' अँटीव्हायरसचा जनक, एका अवलियाचा नाट्यमय प्रवास आणि दुःखद अंत...

अँटीव्हायरसचा जनक, एका अवलियाचा नाट्यमय प्रवास आणि दुःखद अंत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

व्हायरस हा शब्द सध्या आपल्या फारच परिचयाचा झालाय. कोरोना व्हायरस या शब्दांशिवाय कुठल्याही दिवसातील बोलणं सुद्धा पूर्ण होत नाही, असंच म्हणा ना! लॅपटॉप आणि कॉम्युटर वापरत असाल, तरीही हा एक शब्द अगदी हमखास कानावर पडत असेलच.

अर्थात माणसाला त्रासदायक असणारा आणि या सिस्टिमसाठी घातक असणारा व्हायरस या दोन वेगळ्या गोष्टी असल्या, तरी कॉम्प्युटरच्या सिस्टिमला व्हायरसपासून वाचवणं सुद्धा गरजेचं आहेच की मंडळी!

यासाठी वापरण्यात येणारी सिस्टिम म्हणजेच अँटी-व्हायरसबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. अँटी-व्हायरस म्हटलं की अव्हास्ट, क्विकहिल अशी नावं आपसूकच तोंडावर येतात. याच नावांच्या बरोबरीने आणखी एक अँटी-व्हायरस होता, ज्याने एक काळ गाजवलाय. तो म्हणजे मॅकअफी!

मॅकअफी म्हणजे कॉम्प्युटर अँटी-व्हायरस जगताची सुरुवात होय. पुढे तो शर्यतीत काहीसा मागे पडत गेला असला, तरी हे आगळंवेगळं साम्राज्य उभं राहिलं ते त्याच्यामुळेच…!!

 

McAfee antivirus inmarathi ]

 

हा मॅकअफी अँटी-व्हायरस नुसता व्हायरस रोखायचा नाही, तर थेट सिस्टिम सुद्धा स्लो करायचा असं म्हणणारे बरेच जण तुम्हाला सापडतील. व्हायरसबद्दल चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू नक्कीच ऐकायला मिळतील. त्याचा मालक जॉन मॅकअफी याच्या आयुष्याची कहाणी सुद्धा अशीच रंजक आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी तो तुरुंगात मृतावस्थेत सापडला आणि अनेक चढउतार असलेल्या त्याच्या आयुष्याचा शेवटही नाट्यमय झाला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्याचं आयुष्य नाट्यमयच ठरलंय यात शंका नाही.

इंग्लंडमध्ये जन्म!

अँटी-व्हायरसचा निर्माता जॉन याचे वडील अमेरिकन तर आई ब्रिटिश होती. १८ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचा जन्म इंग्लंडचा नागरिक म्हणून झाला आहे. त्याच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं ज्याचा जॉनच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला असं म्हटलं जातं.

 

john mcafee inmarathi

 

जॉन आणि त्याची आई यांना त्याच्या वडिलांनी प्रचंड मारहाण केली. जॉनचं बालपण वडिलांचा मार खाण्यातच गेलं असं म्हणायला हवं. बायको आणि मुलाशी असा पशुसमान व्यवहार करणाऱ्या या माणसाने, अखेर आत्महत्या केली. जॉन १५ वर्षांचा असताना, स्वतःवरच गोळी झाडून त्याच्या वडिलांनी आयुष्य संपवलं.

===

हे ही वाचा – ‘संभोग से समाधी तक’ असं अध्यात्म शिकवणाऱ्या ओशोचा गूढ जीवनप्रवास…

===

सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम

जॉन मॅकअफी हा गणिताचा पदवीधर होता. १९६७ साली त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याने वेगवेगळ्या नामवंत कंपनीजमध्ये सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम सुरु केलं.

लॉकहिड कॉर्पोरेशन ही त्यावेळी दर्जेदार कंपनी मानली जायची. या कंपनीमध्ये सुद्धा जॉन मॅकअफीने काम केलं होतं. वीस वर्षं सॉफ्टवेअर क्षेत्रात घालवल्यावर मात्र त्याने मळलेल्या वाटेने न जाता, स्वतःची नवी वाट निर्माण करण्याचं ठरवलं.

ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस, त्याने स्वतःची कंपनी सुरु केली. त्यातून मोठं साम्राज्य उभं राहील असा कदाचित त्याने तेव्हा विचारही केला नसेल.

 

john mcafee inmarathi

 

मॅकअफी अस्तित्वात आले…

या नव्या वाटेची सुरुवात म्हणजेच, मॅकअफी असोसिएट्सची स्थापना! १९८७ साली ही नवी कंपनी अस्तित्वात आली आणि एका नव्या साम्राज्याची सुरुवात झाली. कॉम्प्युटर सिस्टिमला वाचवणारा, अँटी-व्हायरस विकायला जॉनने सुरुवात केली.

ज्याच्या नावाने अँटी-व्हायरस विकणाऱ्या या कंपनीची स्थापना झाली, त्यानेच ही कंपनी सोडून दिली असं तुम्हाला सांगितलं तर?

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. १९९४ साली या कंपनीमधून जॉनने काढता पाय घेतला. २०१० साली ही कंपनी इंटेलने विकत घेतली. नव्याने मॅकअफीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण तोवर मॅकअफी या कंपनीचं नावंही वादाच्या भोवऱ्यात सापडू लागलं होतं.

 

intel inmarathi

===

हे ही वाचा – “त्या पदार्थांचा” व्यापारी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा थक्क करणारा प्रवास

===

यशाची पुनरावृत्ती जमलीच नाही

अँटी-व्हायरसची निर्मिती हे जॉनच्या आयुष्यातील फार मोठं यश होतं. तसं यश पुन्हा साध्य करणं त्याला कधीही शक्य झालं नाही. २००७ साली जॉन मॅकअफी खऱ्या अर्थाने उद्धवस्त झाला असं म्हणायला हवं.

त्यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रात तो बस्तान बसवू पाहत होता. मात्र त्यात यश मिळवणं त्याला कठीण गेलं. अँटी-व्हायरससारख्या उत्पादनातून एक मोठं रामराज्य उभं करण्याची धमक दाखवू शकलेला जॉन, या क्षेत्रात मात्र करिष्मा करू शकला नाही.

क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन, हर्बल अँटीबायोटिक्स अशा अनेक व्यवसायांमध्ये त्याने आपलं नशीब अजमावून पाहिलं होतं. मात्र, मॅकअफी असोसिएट्ससारखं दैदिप्यमान यश त्याच्या नशिबी पुन्हा कधीही आलं नाही.

 

john mcafee inmarathi

 

व्यसनं आणि छानछोकी

आयुष्याची गाडी घसरू लागली तेव्हापासूनच जॉन व्यसनांच्या आहारी गेला होता. सॉफ्टवेअर क्षेत्रातील हा महारथी बरबाद होण्याच्या करणामागे बाटली आणि बाई या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या.

व्यसनांच्या आहारी गेलेला जॉन मुलीच्याही नादी लागला होता. अवघ्या १६ वर्षांची ललना, तीही पूर्वाश्रमीची वेश्या, अशा मुलीसोबत त्याच्या नात्याची चर्चा फारच रंगली. या नात्यामुळे जॉन यांचं मोठं नुकसान झालं.

एकंदरच व्यसनं आणि या इतर अनैतिक गोष्टींमध्ये जॉन मॅकअफी हे नाव मोठ्या प्रमाणावर घेतलं गेलं. 

 

john mcafee inmarathi

 

अशा या नाट्यमय प्रवासाचा शेवट स्पेनमधील एका तुरुंगात झाला. आयुष्य जितकं नाट्यमय ठरलं, तितकाच या व्यक्तीचा शेवट सुद्धा नाट्यमय होता…

===

हे ही वाचा – रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?