' तुम्ही “हाहा” इमोजी वापरला तर… काय आहे या इमामाचा फतवा? – InMarathi

तुम्ही “हाहा” इमोजी वापरला तर… काय आहे या इमामाचा फतवा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व काही फेसबुकवर शेअर करण्याचा एक ट्रेंडच बनून गेला आहे. आजकाल लोक घरातच अडकल्याने एकीकडे काम तर दुसरीकडे फेसबुक वर ऍक्टिव्ह असतात.

गेल्या दहा वर्षांपासून फेसबुकचा वापर  भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेकजण फेसबुकचा वापर आपल्या व्यवसायापासून ते अगदी निवडणुकीच्या रणनीती साठी देखील वापरला जात आहे.

२०२१ च्या सर्वेनुसार २.८५ बिलियन इतके जगातील लोक फेसबुक वापरणारे आहेत. फेसबुकने फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी न ठेवता जगातील ४३ भाषांमध्ये ते उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून जगातील कानाकोपऱ्यातील माणूस आपला यूजर बनू शकतो.

 

Facebook Artificial Intelligence InMarathi

 

फेसबुकचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काही देशांमध्ये फेसबुकला बंदी घालण्यात आली आहे. त्या त्या देशाच्या कायदयानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्रात हे जास्त दिसून येते.

भारतात सुद्धा फेसबुक वरून अनेक वाद निर्माण होतात मध्यंतरी फेसबुकला भाजप सरकार पसंत आहे अशी ओरड सर्वत्र होत होती, मात्र यावर फेसबुकने स्पष्ट केले की, आमच्या पॉलिसी कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाहीत.

 

BJP social media inmarathi

हे ही वाचा – मुस्लिमांना ‘यवन’ हे नाव पडण्यामागची रोचक कथा जाणून घ्या…

धार्मिक तेढ फेसबुक निर्माण करत आहे असा दावादेखील अनेकजण करत होते. बांगलादेश च्या मौलवीने असाच एक फतवा काढला आहे,काय आहे तो फतवा जाणून घेऊयात

काय आहे फतवा?

बांगलादेशमधील एक मौलवी सध्या चर्चेत आला आहे, या मौलवीने फेसबुक हाहा या इमोजी वापर करण्याविरोधात फतवा जाहीर केला आहे. मौलानाने तीस मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि फेसबुकवर लोकांकडून होत असलेल्या उपहासावर टीका केली.

 

facebook inmarathi

 

फेसबुक वर हाहा इमोजीचा वापर हा इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘ या इमोजीचा वापर केवळ थट्टा करण्यासाठी करत असाल आणि ज्याने पोस्ट टाकली आहे त्याचा ही तोच उद्देश असेल तर ठीक आहे, अन्यथा  एखाद्या उजरची करण्यासाठी वापर करत असाल तर इस्लामच्या दृष्टीने ते हराम असल्याचे त्यांनी सांगितले.

 

islam inmarathi

 

कोणत्याही यूजरची थट्टा करण्यासाठी हा इमोजी वापरू नका असे आवहान त्यांनी केले. हा व्हिडिओ २० लाखाहुन अधिक जणांनी पहिला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

कोण आहेत हे मौलवी?

मौलाना अहमदुल्लहा या नावाने ते ओळखले जातात. फेसबुक आणि यूट्यूबवर ३० लाखाहून अधिक त्यांचे फॉलवर्स आहेत. टीव्ही वाहिनीवरील धार्मिक मुद्यांच्या चर्चेमध्ये ते सामील असतात.

 

maulana inmarathi

हे ही वाचा – ८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा…

मध्यंतरी व्हाट्स अँप ने आपल्या युजरसाठी काही अटी लादल्या होता मात्र ग्राहकांनी लगेच दुसऱ्या अँपचा पर्याय शोधला, व्हाट्स अँपने तूर्तास आपल्या अटी मागे घेतल्या, तरीही भारत सरकार आणि कोर्टाने काही नियम हे त्यांना लावले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?