' एकेकाळी भारतात बॅन असलेले हे बिस्कीट आज मात्र तुफान लोकप्रिय ठरतंय..! – InMarathi

एकेकाळी भारतात बॅन असलेले हे बिस्कीट आज मात्र तुफान लोकप्रिय ठरतंय..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज भारतातील तमाम लोकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेले पेय म्हणजे चहा. सकाळी उठल्या उठल्या कडक चहाचा घोट घेतल्यावर दिवस चांगला जातो अशी समजूत असणारे कितीतरी लोक आहेत. बरं काही लोक हे चहाप्रेमी नसले, तरी बिस्कीट बुडवून खाण्यासाठी ते चहाचा वापर करतात.

चहा बरोबर बिस्कीट खाणे हे समीकरणच बनून गेले आहे. अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असली, तरी चहा आणि एक छोटा बिस्कीटचा पुडा आपली भूक नक्कीच भागवतो.

बिस्कीटला पर्याय म्हणून खारी बटर टोस्ट जरी असले तरी बिस्किटाची जागा कोणी नाही घेऊ शकत. दुकानातून टोस्ट खारी जरी आणली तरी एक बिस्किटाचा पुडा हमखास आणतोच.

 

biscuit-tea-inmarathi

 

बिस्किटांमध्ये मैदा असतो म्हणून बिस्कीट खाणे टाळा असे अनेकजण सांगतात, बिस्कीट कंपन्यांनी यावर देखील उपाय शोधून काढला बाजारात त्यांनी डाएट बिस्कीट आणले. जे सर्व लोक खाऊ शकतील.

आज बाजरात अनेक बिस्किटांच्या कंपन्या आहेत, तरी सुद्धा पार्ले आणि मारी बिस्किटाने आपले स्थान अजूनही कायम ठेवले आहे. आजही अनेक घरात पार्ले बिस्कीट पुडा असतोच.

 

biscuit inmarathi

सध्या बाजरात एकूण बिस्किटांमध्ये चर्चेत असलेले बिस्कीट आहे ते म्हणजे प्राण बिस्कीट, बटाट्याच्या चिप्सचा फ्लेवर असणारे हे बिस्कीट लोकांच्या पसंतीस उतरत आहे. बरं ही कंपनी भारतीय किंवा पाश्चिमात्य नव्हे तर आपल्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या बांग्लादेशमधील आहे.

बांग्लादेश आपल्यातून वेगळे झालेले एक स्वतंत्र राष्ट्र, गंगा ब्रम्हपुत्रा सारख्या नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या या राष्ट्रात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय मानला जायचा मात्र आज हाच देश हळू हळू कात टाकत आहे.

बांग्लादेश आज जरी मोठमोठाल्या  व्यवस्यात प्रगती करत आहे त्याचपद्धतीने रोजच्या आयुष्यातील लागणाऱ्या वस्तू बनवण्यात देखील पुढे सरसावत आहे.

 

pran biscuit inmarathi

 

प्रामुख्याने प्राण हा ब्रँड भारताच्या ईशान्य भागात आणि पश्चिम बंगालमध्ये एका दशकांपासून प्रचलित आहे. याच ब्रँडच्या  इतर वस्तू जसे की उटणे, नूडल्स ही आधीपासूनच लोक विकत घेत होते.

प्राण बिस्कीट नेमकं कोणाचं आहे?

बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर तिकडची परिस्थिती एकूणच बिकट होती. आपल्या शेजारी नवीन राहिला आलेल्या लोकांना जसे आपण सुरवातीला मदत करतो, त्याप्रमाणे भारताने सुद्धा सुरवातीला बांगलादेशला मदत केली होती.

पाकिस्तान प्रमाणे केवळ भारतीयांना दोष न देता ते आत्मनिर्भर झाले,  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १० वर्षातच प्राण या कंपनीची स्थापना आर्मीमधील एका रिटायर ऑफिसरने केली.

 

amjad khan inmarathi

 

अमजद खान चौधरी असे त्यांचे नाव होते ते स्वतः एक कट्टर देशभक्त असल्याने, आपला देश आर्थिकदृष्ट्या सुद्धा कणखर झाला पाहिजे या दृष्टीने त्यांनी व्यवसायात पाऊल टाकले. आज त्यांची पुढची पिढी तो व्यवसाय पुढे नेत आहे. व्यवसायाबरोबरीने एकीकडे देशाचे नाव देखील सर्वदूर पसरत आहे.

बिस्किटांची संकल्पना कशी सुचली?

व्यवसाय म्हंटलं की फिरणं आलंच. व्यवसायवृद्धीसाठी अनेकजण इतर देशात राज्यात फिरत असतात जेणेकरून तिकडच्या संकल्पना, तंत्रज्ञान आपल्या व्यवसायात आणता येईल या उद्देशाने व्यावसायिक फिरत असतात.

 

pran buscuit 1 inmarathi

 

अमजद खान यांचा धाकटा मुलगा व्यवसायनिमित्ताने भारत, चीनसारख्या देशात फिरत होता तेव्हा त्याला बटाटा या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर लोक वापर करतात हे लक्षात आले. बांगलादेशमध्ये गेल्यावर त्याने शास्त्रद्यांशी चर्चा करून बटाटयाची पेस्ट गव्हाच्या पिठात मिसळून वेफरच्या चवीचे बिस्कीट करता येईल असा प्रस्ताव त्याने मांडला.

भारतात बॅन केले होते?

२००७ साली प्राणच्या ग्रुपने भारतात आपला प्लांट टाकण्यासाठी भारताकडे परवानगी मागितीली होती मात्र बांगलादेशची थेट गुंतवणूक भारतात नको म्हणून भारत सरकारने हा प्रस्ताव नाकारला होता.

 

india government inmarathi

 

बांग्लादेशमध्ये भविष्यात मोठी गुंतवणूक होऊ शकेल, म्हणून  भारत सरकारने हा प्रस्ताव मागे घेऊन त्यांच्या प्लांटला परवानगी दिली. आज आगरतळा, त्रिपुरा येथे हा प्लांट आहे.

आज जयपूरपासून ते बंगलोर पर्यंत हे बिस्कीट उपलब्ध आहे. बटाटा वेफर्सच्या अनेक छोट्या मोठ्या कंपन्या बाजारात आहे. त्यांना आता स्पर्धक म्हणून प्राण बिस्कीट बाजरात आले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?