीवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांशु पैन्यूलीने केवळ सिनेमात दमदार भूमिका मिळावी असा हट्ट कधीच धरला नाही.

 

robin inmarathi

 

रॉक ऑन २ मध्ये पण तो तीन मित्रांच्या कथेचा भाग झाला आणि छोट्या रोलमध्ये सुद्धा भाव खाऊन गेला होता.

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘एक्सट्रॅक्शन’ सिनेमात प्रियांशु याने रणदीप हुड्डा आणि पंकज त्रिपाठीसारख्या प्रस्थापित कलाकारांसमोर आपली चुणूक दाखवली. एका माफिया च्या रोल मध्ये सुद्धा त्याने केलेलं काम हे लोकांना प्रचंड आवडलं.

प्रियांशु पैन्यूली याने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “माझ्यातील अभिनयाची विविधता बघून मला ‘सॅक्रेड गेम्स’ मधील कुकु हे पात्र ऑफर करण्यात आलं होतं.”

नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत दिसलेली ‘कुकु’ जे की त्या कथेचं महत्वपूर्ण पात्र होतं. हे पात्र प्रियांशुने उभं करावं अशी निर्मात्यांची इच्छा होती. कुबरा सैतने हे पात्र चांगलंच रंगवलं होतं.

 

kukko inmarathi

 

पण, कल्पना करा की, ते पात्र जर प्रियांशु पैन्यूलीने साकारलं असतं तर त्यामध्ये अजून किती वेगळे पैलू बघायला मिळाले असते.

प्रियांशु पैन्यूलीची एक इच्छा होती की, त्याला गली बॉय मधील ‘एम सी शेर’ हे पात्र मोठ्या पडद्यावर सादर करता यावं. पण, तो रोलसुद्धा त्याच्यापर्यंत आला नाही.

हे ही वाचा २०२० – अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज!

सॅक्रेड गेम्समधील कुकुच्या ऑडिशनच्या वेळी मी कुब्रासोबत फायनलिस्ट होतो. ‘भावेश जोशीची एडिटिंग सुरू करत असतांना ही संधी मला चालून आली होती. विक्रमादित्य मोटवाने सरांना या रोलसाठी एक मुलगा सुद्धा चालणार होता.”

प्रियांशु पैन्यूलीने दिगदर्शक अनुराग कश्यपचं सुद्धा यावरचं मत घेतलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की, “तू कुकु चा रोल चांगलाच करशील. पण, काही सीन्स देणं तुला अवघड जाईल.”

 

priyanshu inmarathi

 

प्रियांशु पैन्यूलीने सॅक्रेड गेम्सच्या निर्मात्यांकडून एक महिन्याची मुदत मागितली. वजन कमी केलं. पाच इंची हाय हिल्स असलेल्या सॅण्डल्स वापरायला सुरुवात केली. घराजवळ चक्कर मारायला सुरुवात केली.

कुबरासारखा गेटअप करायला लागला. परविन बाबीने साकारलेल्या एका रोल ची छबी डोळ्यासमोर ठेवून प्रियांशु पैन्यूलीने ही तयारी केली होती. पण, नेटफ्लिक्सने ठरवलं की कुकुचा रोल एका मुलीला द्यायचा आहे. त्यामुळे प्रियांशु आपल्याला कुकु च्या रोल मध्ये दिसला नाही.

‘सॅक्रेड गेम्स’ बघतांना कुकुला बघितल्यावर कसं वाटलं ? असं विचारल्यावर प्रियांशु सांगतो की, “कुबरा हीच या रोलसाठी योग्य होती. तिच्या चालण्यामुळे, डान्समुळे तिने लोकांना जितकं प्रभावीत केलं तितकं मी करू शकलो नसतो.”

 

kubra sait inmarathi

 

प्रियांशुला जे चांगले रोल्स मिळत आहेत ते अशा विचारशैलीमुळे आणि मेहनत करण्याच्या तयारी मुळे असं सर्व निर्माते सांगतात. प्रत्येक रोल कास्ट करतांना होणारा इतका विचारही कौतुकाची आणि नव्या बदलाची नांदी असल्याची गोष्ट आहे.

प्रियांशु पैन्यूलीला उत्तरोत्तर असेच चांगले रोल्स आणि प्रयोग करण्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा.

===

हे ही वाचा मिर्झापूर २ सतत चर्चेत रहावी, यासाठी वापरल्या गेलेल्या स्मार्ट युक्त्या पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?